महत्वाच्या बातम्या
-
Pune Modi Temple | देव चोरीला गेला, पेट्रोल-गॅस दरवाढ कमी करण्यासाठी आता आम्ही कुणाला साकडे घालायचे? राष्ट्रवादीचा सवाल
पुण्यातील औंध भागात पंतप्रधान मोदिंचे मंदिर बांधण्यात आले होते. या मंदिरात पंतप्रधानांचा पुतळाही बसवण्यात आला होता. मयुर मुंढे या भाजप कार्यकर्त्याने हे मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आल्यामुळे रातोरात हे मंदिर हटवण्यात आले आहे. तसेच मोदींचा पुतळाही हलवण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Pune Narendra Modi Temple | नरेंद्र मोदींच्या 'त्या' मंदिरातील मूर्ती रातोरात हलवली | कारण...
पुण्यातील औंध परिसरात मयूर मुंडे नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले होते. परंतु आता मात्र या मंदिरातील मोदींची मूर्ती इतर ठिकाणी हलवली असल्याची माहिती समोर येत आहे. रात्रीतून ही मूर्ती दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली आहे..ही मूर्ती एका नगरसेवकाच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट । वर्षभरात लोकप्रियता 66 टक्क्यांनी घसरून 24 टक्क्यांवर - सर्वेक्षण
इंडिया टुडेच्या या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे. एकाच वर्षात मोदींची लोकप्रियता 66 टक्क्यांनी कमी होऊन 24 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. भारतासाठी सर्वात उपयुक्त पंतप्रधान कोण असेल? असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता.
3 वर्षांपूर्वी -
अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल-कांदे होते, पण मोदींसारखा नेता नव्हता। नेटिझन्स म्हणाले ट्विटचे ५ रुपये क्रेडिट केले
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
पुणे | नमो फाऊंडेशनच्यावतीने बांधण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर
पुणे शहर हे अनेक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तिथे विविध प्रकारचे पेशवेकालीन मंदिर आपल्याला बघायला मिळतात. पण आता पुण्यातील औंधमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. नमो फाऊंडेशनचे मयूर मुंडे यांच्या संकल्पनेतून हे मंदिर बांधण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
स्वातंत्र्यदिनी सुद्धा? | भारतीयांनो, मोदींनी २०१९ पासूनची जुनी घोषणा नामकरण करत पुन्हा २०२१ मध्ये चिकटवली - पोलखोल
75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’
3 वर्षांपूर्वी -
75 वा स्वातंत्र्यदिन | जर आपल्याकडे स्वत:ची लस नसती तर? | पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केलं
75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’
3 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारला धक्का | नव्या IT नियमांतील डिजिटल मीडिया संबधित नियम ९ला हायकोर्टाकडून स्थगिती
नागरिकांच्या भाषा व विचार स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या नव्या आयटी नियमांतील नियम ९ला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली असून केंद्र सरकारसाठी हा खूप मोठा धक्का ठरला आहे. नव्या आयटी नियमांना आव्हान देणाऱ्या याचिका ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे व दी लीफलेट यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केल्या असून या याचिकांवर मुंबई हायकोर्टाने आज अंतरिम निर्णय देत केंद्राच्या नव्या माहिती आणि तंत्रज्ञान नियमांतील नियम नऊला स्थगिती दिली.
3 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी काही भारताचे राजे नाहीत | भाजप खासदाराने प्रतिक्रिया देताना झापलं
पंतप्रधान मोदी हे काही भारताचे राजे नाहीत”, हे शब्द विरोधी पक्षाच्या नेत्यांचे नाहीत तर भाजपाच्या एका खासदाराचे आहेत. विशेष म्हणजे तुम्ही मोदीविरोधी आहात असं म्हटल्यानंतर एका भाजपा समर्थकालाच या शब्दांमध्ये थेट ट्विटरसारख्या सार्वजनिक माध्यमातून हे खडे बोल या खासदाराने सुनावले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | CCTV फूटेजमध्ये महिला खासदारांना धक्काबुक्की | महिला खासदारांची केंद्रावर टीका
संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यसभेत बाहेरच्या लोकांना आणून महिला खासदारांना मारहाण | विरोधकांची मोदी सरकारवर जोरदार टीका
राज्यसभेत झालेल्या गोंधळावरून विरोधी पक्ष चांगलाच भडकलेला आहे. राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी बुधवारी राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राऊत म्हणाले, खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना बोलावता ही कसरी मर्दानगी?
3 वर्षांपूर्वी -
देशात ऑक्सिजन टंचाईमुळं रुग्णांचा मृत्यू झाल्याची केंद्राची कबुली | आधी दिला होता नकार
कोरोना काळात ऑक्सिजन अभावी लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आंध्र प्रदेशात ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही लोकांचा मृत्यू झाला होता. काही रुग्ण व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर होते. दुसऱ्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयने मंगळवारी संसदेत दिली. केंद्र सरकारद्वारे पहिल्यांदाच याची कबुली देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदींचा मतदासंघ पुरामुळे पाण्याखाली | लोकप्रतिनिधी आठवडाभर फिरकलेच नाही | स्थानिकांचा रोष
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत पुराचा जोरदार फटका बसला आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातील पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. पूराच्या तडाख्यातून वाराणसीतील गावंही बुडाली आहे. वाराणसीत गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनारच्या गावांचा त्याचा फटका बसला आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपने आधी जातीनिहाय जनगणनेला विरोध केला, आता भाजपनेच राज्यांना दिला अधिकार | भाजप खासदाराचा सवाल
लोकसभेत मंगळवारी इतर मागासवर्गाशी (OBC) संबंधित दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर झाले. सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. १२७ वी घटनादुरुस्ती-२०२१ विधेयकावर चर्चेनंतर मतदान घेण्यात आले. त्याच्या समर्थनार्थ ३८५ मते पडले, विरोधात एकही मत पडले नाही. आता बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल. सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याने राज्यसभेतही चर्चेनंतर हे विधेयक मंजूर होणे निश्चित आहे.
3 वर्षांपूर्वी -
सर्व गोष्टी या मार्केटिंगचा भाग आहेत, मार्केटिंगच सर्वकाही आहे | बॅनरवरून जागतिक खेळाडूचा मोदींना टोला
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव उंच करण्याऱ्या विजेत्यांचा सत्कार काल(९ ऑगस्ट) दिल्लीत करण्यात आला. नवी दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेलं बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अधिक मोठ्या आकाराचा लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
टोक्यो ऑलिम्पिक पदकवीरांचा सत्कार | भव्य कामगिरी करणारे खेळाडू बॅनरवर 'मायक्रो' झाले तर मोदी भव्य
टोकियो ऑलिम्पिकमधील चमकते तारे नीरज चोप्रा, रवी दहिया, बजरंग पुनिया, लवलिना बोर्गोहेन आणि टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकीपटू देशात परतले आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. ऑलिम्पिक चॅम्पियन्सचे बँड-बाज्यासह स्वागत करण्यात आले. हे सर्व खेळाडू विमानतळावरून थेट अशोका हॉटेलमध्ये जात आहेत. सर्व खेळाडूंचा ताफा हॉटेलकडे रवाना झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
PM किसान सन्मान निधीचा हफ्ता मोदींनी स्वतःच्या बँक खात्यातून ट्रान्सफर केल्याप्रमाणे अनेक माध्यमांच्या हेडलाईन्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन संवाद साधल्यानंतर देशातील PM किसान सन्मान निधी अंतर्गत तरतूद करण्यात आल्याप्रमाणे भारत सरकारने आज देशातील 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता जमा केला. आभासी पद्धतीने देशभरातील 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 19500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
राज्यसभेत 8 विधेयके विरोधकांशी चर्चेशिवाय झाली मंजूर | संजय राऊतांकडून चिंता व्यक्त
संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात होऊन तीन आठवडे होत आले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांचा पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदा आणि महागाईवरुन गदारोळ कायम आहे. परंतु, संसदेच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यसभेत 8 विधेयके मंजूर करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाज तासनतास तहकूब करावे लागत आहे. या आठवड्यात कामकाजामध्ये वाढ झाली असून 13.70% वरुन हे 24.20% आले आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 32.20 टक्के काम पहिल्या आठवड्यात झाले.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | चक्क 'नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद' | नेमका विषय काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मीडियासमोर यायला घाबरतात अशी टीका मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून केली जाते. असं असतानाच आज मात्र महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पत्रकार परिषदेतील फोटो पोस्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलेल्या या फोटोची सध्या समाज माध्यमांवर चर्चा आहे.
3 वर्षांपूर्वी -
हे फक्त नावच बदलू शकतात, उद्या भारताचं नाव USA करतील | ऑलिम्पिक विजेत्याकडून मोदींची खिल्ली
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली होती. मोदींनी यासंदर्भातील ट्विट केल्यानंतर गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची नावं बदलून प्रसिद्ध खेळाडूंची नावं द्याची अशी मागणी जोर धरू लागताच भाजप नेते शांत झाले.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News