NALCO Share Price | या सरकारी कंपनीच्या शेअरवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट पूर्वी फायदा घेणार का?
NALCO Share Price | शेअर बाजारात सुरू असलेल्या प्रचंड चढ-उताराच्या दरम्यान ‘नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड’ म्हणजेच ‘नाल्को’ कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ झाली आहे. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 82.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 0.06 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील एका महीन्यात या कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढले आहे. ‘नाल्को’ कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यात आपल्या शेअर धारकांना 11.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या स्टॉकने लोकांना 32.65 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. ‘नाल्को’ कंपनीचे बाजार भांडवल 14,784.89 कोटी रुपये आहे. तथापि ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उताराची शक्यता व्यक्त केली आहे. (National Aluminium Company Limited)
2 वर्षांपूर्वी