महत्वाच्या बातम्या
-
मुंबई पोलिसांकडून अर्णब गोस्वामीला अजून एक नोटीस | काय आहे कारण?
बनावट टीआरपी घोटाळ्यात (Fake TRP Scam) अडचणीत आलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी आणखी एक दणका दिला आहे. सीआरपीसीच्या कलम १०८ नुसार त्यांच्यावर कारवाई का करू नये, असा सवाल करत मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबावडेकर यांनी अर्णबला १६ ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिक चॅनलचे सीईओ विकास खानचंदानी चौकशीसाठी दाखल
टीआरपी घोटाळा (Fake TRP Case) प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांपुढे रिपब्लिकची धाकधूक | चौकशीला गैरहजेरी | न्यायालतात धाव
टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शिवा सुब्रमण्यम सुंदरम यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. आज त्यांना मुबई पोलिसांपुढे जबाब नोंदविण्यासाठी हजर राहायचे होते. मात्र मुंबई पोलिसांची आक्रमक कारवाई बघता रिपब्लिक टीव्ही वाहिनीवर देखील दडपण असल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Fake TRP घोटाळा प्रकरण | गुन्हे शाखेकडून आणखी 6 जणांना समन्स
टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. रिपब्लिकच्या 4 वरिष्ठ पदावरील व्यक्तींना हे समन्स जारी करण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Republic TV'च्या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार | CFO'ला समन्स
चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबईपोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल दिली. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. आज दुसर्याच दिवशी शुक्रवारी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही सीएफओ (चीफ फायनान्स ऑफिसर) शिवा सुब्रमणियम सुंदरम यांना समन्स बजावले आणि मुंबई गुन्हे शाखेने त्यांना 10 ऑक्टोबरला (शनिवार) चौकशीत हजर राहण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फेक TRP | वाद दोन वृत्तवाहिन्यांमधील | भाजपाची प्रवक्तेगिरी अर्नब गोस्वामीसाठी
अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचं बिंग फोडल्याचा दावा गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
FIR मध्ये इंडिया टुडेचा उल्लेख | आरोपींनी विशेषत: Republic TV वाहिनीचं नाव घेतलं
अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचं बिंग फोडल्याचा दावा गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिक टीव्हीने TRP विकत घेतल्याचा संशय | असत्यमेवजयते - संजय राऊत
पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे नाव आले आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आज फक्त मराठी व बॉक्स सिनेमाच्या चालकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP साठी घरांमध्ये पैसे वाटप | रिपब्लिक TV रडारवर | दोन मराठी चॅनेलचे मालक अटकेत
चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीच्या रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्स रॅकेटमध्ये सहभागी असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अतिउत्साही माध्यमांना मुंबई पोलिसांच्या सूचना | रियाचा पाठलाग करु नये
सुशांतसिंह राजपूत मृत्यू अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.. रिया चक्रवर्तीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रियाने आपला पासपोर्ट जमा करणे देखील गरजेचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी मोहीम चालवण्यात आली | काही प्रसारमाध्यमांकडून खोटी माहिती
सुशांत प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करण्यात आले होते. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या आरोपांना उत्तर दिलं असून आम्ही अत्यंत योग्य पद्धतीने तपास केला होता असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काही जण मुंबई पोलिसांची बदनामी करत खोटी माहिती पसरवत होते असा आरोप केला असून एक मोहीम चालवली जात होती अशी माहिती दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करणाऱ्यांना जाहीर आव्हानही दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकारांची पोलिसांमुळेच सुटका
मुंबईत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं आपल्याला एनडीटीव्ही व एबीपीच्या पत्रकारांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भंडारी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे हे बघा असं सांगत एनडिटिव्ही व एबीपीच्या गुंड पत्रकारांनी आपल्याला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये प्रदीप भंडारी यांना इतर पत्रकारांकडून धक्काबुक्की होताना दिसत आहे. प्रदीप भंडारी यांनी ट्विट करत एनडीटीव्ही आणि एबीपीच्या पत्रकारांचा गुंड असा उल्लेख केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागूच राहणार | पुण्यात?
मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने जमावबंदीचा आदेश काढला आहे. मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासासह एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
माफिया म्हटलं त्यांच्या संरक्षणात कंगनाची ट्विटवर टिवटिव | कोरोना ते कंगणा फक्त कर्तव्य
सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी बॉलिवूडच्या घराणेशाहीवर कंगनानं प्रश्न उपस्थित केले होते. तसंच, बी-टाऊनमधील अनेक बड्या कलाकारांवरही कंगनानं आरोप केले होते. आता तर तिनं थेट मुंबई पोलिसांवर टीका करत नवीन वादाला तोंड फोडलं होतं. भाजप नेते राम कदम यांच्या ट्विटला उत्तर देताना कंगनानं मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय, असं म्हटलं होतं. ‘मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको,’ असं ट्विट तिनं केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांना कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनच्या चौकशीचे आदेश | म्हणून कुटुंबीय घाईत भाजपवासी?
सध्या देशभर फक्त आणि फक्त कंगना रानौत या नावाची चर्चा आहे. शिवसेनेशी पंगा घेणा-या कंगनाच्या अनाधिकृत कार्यालयाचा काही भागावर मुंबई पालिकेने हातोडा चालवला आणि कंगना संतापली. इतकी की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, तिने त्यांच्यावर तोफ डागली. यानंतरही कंगनाचे ठाकरे सरकारविरोधातील ट्विटरयुद्ध सुरुच आहे. काल कंगनाने तिच्या उध्वस्त झालेल्या कार्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर एक ट्विट केले. मी या उध्वस्त झालेल्या कार्यालयात अशाच परिस्थितीत काम करणार. माझे हे कार्यालय जगात स्वत: उभे राहू पाहणा-या महिलांचे प्रतिक असेल, असे कंगना या ट्विटमध्ये म्हणाली.
4 वर्षांपूर्वी -
राज्य पोलिस दलात १५,५९१ कोरोना बाधित | आजपर्यंत १५८ पोलिसांचा मृत्यू
देशात करोनाचा शिरकाव सर्वात आधी केरळमध्ये झाला. केरळमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. सुरूवातीच्या काही दिवसांनंतर राज्यात करोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत गेली. सध्या देशातील एकूण रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच देशात आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी एक महाराष्ट्रातील आहे. काळजी वाढवणारी गोष्ट देशात आतापर्यंत ६६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, यातील २५ हजाराच्या जवळपास रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत बैठका
सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश देताना प्राथमिकदर्शी मुंबई पोलिसांनी कोणतंही चुकीचं काम केल्याचं सूचवत नसल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांनी मर्यादित तपास केला असून एफआयआर दाखल केला नसल्याचं न्यायालयाने निदर्शनास आणलं.
4 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयाची आदेश प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु - मुंबई पोलीस आयुक्त
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय देत, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी आतापर्यंत गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्यास सांगितलं आहे. काही दिवसांपासून मुंबई पोलीस सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास करत होतं. पण मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत हा तपास सीबीआयकडे सोपवला जावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांमध्ये ३०० पेक्षा जास्त पोलीस कोरोना पॉझिटिव्ह | एकाचा मृत्यू
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १२ हजार २९० झाली आहे. या मध्ये पूर्णपणे बरे झालेले ९ हजार ८५० जण, सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ३१५ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १२५ पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | बिहार निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांची बदनामी हा भाजपचा महाराष्ट्र द्रोह
महाराष्ट्र भाजपाकडून झालेल्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला. “बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,” असा हल्लाबोल सावंत यांनी केला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय