महत्वाच्या बातम्या
-
मुंबई पोलीस तुमच्यासाठी प्लाझ्माचे दान सुद्धा करत आहेत, तुम्ही सुद्धा पुढे या
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या लवकरच ४ लाखांचा टप्पा ओलांडणार असे दिसत आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात कोरोनाच्या ७ हजार ९२४ नव्या रुग्णांची भर पडली, यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८३ हजार ७२३ वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून २ लाख २१ हजार ९४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १३ हजार ८८३ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वर्दीतील देव माणूस करतोय चहाविक्रेत्या मुलाला शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत
कोरोना महामारी आणि मुंबईकर यांच्या मध्ये भिंत बनवून उभे राहणारे कोरोना योद्धे म्हणजेच पोलीस कर्मचारी यांना कोरोना महामारीची मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याचे भीषण चित्र मुंबईत निर्माण झाले आहे. मुंबईकरांसाठी गेले चार महिने लढणाऱ्या अनेक कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच प्रमाणे आतापर्यंत या कोरोना योध्यांपैकी अनेक पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आज मध्यरात्री ते १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी, कलम १४४ लागू
मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू असेल. पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असेल. तर सर्वसामान्यांना फक्त आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरपर्यंत बाहेर पडता येईल.
5 वर्षांपूर्वी -
५९ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, घोषणेप्रमाणे एकालाही भरपाई नाही, ठाकरे सरकारविरोधात संताप
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होतं आहे. त्यात मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या शहरांसहित ठाणे, कल्याण डोंबिवली, पुण्यासहीत कोरोनाचं थैमान सुरु आहे. त्यात जीवावर उदार होऊन पूर्ण क्षमतेने रस्त्यावर कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली असून अनेकांचे जीव कोरोनामुळे गेले आहेत. मात्र राज्य सरकारने यावर मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा देखील केली होती, जी फसवी असल्याची भावना पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय व्यक्त करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
केवळ ४८ तासांत १४० पोलिसांना कोरोनाची लागण
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोविड योद्धेही कोरोनाचे शिकार बनत आहेत. गेल्या ४८ तासांत १४० पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाच्या पोलिसांनी घरी थांबावे, आयुक्तांचे आदेश
कोरोना माहामारीवर मात करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन असताना पोलीस खातं मात्र दिवस-रात्र काम करत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पोलीस कर्मचा-यांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरंतर आतापर्यंत ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे हा निर्णय मुंबई पोलिसांकडून घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत पोलिसांकडून तब्बल १५ कोटींचे २५ लाख मास्क जप्त
करोना व्हायरसला रोखण्यामध्ये मास्क अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये मास्कला मोठया प्रमाणात मागणी आहे. मागणी वाढत असल्याने मास्कचा काळाबाजार सुरु आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सूचनेवरुन मास्कचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे आदेश; ३१ मार्चपर्यंत कलम १४४ लागू
मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईत जमावबंदी आदेश लागू केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.
5 वर्षांपूर्वी -
तुम्ही मुस्लिमांचा छळ थांबवा...थेट महाराष्ट्र 'CID'ची वेबसाइट हॅक करून इशारा
महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची (सीआयडी) वेबसाइट हॅक झाल्यानं खळबळ उडाली आहे. हॅकर्सनं दिल्लीतील हिंसाचारादरम्यान मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचा दावा करतानाच, मोदी सरकार आणि पोलीस विभागाला इशारा दिला आहे. हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून केला जात असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची घोषणा करण्यात आली आहे. आज संजय बर्वे निवृत्त झाले त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर परम वीर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. परम बीर सिंह हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते. आता ते मानाच्या मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी घेत आहेत. परम बीर सिंह यांच्या नियुक्तीमुळे हे महत्त्वाचं पद पोलीस महासंचालक दर्जाचंच ठेवण्यात आल्याचं स्पष्ट आहे.
5 वर्षांपूर्वी -
शीना बोरा हत्या: 'त्यांनी' फडणवीसांना चुकीची माहिती दिली होती: राकेश मारिया
मुंबई पोलीस माजी आयुक्त राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांच्या अचानक झालेल्या बदलीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्यांनी तपासादरम्यान आरोपी पीटर मुखर्जी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असा मारिया यांच्यावर आरोप होता. पीटर आपली पहिली पत्नी इंद्राणीची मुलगी शीना हिच्या हत्येचे आरोपी आहेत.
5 वर्षांपूर्वी -
फुकट सेवा? सरकारला खरंच 'डेटा यूटिलिझेशन आणि डेटा सेक्युरीटी' हे विषय कळतात का? सविस्तर वृत्त
पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या मुलाच्या कंपनीने मुंबई पोलिसांसाठी अत्याधुनिक पेपरलेस अशी ‘डिजिटाईज्ड नोटशीट प्लस’ प्रणाली मोफत उपलब्ध करून दिली आहे. काही तांत्रिक कारणामुळे ही प्रणाली अद्याप कार्यान्वित झालेली नाही. मात्र विद्यमान पोलीस आयुक्तांच्या मुलाच्या कंपनीला हे काम मंजूर करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी यात नियमबाह्य़ काहीच नाही, अशी प्रतिक्रिया संजय बर्वे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या 'भगव्या' मोर्चाआधी मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना नोटीस
राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ९ फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. परंतु मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे स्वतः राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
5 वर्षांपूर्वी -
कुठल्या काळात? मुंबई पोलिसांना गरज 'त्या' अत्याधुनिक घोड्यांची; सरकारने दिले 'हे' घोडे
आज मुंबई पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या हत्यारांचा आढावा घेतल्यास गुन्हेगार, गँगस्टर आणि दहशतवाद्यांकडे देखील अत्याधुनिक हत्यारं असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जर पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र असती तर वेळीच दहशतवाद्यांना रोखता आलं असतं असा निष्कर्ष देखील समोर आला होता. आज पोलिसांच्या तुलनेत दहशतवादी आणि गुन्हेगार आधुनिक झाले आहेत हे सत्य आहे. राज्य सरकारने देखील पोलिस दलाच्या अत्याधुनिकीकरणासाठी भरीव निधी देण्याची गरज आहे. मात्र तसं होताना दिसत नाही.
5 वर्षांपूर्वी -
नाईट लाईफ सोडा; इथे पोलिसांची 'लाईफ' घरातच असुरक्षित, स्लॅब कोसळत आहेत
सध्या नाईट लाईफच्या विषयावरून मुंबई शहरातील वातावरण तापलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्लांनिंग मधील नाईट लाईफ हा महत्वाचा प्रलंबित मुद्दा होता. त्यामुळे सरकारमध्ये विराजमान होऊन मंत्रीपद घेऊन त्यांनी प्रथम मुंबईतील नाईट लाईफला मार्गी लावलं आहे. विशेष म्हणजे या विषयावरून सर्वात मोठा ताण हा मुंबई पोलिसांवर पडणार असल्याने विरोधकांनी देखील त्याला विरोध केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्रीची सुटका
मुंबई पोलिसांनी अंधेरी पूर्वेकडील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये चालविले जाणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उध्वस्त केले आहे. पोलिसांनी छापा टाकून २९ वर्षीय महिलेला अटक करण्यात आले आहे. तसेच तीन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पॅरोलवरील कुख्यात दहशतवादी 'डॉ. बॉम्ब' मुंबईतून फरार
१९९३ मधल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी जलीस अन्सारी गुरुवारी मुंबईतून गायब झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो २१ दिवसांच्या पॅरोलवर कुटुंबीयांशी भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर आला होता. आग्रीपाडा पोलीस स्टेशनला तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि क्राइम ब्राँचनं हाय अलर्ट जारी केलं आहे. तसेच दहशतवादी जलीस अन्सारीला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
हायप्रोफाईल SEX रॅकेट उघडकीस; मुंबई पोलिसांकडून दोन बॉलिवूड अभिनेत्री ताब्यात
गोरेगावमध्ये मुंबई पोलिसांनी सेक्स उघडकीस आणले आहे. रॅकेटमध्ये सहभागी असल्याप्रकरणी दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. गोरेगाव पूर्व येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी एक बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवला. माहिती योग्य असल्याची खात्री होताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी एक ३२ वर्षीय आणि २६ वर्षीय अभिनेत्री-मॉडेलला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या अखेर मुसक्या आवळल्या!
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी एजाज लकडावाला याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन त्याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. एजाज लकडावाला मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत होती. २००३ मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला अशी अफवा पसरली होती.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई एमआयडीसी पोलिसांचा फेक कॉल सेंटरवर छापा; १९ अटकेत
मुंबईमध्ये कॉर्पोरेट जगतात देखील अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. परदेशातील नागरिकांना गंडा घालण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरात चक्क खोटे कॉल सेंटर थाटल्याचे याआधी देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत. तसाच अजून एक प्रकार मुंबईतील एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत घडत असल्याचा सुगावा स्थानिक पोलसांना लागला होता आणि त्यावर थेट छापा मारत MIDC पोलिसांनी तब्बल १९ आरोपींना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो