महत्वाच्या बातम्या
-
मोदींच्या नव्या भारतापेक्षा पाकिस्तान-बांगलादेशातील लोकं जास्त आनंदी - वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट
जगातील आनंदी देश कोणते याचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. फिनलँडचे लोक जगात सर्वाधिक खूश आहेत. महत्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्रांकडून जारी होत असलेल्या या यादीमध्ये ‘वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट’ मध्ये फिनलँड सलग चार वर्षे एक नंबरला आहे. तर भारत 149 देशांच्या या यादीत 139 व्या क्रमांकावर आहे.
4 वर्षांपूर्वी -
जागतिक निद्रा दिन | पेट्रोल-डिझेल, LPG दरवाढ, अर्थव्यवस्था ICU'मध्ये | कुंभकर्ण सरकारला जाग कधी..
देशाची राजधानी दिल्लीच्या दरवाज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू, राज्यात महागाई वाढली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहे. याच कारणावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने त्यांनी या विषयांवर केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू | खा. रामस्वरूप शर्मा फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले
राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फासावर लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. अद्याप मृत्यूचे कारण समोर आलेले नाही.
4 वर्षांपूर्वी -
भविष्यात नरेंद्र मोदींची देवाप्रमाणे पूजा केली जाईल | उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत हे हरिद्वारमधील कुंभ मेळ्यासंदर्भातील कार्यक्रमात भाषण देताना मोदींवर स्तुतीसुमनं उधळत होते. एक काळ असा होता की देशाचे पंतप्रधान परदेशात जायचे तेव्हा त्यांना तिकडे कुणी विचारायचही नाही. यावेळी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना भगवान श्री कृष्ण आणि भगवान श्री राम यांच्यांशी केली आहे. रविवारी हरिद्वारमध्ये नेत्र कुंभाची सुरुवात करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी पंतप्रधान मोदींचं तोंड भरुन कौतुक केलं.
4 वर्षांपूर्वी -
SVLL कंपनीचा बँक ऑफ महाराष्ट्रातील 'तो' १६१० कोटींचा कर्ज घोटाळा | काँग्रेसचे थेट आरोप कोणावर?
चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेला ‘चालक से मालक’ गैरव्यवहाराप्रकरणी मोठं राजकीय वादळ उठलं होतं. सुरतमधील सिद्धीविनायक लॉजिस्टिक्स लिमिटेड (एसव्हीएलएल) या कंपनीच्या ताफ्यातील सहा हजारांहून अधिक वाहनांवर ईडीने टाच आणली होती. मात्र त्यानंतर याप्रकरणी पुढे नेमकं काय झालं याची कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी हे भगवान शंकाराचे अवतार | त्यांनी देशाला कोरोनापासून वाचवलं - भाजपचे मंत्री
काल देशात महाशिवरात्री सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. देशातील अनेक ठिकाणी मंदिरातही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. हिमाचल प्रदेशातही मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिमला येथील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हिमाचल प्रदेशमधील शहरविकास मंत्री असणाऱ्या सुरेश भारद्वाज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकर भगवानाचा अवतार असल्याचे धक्कादायक विधान केले.
4 वर्षांपूर्वी -
बँक घोटाळे, बुडीत कर्जांचं ओझं | देशात बँकांवरील संकट वाढतंय - फिच रेटिंग रिपोर्ट
व्यापारी बँकांकडून मोठे उद्योग व पायाभूत सुविधांसाठी होणाऱ्या पतपुरवठ्यात घट झाल्याबद्दल रिझव्र्ह बँकेने यापूर्वीच चिंता व्यक्त केली होती. देशातील मोठ्या उद्योगांना कर्ज देण्यास बँका तयार नसल्याचे निरीक्षण नोंदवताना बँकांच्या गृहकर्ज पतपुरवठय़ात वाढ ही पोलाद, सिमेंट, उर्जा निर्मिती आणि अन्य पायाभूत सुविधा विकास यासारख्या क्षेत्रांना होणाऱ्या पतपुरवठय़ावर विपरीत परिणाम करत असल्याबद्दलही मध्यवर्ती बँकेने चिंता व्यक्त केली होती.
4 वर्षांपूर्वी -
ममता बॅनर्जींनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला | त्यांचे स्वप्न भंग केले - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. ते कोलकाताच्या ब्रिगेड ग्राउंडमध्ये एका मेगा रॅलीला संबोधित करत आहेत. ते म्हणाले की, ‘गेल्या दशकांमद्ये ब्रिगेड ग्राउंडमध्ये अनेक वेळा नारा देण्यात आला आहे की, ब्रिगेड चलो. या ग्राउंडने अनेक देशभक्त पाहिले आहेत. हे ग्राउंड बंगालच्या विकासामध्ये अडथळा आणणाऱ्यांचाही साक्षीदार आहे. बंगालच्या भूमीला 24 तास उपोषण आणि आंदोलनांमध्ये ठेवणाऱ्यांची धोरणे व षड्यंत्रही या ग्राउंडने पाहिले आहेत’
4 वर्षांपूर्वी -
मोदी पंतप्रधान झाल्यापासून नागरिक स्वातंत्र्य नष्ट होतंय - फ्रिडम हाऊस अहवाल
२०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि अनेक लोकशाही मूल्य पायदळी तुडवली गेल्याची टीका आणि वर्णन यापूर्वी देखील देशात नोंदवलं गेलं आहे. मात्र परदेशातील संस्था देखील ते सर्वेक्षणातून समोर आणत मान्य करत आहेत. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमधून मोदी सरकारवर पुन्हा टीका होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
जस जशी मोदींची दाढी वाढत गेली | तस तसा GDP घसरत गेला | काँग्रेस नेत्याकडून ग्राफिक
कोरोना व्हायरसशी दोन हात करताना आर्थिक आघाड्यांवर घेतलेल्या निर्णयाने अर्थचक्राला चालना देण्यात केंद्र सरकारला काही प्रमाणात यश आले असले तरी २०२० मधील दुसऱ्या तिमाहीपासूनचे विकासदराचे आकडे चिंताजनक होते. २०२० मध्ये ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर (GDP) उणे ७.५ टक्के इतका राहिला होता. तर एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीने ऐतिहासिक उणे २३.९ टक्क्यांचा स्तर गाठला होता.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात दंगल कुठे न कुठे चुकीची होती, हे त्यांनी मान्य करावं - राष्ट्रवादी
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १७७५ ते १९७७ या दरम्यान २१ महिने देशांतर्गत आणीबाणी लावली होती. इंदिरा गांधींचा तो निर्णय भारतीय राजकारणातील वादग्रस्त पान आहे. भाजपसह काँग्रेसचे सर्व विरोधक या निर्णयावर आजही टीका करत असतात. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांनी या विषयावर त्यांच मत प्रदर्शित केलं आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि देशाचे माजी आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांना राहुल गांधी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना आणीबाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली | मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १७७५ ते १९७७ या दरम्यान २१ महिने देशांतर्गत आणीबाणी लावली होती. इंदिरा गांधींचा तो निर्णय भारतीय राजकारणातील वादग्रस्त पान आहे. भाजपसह काँग्रेसचे सर्व विरोधक या निर्णयावर आजही टीका करत असतात. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांनी या विषयावर त्यांच मत प्रदर्शित केलं आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि देशाचे माजी आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांना राहुल गांधी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना आणीबाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना काळात जग ठप्प असतानाही मुकेश अंबानींच्या संपत्तीत 24%, तर अदानींची संपत्ती दुप्पट
कोरोना महामारीमुळे एकीकडे देश आर्थिक संकटांचा सामना करत आहे, तर दुसरीकडे देशातील भांडवलदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2021 नुसार, कोरोना काळात भारतात 40 अब्जाधिशांची वाढ झाली आहे. यासोबतच अब्जाधिशांची संख्या 177 वर पोहचली आहे. या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2020 मध्ये 24% वाढ झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लस घेतानाही निवडणूक मार्केटिंग? | आसामी गमचा, पुदुचेरी केरळच्या नर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशामधील तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरण सुरु झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोरनाची लस घेतली. मोदींनी सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील फोटो पोस्ट केल्यानंतर त्याबद्दलची माहिती समोर आली.
4 वर्षांपूर्वी -
Koo App | खाजगी कंपनीसाठी मोदी सरकार करतंय मार्केटिंग | सरकारी ई-मेलचा वापर
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात चांगलाच संघर्ष पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता लवकरच कू (KOO) या अॅपला संपर्कांचं प्रमुख माध्यम बनवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती प्रसार माध्यमांना प्राप्त झाली होती. ट्वीटर आणि सरकार यांच्यात शेतकरी आंदोलनावरून वाद सुरू झाला आहे. त्यात ट्विटरने ट्रम्प यांना दिलेल्या दणक्यानंतर मोदी सरकार स्वतःच सतर्क झाले आहेत, कारण तसेच प्रकार करण्यात भाजपचा IT सेल माहीर असून उद्या आपल्याला देखील ट्विटरचा दणका बसल्यास मोठी अपमानित होण्याची घटना घडेल अशी शक्यता भाजपच्या मनात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या लोकसभा मतदारसंघात ABVP चा सुपडा साफ | काँग्रेसच्या NSUI'चा दणदणीत विजय
भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत अभाविपचा ( ABVP) दारुण पराभव झाला आहे. निवडणुकीत काँग्रेसच्या NSUI ने मोठा विजय मिळविला आहे. एकूण 8 जागापैकी 6 जागा जिंकत NSUI ने अभाविपला जोरदार धक्का दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मीडिया वापरताय | मग मोदी सरकारचे हे नवे नियम समजून घ्या... अन्यथा
केंद्रीय आयटी व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया कंपनी भारतात व्यवसाय करू शकते. पण त्याचा गैरवापर होता कामा नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. सोशल मीडियावरुन अनेक वेळा चुकीची माहिती पसरवली जाते. यामुळे सुसंस्कृत समाजात तेढ निर्माण होत आहेत. अशा तक्रारीही समोर आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मी सुद्धा आमच्या शेतात एक स्टेडियम बनवून त्याला 'श्याम रंगीला स्टेडियम' नाव देणार
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं . स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर कालपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्था धोक्यात आहे | तरुणांना रोजगार हवा आहे | मोदींच ते ट्विट व्हायरल
सोशल नेटवर्कींगवर मागील काही दिवसांपासून रोजगारासंदर्भातील विषय चांगलाच चर्चेत आहे. ‘मोदी रोजगार दो’ हा ट्रेण्ड रविवारी आणि सोमवारी ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग टॉपिकमध्ये होता. मोदीजी, भाषणं नको रोजगार द्या असं म्हणणारे लाखो ट्विट करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दरवाढीची झळ सर्वसमान्यांना | महागाईत वाढ | भाज्या महागल्या
इंधन दरवाढीमुळे आता सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. इंधनदरवाढीचा परिणाम भाजी मंडईवर जाणवू लागला आहे. आठवड्याभरात भाज्यांच्या किंमतीत किमतीत १५ ते २० रुपयाने वाढ झाली आहे. त्याची झळ सर्वसमान्यांना सोसावी लागत आहे. सातत्याने होणार्या इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक तसेच किरकोळ भाजीपाला बाजारावर जाणवू लागला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार