महत्वाच्या बातम्या
-
रात्रीच्या अंधारातच भाजप-शिवसेना सरकारने मुंबईच्या फुफ्फुसांवर कुऱ्हाड घातली
आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात आली. काल, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ३५० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड फिरवण्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सुरक्षाही या परिसरात उपस्थित होती. पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी आरेमध्ये धाव घेत झाडं कापण्याला तीव्र विरोध केला. आंदोलने करत झाडांची कत्तल करण्यास अटकाव केला. या सर्व परिस्थितीमुले रात्रभर आरेत तणावाचे वातावरण होते. येथे उपस्थित पोलिसांनी काही आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईकर, पर्यावरण प्रेमी व प्राणी मित्रांना धक्का! आरे प्रकरणी सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या
मेट्रो कारशेडसाठी गोरेगाव येथील आरे कॉलनीमधील झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी मुंबई हायकोर्टाने वैध ठरवली. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे आणि पर्यावरणप्रेमी ‘आरे’ आंदोलकांना मोठा धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अंधेरी-पूर्व गणेशवाडी SRA घोटाळा; आकृती बिल्डर आणि MIDC अधिकाऱ्यांच्या संगनमताने? सविस्तर
मुंबई अंधेरी पूर्व येथील गणेशवाडी परिसरातील आकृती बिल्डर संबंधित SRA घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. याबद्दलची सविस्तर हकीकत जाणण्यासाठी स्थानिक झोपडपट्टी धारकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे समाजसेवक मनोज नायक यांनी समाज माध्यमांचा वापर करत एक पोस्ट शेअर केल्याने महाराष्ट्रनामा न्युजच्या प्रतिनिधीने संपूर्ण विषयाची पडताळणी केली.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई खार रोडवर ५ माजली इमारतीचा भाग कोसळला; बचावकार्य सुरु
मुंबईतील खार रोड येथे एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. खार रोड क्रमांक १७ वर ही इमारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पायऱ्यांचा भाग कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. दरम्यान कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्याचं काम सध्या सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
#SaveAarey: 'फिंच' या एका दुर्मिळ पक्षांच्या संरक्षणासाठी ऑस्ट्रेलियन अदाणी कोळसा खाण विरोधात
मुंबई शहरात सध्या #SaveAarey अभियानाने जोर धरला असून मुंबईकर देखील सरकारच्या पर्यावरण धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यावरणवादी संस्था, सामान्य मुंबईकर, प्राणी मित्रं ते शाळेतील विद्यार्थी देखील एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील आरे मध्ये सध्या मेट्रो३ संबंधित कारशेड बनवण्याचे काम सुरु असून त्यासाठी हजारो झाडांची कत्तल होणार आहे आणि त्यामुळे येथे आढळणाऱ्या तब्बल २१९ दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती देखील नष्ट होणार आहेत. मात्र आपल्या सरकारला आणि प्रशासनाला तब्बल काहीही दुःख नाही.
6 वर्षांपूर्वी -
आरे केवळ हिरवळ; ते जंगल नाही; राज्य सरकारची न्यायालयात माहिती; मुंबईकरांमध्ये संताप
आरे कॉलनी हे जंगल नाही, तसंच ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचाही भागही नाही. केवळ हिरवळ दिसली म्हणजे ते जंगल आहे, तिथं दुर्मिळ झाडं आणि इतर वन्यजीव आहेत असा दावा करणं साफ चुकीचं असल्याचं म्हणत राज्य सरकारनं याचिकाकर्त्यांचा मेट्रो कारशेडला असलेला विरोध पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट केलं. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टाला सांगितलं की, आरेतील मेट्रो कारशेडबद्दल हायकोर्टानं २६ ऑक्टोबर २०१८ मध्ये दिलेले आदेश अगदी स्पष्ट आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गॅस गळतीच्या शक्यतेने मुंबईत भीतीचे वातावरण; आपत्कालीन यंत्रणा सज्ज
मुंबईच्या पूर्व उपनगरातील बहुतांश भागात गॅसची दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली होती..मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून अग्निशमन दलाकडे तक्रारी आल्या..तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली तर चेंबूरमध्ये असलेल्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर असल्यानं मनपा अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली.. मात्र ही गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा अद्याप शोध लागलेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
ही तर 'सेव्ह-आरे' अभियान हाणून पाडण्याची योजना होती? अशा शिस्तबद्ध घडामोडी घडल्या!
मागील दोन आठवड्यापासून आणि विशेष करून #SaveAarey अभियानाने मुंबईमध्ये निसर्गाप्रती मोठी जनजागृती आणि उठाव होताना दिसला. त्यात सामान्य मुंबईकर, पर्यावरण तज्ज्ञ आणि संस्था तसेच अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतल्याने सत्ताधाऱ्यांची निवडणुकीच्या तोंडावर झोप उडाल्याचं पाहायला मिळत आहे. हट्टाला पेटलेले निसर्गविरोधी सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी मात्र प्रसार माध्यमांच्या प्रश्नांनी मोठ्या गर्तेत अडकले होते. त्यात याच अभियानात हिंदी आणि मराठी चित्रपट श्रुष्टीतील लोकांनी सहभाग नोंदवल्याने प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोठ्या प्रमाणावर आरे कॉलनीकडे वर्ग झाले.
6 वर्षांपूर्वी -
बोलबच्चन! २०१० ला मेट्रो'ने माझ्या 'प्रायव्हसी'वर आक्रमण; मग त्या २१९ प्रजातींची प्रायव्हसी? - सविस्तर
सध्या मुंबईतील मेट्रो३ च्या कारशेडमुळे मुंबईतील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरून आरेतील कारशेड इतरत्र हलवण्यासाठी आंदोलन करत आहेत. आरे येथे मेट्रो कारशेड बांधण्याबाबत बाधित होणाऱ्या व्यक्तींकडून हरकती सूचना मागिवल्या होत्या, त्यावर ‘झटका डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या ८० हजार तक्रारींबाबत अश्विनी भिडे यांनी शंका व्यक्त केली. कार शेड तिथून हटवा, झाडे तोडू नका, अशा एकाच प्रकारच्या तक्रारी होत्या. खऱ्या तक्रारी असतील तर त्याबाबत काही आक्षेप नाही, परंतु संख्या वाढवून दाखविणे, हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तक्रारी करणारी माणसे आहेत का, अशी शंका घ्यायला वाव आहे. तरीही मेट्रो कारशेडसाठी आरेची जागा का निवडली, झाडे तोडली तर भरपाई म्हणून आम्ही काय करणार आहोत, याबाबत त्या सर्व ८० हजार तक्रारींना उत्तरे दिली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
अमिताभ यांचं प्रवास सुलभेतेवरून मेट्रोसंदर्भात ट्विट; अश्विनी भिडेंनी जोडलं 'आरे ऐका ना'सोबत
सध्या मुंबईतील मेट्रो३ च्या कारशेडमुळे मुंबईतील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरून आरेतील कारशेड इतरत्र हलवण्यासाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान सदर प्रकरण वृक्ष कत्तलीवरून मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर आज आरे परिसरातील झाडांच्या कत्तली करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र विषयाचे गांभीर्य आणि मोठ्या प्रमाणावर होतं असलेला विरोध ध्यानात घेता न्यायालयाचा पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतेही झाड तोडू नये, असे सक्त आदेश न्यायालयाने तोंडी स्वरूपात दिले आहेत. यावर पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
आरेतील झाडांच्या कत्तलींना उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती; न्यायाधीश आरेचा दौरा करणार
सध्या मुंबईतील मेट्रो३ च्या कारशेडमुळे मुंबईतील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरून आरेतील कारशेड इतरत्र हलवण्यासाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान सदर प्रकरण वृक्ष कत्तलीवरून मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर आज आरे परिसरातील झाडांच्या कत्तली करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र विषयाचे गांभीर्य आणि मोठ्या प्रमाणावर होतं असलेला विरोध ध्यानात घेता न्यायालयाचा पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतेही झाड तोडू नये, असे सक्त आदेश न्यायालयाने तोंडी स्वरूपात दिले आहेत. यावर पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
अश्विनी भिडेंना मुंबईकरांच्या नीतीवर शंका; मॅनेज RSS-भाजप'नीतीचं ट्विटरवर गुणगान
कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाप्रमाणेच आरे मेट्रो कारशेडही जाणार, अशी विरोधी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतरही आरेमध्येच कारशेड होईल, दुसरी जागाच नाही, असे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.
6 वर्षांपूर्वी -
SaveAarey: पोलखोल; वृक्षतोडीच्या समर्थनार्थ आलेले ते 'मॅनेज' RSS व भाजप कार्यकर्ते: सविस्तर
मेट्रो-३ साठी कारडेपोच्या निमीत्ताने मुंबईतील आरे कॉलनीत हजारो वृक्षांची कत्तल होण्यास सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. कॉलनीतील झाडे वाचविण्यासाठी (मेट्रोच्या विरोधात नाही) भर पावसात हजारो सामान्य मुंबईकर, स्थानिक आदिवासी समाजातील तरुण, विद्यार्थी,पर्यावरणवादी संस्था, तसेच अनेक सामाजिक संस्था आंदोलने करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मेट्रो ३ : भुयारीकरणाच्या कामादरम्यान बोगद्याचा काही भाग कोसळला; एका कामगाराचा मृत्यू
कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत हे काम करण्यात येत असून सात टप्प्यात हे काम सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी भुयारीकरणाच्या कामादरम्यान अचानक बोगद्याचा काही भाग कोसळला आणि यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. टनल बोअरिंगच्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पावसाचा जोर वाढला; सिद्धिविनायक मंदिरात पाणी शिरलं तर लालबागच्या राजाच्या दर्शनाची गर्दी ओसरली
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसानं अक्षरशः धुमशान घातला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. बंगलाच्या उपसागरात आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपटटी, मुंबई तसंच महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
हिजबुलची काश्मीर खोऱ्यात धमकी; तर मुंबई-गुजरातमध्ये हायअलर्ट
मुंबईत हाय अलर्ट असताना, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली येथील मुख्यालयाच्या दूरध्वनीवर ‘दहशतवादी हल्ला होणार, रोखता आला तर रोखून दाखवा’, अशा धमकीच्या कॉलने एकच खळबळ उडाली. या कॉलनंतर मुंबईत कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, तपासात हा कॉल करणारा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे समजताच मुंबई शाखेने त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. शुभमकुमार पाल (२२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानात फोन करण्यासोबत हा तरुण सोशल मीडियावर आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना), आयसीस, सीरिया आणि अन्य यंत्रणांबाबत माहिती मिळवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने विद्यार्थ्याची चौकशी सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; मुंबईत दहीहंडी उत्सवातून बडय़ा आयोजकांची माघार
राज्यासह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आज दिवस भरात मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र, यंदा सामाजिक भान राखत दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दरवर्षी हंड्या फोडण्यासाठी चुरस असते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जलप्रलय आल्याने आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला असून काही आयोजकांनी दहीहंडीमधील रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: मुंबईकरांनो! समुद्राने तुम्हाला तुमचा सर्व कचरा परत दिला
मुंबईतील क्वीन्स नेकलेस व त्याची ख्याती सर्वत्र आहे. मुंबईची शान असलेल्या ह्या मरीन ड्राईव्ह वर काही दिवसांपूर्वी मात्र एक विचित्र घटना घडली आणि वेळ आल्या नंतर निसर्ग आपलं रूप दाखवून देतोच ह्याची प्रचिती पुन्हा एकदा मुंबईकरांना आली. काही दिवसांपूर्वी मरीन ड्राईव्ह च्या समुद्राने सगळा कचरा बाहेर फेकला. त्या अथांग सागराने मनुष्याने त्यात केलेली सगळी घाण बाहेर फेकली, ह्याचे आश्चर्य सगळ्यांनाच वाटले.
6 वर्षांपूर्वी -
पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील वाहतूक जवळपास ठप्प होण्याच्या दिशेने
मुंबई आणि परिसरात कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली असून रेल्वे रूळही पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO : महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ अडकली, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी
मुसळधार पावसामुळे बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी एन डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK