महत्वाच्या बातम्या
-
प्रवासी विमानांना भारतात प्रवेश बंदी; तर देशातील वरिष्ठ नागरिकांसाठी महत्वाची सूचना
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. २२ मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
'५०% कर्मचारी वर्क फ्रॉम होम'...केंद्र सरकारची सूचना
जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूने देशात कहर माजवला आहे. चीनमधून विविध देशात पसरलेल्या या जीवघेण्या विषाणूने भारतात ही एन्ट्री केली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशवासियांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सार्क ( ८ राष्ट्रांचा समावेश असणारी दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संस्था) राष्ट्रांना कोरोना विषाणूविरोधात लढण्याचा मंत्र दिल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशवासियांना संबोधित करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या मंत्रिमंडळातील कोरोना संशयित रुग्ण म्हणून या मंत्र्याला कॉरंटाईन शिक्का...सविस्तर
राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. परदेशातून परतल्यानंतर ज्यांना १०० टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटावी, यासाठी त्यांच्या डाव्या हातावर खास शिक्का उमटवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देखील दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: आपण मिळून आकस्मिक निधी उभा करू, मोदींचे सार्क'ला आवाहन
चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता जगभरात संकट निर्माण केले आहे. या जागतिक साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर सार्कचे (आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना) सदस्य असणाऱ्या राष्ट्रांच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. या खास चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाबरून न जाता संकटाशी लढणे हाच आपला मंत्र असल्याचे सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुका कशाला हव्या? सरळ IPL सारखा लिलाव करा...
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्याची आणि देशाची सेवा करण्याचा त्यांचा हेतू आहे पण पक्षात राहून या गोष्टी करणं कठीण आहे. त्यांच्या या निर्णयावर बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ज्योतिरादित्य यांच्या काँग्रेस सोडण्यावर राग व्यक्त करत म्हटलं की, देशातील निवडणूका बंद केल्या पाहिजेत आणि आयपीएल ऑक्शन सुरू केलं पाहिजे. यासोबतच अनुभव यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, देशसेवा करण्यासाठी थोडा वेळही वाचेल.
5 वर्षांपूर्वी -
विवाह सोहळ्यात लग्नकार्य सोडून भाजप नेत्यांनी रचला होता फोडाफोडीचा कार्यक्रम - सविस्तर वृत्त
ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला. त्यांना भाजपमध्ये घेण्याच्या घडामोडींमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीच महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सकाळी अमित शहा यांची ज्योतिरादित्य शिंदे यांनी भेट घेतली. त्यानंतर शिंदेंना घेऊन अमित शहाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले होते. नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतरच ज्योतिरादित्य शिंदे याचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
'लोकशाहीची हत्या हाच भाजपचा हेतू आहे', ज्योतिरादित्य शिंदेंचं ते ट्विट
मध्य प्रदेशातील राजकीय भूकंप आणत काँग्रेसला धक्का देणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे उद्या भोपाळला जाणार असून ते १३ मार्चला राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या येण्याने आम्हाला आनंद होत असून त्यांना पक्षात मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेस असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मोदींची स्तुति करत ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपात प्रवेश
मध्य प्रदेशातील राजकीय भूकंप आणत काँग्रेसला धक्का देणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे उद्या भोपाळला जाणार असून ते १३ मार्चला राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या येण्याने आम्हाला आनंद होत असून त्यांना पक्षात मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेस असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ट्विट पुरावा बघा! मोदींच्या नोटबंदीला मास्टरस्ट्रोक म्हणणाऱ्याने YES बँक बुडवली
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी २०१६ मध्ये मोदींनी घोषित केलेल्या नोटबंदीला मास्टरस्ट्रोक असं म्हणत त्या निर्णयाची प्रशंसा केली होती. तसेच हा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे सांगताना त्या संदर्भात स्वतः येस बँकेच्या नवे एक प्रेस परिपत्रक ९ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रसिद्द केलं होतं (परिपत्रक येथे वाचा). त्यात त्यांनी भविष्यत बँकिंग व्यवस्थेला होणारे फायदे मुख्यत्वे अधोरेखित केले होते. मात्र, आज इतर बँकांची आणि विशेष करून येस बँकेची आर्थिक स्थिती किती भीषण आहे ते वेगळं सांगायला नको.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - मी ईश्वराला पाहिलं नाही, पण मोदीजी मी तुम्हाला पाहिलंय...सविस्तर वृत्त
‘मी ईश्वराला पाहिलं नाही, पण मोदीजी मी तुम्हाला पाहिलंय’… एका महिलेचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले इतकंच नाही तर त्यांना अश्रू आवरणंही कठिण झालं. जन औषधी दिवसानिमित्तानं आज पंतप्रधानांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी, अर्धांगवायूनं पीडित एका महिलेनं पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधला. ‘जन औषधांमुळेच आज माझी प्रकृती सुधारत चाललीय आणि खर्चही कमी झालाय’ असं या महिलेनं पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
भाजपकडून कोरोना व्हायरस भीती झाली 'जाहिरातबाजी'ची संधी; नेटिझन्सनी झाडले
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लोकांमध्ये मास्क वाटले, त्यावर ‘कोरोना व्हायरस संसर्ग सेव्ह मोदीजी’ असा मजकूर असं;असल्याचं पाहायला मिळालं. कोलकातामध्ये कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी जनजागृती मोहिमेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी लोकांना मास्क वाटले. सोशल मीडियावर, भाजपाच्या या जनजागृती मोहिमेमागील मार्केटिंगची जोरदार चर्चा रंगली असून भाजपवर सडकून टीका देखील केली आहे. कारण येथे देखील निवडणूक जवळ आल्याने मोदींचा प्रचार सुरु झाला असून कोरोनोवाला संधी समजून जाहिरातबाजी सुरु झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
एका बाजूला पगारवाढ संदर्भात कायदा; दुसऱ्या बाजूला पीएफ कपातीचा झटका
केंद्र सरकारनं देशातील नोकदारांना मोठा धक्का दिला असून ईपीएफच्या (EPF) कपात करण्यात आली आहे. मोदी सरकारने पीएफचे व्याजदर ०.१५ टक्क्यांना घटवले आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता नोकरदारांना २०१९-२०मध्ये जमा झालेल्या त्यांच्या ईपीएफवर ०.१५ टक्के कमी व्याज मिळेल. २०१८-१९मध्ये हा व्याजदर ८.६५ टक्के होता. आता ८.५० टक्के व्याज मिळेल. ईपीएफओच्या विश्वस्ताचंया केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक पातळीवर फारसी चांगली कामगिरी होत नसल्याने ईपीएफओच्या गुंतवणुकीला फटका बसला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे होळी मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा मोदींचा निर्णय
जगभरातील तज्ज्ञांकडून मोठ्या संख्येने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. जगभरात पसरणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आपण होळी खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचा 'सोशल मीडिया' एक्सिट ठरला स्टंट; सरळ उपक्रम जाहीर करणं शक्य होतं
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार नाहीत. तर 8 मार्चपासून महिलांना मोदींचं ट्वीटर अकाऊंट चालण्यासाठी देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ट्वीट करत मोदींनी यासंबंधी माहिती दिली आहे. खरंतर आपण सगळे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार असल्याचं ट्वीट मोदींनी सोमवारी केलं होतं. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता मोदींनी खुलासा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींची सोशल मीडिया एक्सिट हे सोशल मीडियावरील बंदी वा नियंत्रणाचं पहिलं पाऊल?
भाजपच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचे आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम आणि यू-ट्युब सोडण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करेन असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्लाः सुसाइड बॉम्बरला मदत करणाऱ्याला अटक; स्फोटकांची ऑनलाइन खरेदी
मागील वर्षी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश आले आहे. एनआयने शुक्रवारी आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दारला मदत करणारा शाकिर बशीरला अटक केली आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी शाकिर बशीरने आत्मघातकी हल्लेखोर दारला राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
देशात लोकशाही केवळ निवडणूकी पुरती शिल्लक - प्रकाश सिंह बादल
सलग ३ दिवस हिंसाचाराने होरपळल्यानंतर दिल्ली आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हिंसाचारग्रस्त भागातल्या रस्त्यांवर पडलेले दगड, इतर वस्तू यांची साफसफाई सुरु आहे. दिल्लीची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. काल संध्याकाळी किंवा आज सकाळी हिंसा झाल्याची कोणतीही घटना अद्यापपर्यंत घडलेली नाही. सीएए आणि एनआरसी कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात गेल्या रविवारी दगडफेक झाली. त्यानंतर ३ दिवस पूर्व दिल्ली पेटत राहिली. या हिंसाचारात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचार: भाजप नेत्यांवर ठपका ठेवणाऱ्या न्यायाधिशांची रातोरात बदली
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली केली आहे. राष्ट्रपतींनी न्यायाधीश मुरलीधरन यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहावे असे आदेश दिल्याचे त्या बाबतच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
संयुक्त राष्ट्राच्या अहवालात १० वर्षात गरिबी कमी झाली त्यात काँग्रेसचा काळ सर्वाधिक - सविस्तर
अहमदाबादमधील मोटोराच्या क्रिकेट स्टेडियमवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखोच्या जनसमुदायाला संबोधित केले. दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी ‘नमस्ते ट्रम्प’ या जंगी कार्यक्रमातील आपल्या भाषणात भारतातील अनेक गोष्टींचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वामुळे भारत गरीबीतून बाहेर पडतोय असं म्हणताच मोदींच्या चेहऱ्यावर साह्य फुललं. मात्र ट्रम्प यांच्या भाषणातील काही मुद्दे मोदी सरकारच्या विविध योजनांचे होते आणि त्यातील वास्तव वेगळंच असताना ट्रम्प यांनी जे मांडलं ते भारत सरकारनेच लिहून दिलं होतं का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यातील सर्वात आश्चर्यकारक उल्लेख म्हणजे मोदींमुळे देश गरिबीतून वेगाने बाहेर पडत आहे. यावरून ट्रम्प यांनी अधिकृत माहिती नेमकी कुठून मिळाली हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी गरिबी झपाट्याने कमी केली? ट्रम्प यांचं विधान खोटं; काय आहे MPI रिपोर्ट? - सविस्तर
अहमदाबादमधील मोटोराच्या क्रिकेट स्टेडियमवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखोच्या जनसमुदायाला संबोधित केले. दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी ‘नमस्ते ट्रम्प’ या जंगी कार्यक्रमातील आपल्या भाषणात भारतातील अनेक गोष्टींचे कौतुक केले. भारतीयांच्या क्षमतेवर भाष्य करताना ट्रम्प यांनी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती