महत्वाच्या बातम्या
-
साकिनाका बलात्कार | पीडितेच्या आईने महापौरांना सांगितलेली हकिकत | पीडित महिला व आरोपी 10-12 वर्षापासून एकत्र राहायचे
मुंबईतील साकिनाका परिसरात एका 30 महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, या घटनेत महिलेची प्रक़ृती चिंताजनक असल्याने तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज डॉक्टरांनी सदरील पीडित महिलेला मृत घोषित केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची तिसरी लाट आपल्या दारावर येऊन पोहोचली आहे | खबरदारी घेणं गरजेचं - महापौर
कोरोनाची तिसरी लाट दारावर येऊन पोहोचली आहे, असं म्हटलंय. “मी मुंबईत करोनाची तिसरी लाट आली आहे, असं म्हटलं नव्हतं. मंत्री नितीन राऊत म्हणाले होते, की नागपुरात तिसरी लाट आली आहे. त्यामुळे तिसरी लाट आपल्या दारावर आली असून खबरदारी घेणं गरजेचं आहे,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
जनता पाहतेय, योग्य वेळी आशीर्वाद देईल | त्यांना खरंच काम करायचे असे तर लोकांसाठी कोविड लस द्यावी - महापौर
भारतीय जनता पक्षाच्या जन आर्शीवाद यात्रेवरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा ही फसवणुकीची यात्रा आहे. भारतीय जनता पक्ष काय करत आहे याची लोक साक्ष देत आहे. ते योग्य वेळी त्यांचा आर्शीवाद देतील, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले, तो शिवसैनिकाचा राग होता | महापौरांचं स्पष्टीकरण
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो शिवसैनिकाचा राग होता, परंतु ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका ट्विटराईटने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत लस संपत आली तरी पुरवठा नाही | वरवर माया आणि पोटभर जेव ग बया असं केंद्राचं धोरण - महापौर
नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात ब्राझील आणि अमेरिका महाराष्ट्राच्या पुढे आहेत. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संक्रमणाच्या 55,469 नवीन केस आल्या. 34,256 बरे झाले आणि 297 जणांचा मृत्यू झाला. नवीन प्रकरणांचा हा दुसरा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 4 एप्रिलला 57,074 प्रकरणे आली होती.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या महापौरांनी SRA सोसाटीतील फ्लॅट बळकावला | भाजपाचा गंभीर आरोप
वरळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा मारल्यानंतर भाजपने आता शिवसेना मंत्र्यांचे आणि नेत्यांचे अनाधिकृत बांधकामे उघड करण्याचं काम सुरु केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील त्याच पत्त्यावर ८ कंपन्या रजिस्टर | मिळत आहेत महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट
कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच मनसेनं थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य केलं होतं. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला होता.
5 वर्षांपूर्वी -
पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का | कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला - मनसे
कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच मनसेनं थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य केलं आहे. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंदिर-मशिदीच्या निर्माणावर पैसे खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारण्याची गरज | किशोरी पेडणेकर
सध्या जगभरावर कोरोनाचं संकट आहे, मुंबईतही कोरोना महामारी आहे. या संकटातून सगळ्यांना एक धडा मिळाला आहे. मंदिर , मशिदी, चर्च, गुरुद्वारा यांच्या निर्माणासाठी जे पैसे खर्च केले जातात त्यापेक्षा आपल्याला आरोग्य यंत्रणा सुधारणा करण्याकडे लक्ष द्यायला हवं असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मागील ७ दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकळी त्यांची प्राणज्योत मालवली.
5 वर्षांपूर्वी -
प्रकृती बिघडल्याने महापौर किशोरी पेडणेकर बॉम्बे रुग्णालयात दाखल
कोरोना विषाणूने संपूर्ण मुंबईला कवेत घेतले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. शहरातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये नियंत्रणात असलेला कोरोना गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. यात चार दिवसांपूर्वी दररोज 30 ते 35 ने होणारी रुग्णवाढ आता मात्र सरासरी 50 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS