महत्वाच्या बातम्या
-
आपत्तींमुळे संपूर्ण वर्षच खराब आहे हा विचार करणं चुकीचं - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत आहेत. भारतावर कोरोनाचं संकट असताना, भारत कोरोनाशी सामना करत असतानाच यादरम्यान भारत शेजारील देशाकडून येणाऱ्या आव्हानांचाही सामना करत आहे. परंतु भारत मैत्री निभावतो तसं वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देत असल्याचं सांगत मोदींनी चीनला इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मेहूल चोक्सीवरून भाजपचा काँग्रेसवर आरोप, इथे व्हिडिओत मोदी 'हमारे मेहुल भाई'?
आज राजीव गांधी फाऊंडेशनवर गंभीर आरोप करताना भाजपाध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेसने राजीव गांधी फाऊंडेशनसाठी मेहूल चोक्सीकडून का देणगी घेतली होती. तसेच त्याला कर्ज का दिले होते. मेहूल चोक्सीने राजीव गांधी फाऊंडेशनला देणगी का दिली होती आणि मेहूल चोक्सी आणि राजीव गांधी फाऊंडेशन यांच्याता काय संबंध होते हे देशासमोर आले पाहिजे.’’ पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेला मेहूल चोक्सी सध्या भारतातून फरार आहे.
4 वर्षांपूर्वी -
चीनच्या अध्यक्षांना न दुखावण्याच्या हेतूनं मोदींनी चीनची घुसखोरी नाकारली का? - पृथ्वीराज चव्हाण
आज काँग्रेसने देशभरात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद आयोजित केली. चीनची घुसखोरी, अतिक्रमण मान्य नाही, असं काँग्रेसने म्हटलं आहे. चीनने घुसखोरी केली नाही, असं पंतप्रधानांनी का म्हटलं? असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. देशाच्या संरक्षणासाठी केंद्राच्या सर्व निर्णयांना आम्ही सहकार्य करणार आहे. लडाखमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चीनची घुसखोरी कदापि मान्य नाही.
4 वर्षांपूर्वी -
LIC मधील हिस्सा विकण्यासाठी केंद्राकडून जोरदार हालचाली, वर्षाखेरीस IPO येणार
६४ वर्षांच्या जुन्या एलआयसीमधील आपला हिस्सा विकण्याच्या जोरदार हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. त्यासाठी लवकरच आयपीओ आणण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. निर्गुंतवणूक मंत्रालयाने यासाठी बोली मागवल्या असून त्यासाठी १३ जुलै ही अंतिम तारीख आहे. सरकार आपला नेमका किती हिस्सा विकणार आहे हे अजून ठरलेले नाही. मात्र काही हिस्सा सरकार विकणार आहे एवढे नक्की.
4 वर्षांपूर्वी -
मजुरांवरील संकटाला स्वतःसाठी संधी बनवू नका, विशाल ददलानीचा पंतप्रधांना टोला
ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी या योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.
4 वर्षांपूर्वी -
स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार - पंतप्रधानांची घोषणा
ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी या योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.
4 वर्षांपूर्वी -
देशाचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत - पंतप्रधान
भारताचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. लडाखमध्ये आपल्या देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन करुन कुणीही घुसखोरी केलेली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपले लष्कर, जवान हे देशाची रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रहित हेच आपल्या सगळ्याचं लक्ष आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
...तर राज्यसभेतही भाजपच्या नेतृत्वाखालील NDA बहुमताच्या जवळ असेल?
देशाच्या 8 राज्यांतील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. यात आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 3, झारखंडमधील 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. यापैकी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार लढाई होणार आहे. या सर्व 19 जागांसाठी मतमोजणी होऊन विजयी जागांचे चित्र आज सायंकाळीच स्पष्ट होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारत-चीन विवाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक
पूर्व लडाखमध्ये गलवाण खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. येत्या १९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या आर्थिक सल्लागार आशिमा गोयल यांच्याकडून आत्मनिर्भर पॅकेजवर प्रश्नचिन्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा करताना त्यासाठी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधत या पॅकेजची घोषणा केली होती. नरेंद्र मोदींनी सांगितलं होते की, “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगातील मोठा पक्ष आजही काँग्रेस नेत्यांच्या फोडाफोडी भरोसे निवडणूक रिंगणात - सविस्तर
गुजरातमध्ये राज्यसभा निवडणूक होत असून, त्यापूर्वी राजकीय धक्के जाणवू लागले आहेत. काँग्रेसनं दोन उमेदवार उतरवले असून, भाजपानं तीन उमेदवार दिले आहेत. भाजपानं संख्याबळ नसताना तिसऱ्या जागेची खेळी केली आहे. ती यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी गुरूवारी राजीनामे दिले होते. त्यानंतर आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्यानं राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या ८ वर गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आता शेतकऱ्यांना आपला माल थेट कंपन्यांना विकता येणार, केंद्रीय कॅबिनेटचे नवे निर्णय
कोरोनाच्या संकटात आज मोदींच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, या बैठकीत सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या सहा मोठ्या निर्णयांमध्ये तीन निर्णय हे शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. आता देशातील शेतकर्यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट आपला माल कंपन्यांना विकता येणार आहे. तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा, APAC कलमातील सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडून मेहूल चोकसी व रामदेव बाबांसह ५० कर्जबुडव्यांचं कर्ज माफ, संतापाची लाट
“करोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर प़डू शकतात. ही आपल्यासाठी संधी आहे. राज्यांनी ही गुंतवणूक आपल्याक़डे आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा” असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. सध्या देशांतर्गत आर्थिक घडामोडींवरून अशा घटना घडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनेक चुकीच्या तसेच सामान्यांच्या हिताच्या नसलेल्या गोष्टी घडल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कठोर निर्णयासाठी मी तुमची माफी मागतो - पंतप्रधान मोदी
कोरोना व्हायरसचं देशभरात वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. या लॉकडाऊनंतर जनतेला सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये जनतेची माफी मागितली आहे. कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे त्यामुळेच काही कठोर निर्णय घावे लागले. त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. लॉकडाऊन करणं गरजेचं होतं अन्य़था कोरोना संसर्ग वेगानं पसरला असता असं ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
देशाला चिंता डॉक्टर्स, नर्सेस व पोलिसांची...अनुपम खेर यांच्या आईला मोदींची चिंता
देशातील कोरोना विषाणूचे संकट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात ८५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातमधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वी सूरतमध्ये एका ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याची पुष्टी झाली असून देशातील मृत्यांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असून हा आकडा वाढतच आहे.
5 वर्षांपूर्वी -
रात्री १२ वाजल्यापासून २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन; जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच
देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यावाचून कोणताही पर्याय नाही. त्यामुळेच मंगळवारी मध्यरात्रीपासून घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. २१ दिवस हे निर्बंध लागू असतील. देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये त्यांनी ही घोषणा केली.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात पैसा पुतळे उभारण्यात; आज ३६,००० भारतीयांसाठी एक क्वारंटाईन बेडची वेळ
कोरोना व्हायरस देशभर पसरू नये, म्हणून केंद्र सरकारने वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. मात्र कोरोनाने सध्या साऱ्या जगात धुमशान घातले आहे. भारतातही मोठ्या वेगाने हा विषाणू पसरत आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात असला तरी, देशात ३०० पेक्षा अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यात केंद्रीय आरोग्य विभागाचा एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये सध्या रुग्णालयांमध्ये ८४,००० भारतीयांसाठी एक बेड, तर, ३६,००० भारतीयांसाठी एक क्वारंटाईन बेड आहे. कोरोनाव्हायरसने थैमान घातल्यानंतर सरकारच्या वतीने ही आकडेवारी गोळा करण्यात आली. काही राज्यांमध्ये तर ११,६०० भारतीयांसाठी एकच डॉक्टर असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी चीन-अमेरिकेने काय केलं? आणि मोदींनी 'टाळी व थाळी' - सविस्तर वृत्त
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनपेक्षाही इटलीमध्ये मृतांची संख्या वाढली आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाने ११ हजारांवर बळी घेतले आहेत. तर भारतात अद्याप चार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात आलेला आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता असून आज कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांची आकडेवारी मोठी असल्याने देशासमोर धोक्याची घंटा वाजत आहे.
5 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प'साठी १२० कोटी खर्च आणि कोरोना लढ्यासाठी फक्त टाळ्या आणि थाळी
कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत सरकारने आपली रणनीती बदलली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. भारतात २७१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आता सरकारने सर्व रुग्णालयाच न्यूमोनियाच्या रुग्णांचीही तपासणी केली जाणार आहे. यासाठी सर्व राज्यांना आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी, न्यूमोनिया झालेल्या सर्व रुग्णांना एनसीडीसी किंवा आयडीएसपीला कळवावे, जेणेकरुन त्यांच्या COVID-19 ची तपासणी करता येईल, असे सर्व रुग्णालयांना सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
#JantaCurfew: २२ तारखेला देशात 'जनता कर्फ्यु' पाळा - पंतप्रधान
चीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलाय. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतातही चार जणांना करोना व्हायरच्या संसर्गानं प्राण गमवावा लागलाय. पंजाब, दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत प्रत्येकी एक बळी गेलाय. तर देशाभरात १७३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वात जास्त अर्थात ४४ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करत होते.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News