महत्वाच्या बातम्या
-
गुजरातमध्ये भाजपची २० वर्ष सत्ता; पण आधुनिक शाळांसाठी मेलेनिया ट्रम्प दिल्लीला: सविस्तर वृत्त
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया यांच्याबरोबर दिल्लीतील सरकारी शाळांच्या दौऱ्यात आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सहभागी होणार नाहीत. केंद्र सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव कार्यक्रमातून हटवल्याचा आरोप आपमधील सूत्रांनी केला होता.
5 वर्षांपूर्वी -
अतिथि देवो भव:! तुमच्या स्वागतासाठी आमच्या सरकारने उंच भिंत बांधली आहे: प्रियांका चतुर्वेदी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर आमगन झालं आहे. त्यांच्या स्वगताला स्वत: पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली होती. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील. यानिमित्त अहमदाबाद येथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
RBI एकट्यानं महागाई नियंत्रणात आणू शकत नाही, RBI'चे माजी गव्हर्नर सी रंगराजन
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी रिझर्व्ह बँक एकट्यानं महागाई नियंत्रणात आणू शकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कारण पुरवठा मागणीसंदर्भात सरकारनं आवश्यक व्यवस्थापन करण्याची गरज आहे. ‘नवीन आर्थिक धोरणं आणि त्याचा अर्थ’ या शीर्षकाखालील एका पत्रकावरील चर्चासत्रादरम्यान त्यांनी महागाई रोखण्यासाठी आरबीआयच्या मर्यादा अधोरेखित केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात: मोटेरा स्टेडिअमच्या बाहेरील गेटमधून ट्रम्प आत जाणार होते; तो गेटच कोसळला
देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला येत असलेले सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष या स्टेडिअममध्ये येणार आहेत. मात्र, आज एक धक्कादाय़क घटना घडली आहे. या स्टेडिअममध्ये ज्या गेटमधून ट्रम्प जाणार होते ते तात्पुरते उभारलेले गेटच कोसळले आहे. यामुळे ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सीआयए सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबतची बैठक संपली
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहचले. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेण्यासाठी पोहोचले. दरम्यान ही बेत तब्बल १ तास चालली ज्यामध्ये राज्यासंबंधित अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तेथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा गुजरात दौरा; भारत म्हणजे फक्त गुजरात नाही: राष्ट्रवादी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ‘हाऊडी मोदी’प्रमाणे ‘नमस्ते ट्रम्प’ असा कार्यक्रम होणार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समितीच्यावतीने ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रित करावे, याचे सर्व अधिकार हे अयोजन समितीकडेच असल्याची माहिती देखील रवीश कुमार यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'लिट्टी चोखे'वर प्रेम उफाळून आलं आहे; बघा बिहारमध्ये निवडणूक नाही ना? रुचिरा चतुर्वेदी
एखाद्या राज्यात निवडणूक आली की त्या राज्यातील एखाद्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथल्या लोकप्रिय गोष्टींना प्रसिद्धीचं माध्यम बनवतात. आजवर त्यांनी असे प्रयोग केले आहेत आणि अजूनही तेच प्रकार सुरु असल्याचं दिसत आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर मोदी-शहांची पूर्ण हवाच निघून गेली आहे. त्यात बिहार आणि प. बंगालच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा गुजरात दौरा; भिंतीने झाकल्यानंतर त्या कुटूंबांना आता घरं खाली करण्याची नोटीस
राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्या भारत दौऱ्यासाठी आपण अत्यंत उत्साही असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये विमानतळापासून ते मोटेरा स्टेडिअमपर्यंत ५ ते ७ लाख लोक माझं स्वागत करतील, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या भारत दौऱ्यात मोटेरा स्टेडिअमच्या नूतनीकरणानंतर निर्माण झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअमचं लोकार्पण करणार आहेत. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडिअम असेल.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या अविकसित गुजरातच्या भिंती इंग्लंडच्या प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या; देशाचे वाभाडे
राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्या भारत दौऱ्यासाठी आपण अत्यंत उत्साही असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये विमानतळापासून ते मोटेरा स्टेडिअमपर्यंत ५ ते ७ लाख लोक माझं स्वागत करतील, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या भारत दौऱ्यात मोटेरा स्टेडिअमच्या नूतनीकरणानंतर निर्माण झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअमचं लोकार्पण करणार आहेत. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडिअम असेल.
5 वर्षांपूर्वी -
गुजरातचं वास्तव भिंतीआड झाकत मोदी-ट्रम्प भेटीवर चक्क १०० कोटी खर्च होणार
राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्या भारत दौऱ्यासाठी आपण अत्यंत उत्साही असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये विमानतळापासून ते मोटेरा स्टेडिअमपर्यंत ५ ते ७ लाख लोक माझं स्वागत करतील, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या भारत दौऱ्यात मोटेरा स्टेडिअमच्या नूतनीकरणानंतर निर्माण झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअमचं लोकार्पण करणार आहेत. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडिअम असेल.
5 वर्षांपूर्वी -
पुलवामा: शहिदांच्या कुटुंबीयांची उपेक्षा, अनेक आश्वासनांची पूर्तता नाहीच
पुलवामा येथे सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेला आज वर्ष पूर्ण झालं. भारतीय सैन्याच्या तब्बल ४० जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या विदारक घटनेचे व्रण प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजे आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
सामान्यांचं जगणं महाग! गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल १४५ रुपयांनी वाढ
गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काही महिन्यांपासून अनेक राज्य भाजप मुक्तीच्या दिशेने सुसाट: सविस्तर वृत्त
दिल्लीकर मतदारांनी भारतीय जनता पक्षाचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न फोल ठरवत आम आदमी पक्षाच्या (आप) विकासाच्या धोरणाला एकतर्फी कौल दिला. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस मते देणाऱ्या दिल्लीने विधानसभेत मात्र सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला निवडून दिले. ‘आप’च्या या लाटेत भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडाला तर काँग्रेसच्या हाती पुन्हा एकदा भोपळा आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली निकाल भाजप विरोधात जाताच वादग्रस्त ट्विव सुरु; मोदींना थेट छत्रपती म्हटलं
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या एकेकाळच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांच्या एका ट्विटमुळे पक्षाची अडचण वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख छत्रपती असा करत दिल्लीच्या निवडणुकीत पराभव होऊनही उमा भारतींनी मोदींचाच जयजयकार केला आहे. या त्यांच्या ट्विटमुळे समाज माध्यमांवर मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. ‘दिल्ली विधानसभा चुनाव का संदेश’ असं म्हणत उमा भारती यांनी २-३ ट्वीट करत मोदींचंच अभिनंदन केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी सभा घेतलेल्या दिल्लीच्या या मतदारसंघातही भाजपचा पराभव
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय जनता पक्ष उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र त्यांच्या प्रचाराचा भारतीय जनता पक्षाला दिल्लीत विशेष फायदा झाला नसल्याचं निवडणूक निकालातून दिसत आहे. कारण अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने दिल्लीतील ७० पैकी तब्बल ६३ जागांवर आघाडी घेत भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या मते हा भाजपच्या अहंकाराचा पराभव; पण मित्रपक्ष काँग्रेसच्या अवस्थेवर मौन
दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लावलेल्या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो दिसत आहे. यासोबतच पोस्टरवर, विजयामुळे आम्हाला गर्विष्ठ होत नाही आणि पराभवामुळे आम्ही निराश होत नाही असा संदेश लिहिण्यात आलेला आहे. मतमोजणीआधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून, दिल्लीमध्ये सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मनोज तिवारी यांनी भारतीय जनता पक्षाला ५५ जागा मिळतील असं म्हटलं होतं. पण मतमोजणीला सुरूवात होताच आपने स्पष्ट आघाडी घेतल्याचं समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे पोस्टर लावण्यात आलं आहे. यामुळे एकप्रकारे भारतीय जनता पक्षाने पराभव स्वीकारण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
LIC नंतर मोदी सरकारकडून सेल'चा सुद्धा 'सेल' - सविस्तर वृत्त
एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग विकण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. LIC चा आयपीओ आणला जाणार असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत स्पष्ट केलं आहे. तत्पूर्वी कित्येक महिन्यांपासून चर्चा सुरू असलेल्या आणि कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या एअर इंडियाच्या १०० टक्के हिस्सा विक्रीची निविदा काढण्यात आली असून, त्यासाठी खरेदीदारांकडून स्वारस्यपत्रे मागणविण्यात आली आहे. ती देण्याची मुदत १७ मार्च असून, त्यानंतर लगेचच विक्रीचा निर्णय घेण्यात येणार आहे. टाटा, हिंदुजा, इंडिगो, स्पाइसजेट आणि काही परदेशी कंपन्यांनी सरकारची ही कंपनी घेण्यात आतापर्यंत रस दाखविला आहे. मात्र त्यांच्यापैकी किती कंपन्या स्वारस्यपत्रे सादर करतात, हे १७ मार्चनंतरच स्पष्ट होईल.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिर ट्रस्ट'वरून भाजपमध्ये जातीय राजकारण तापलं
नरेंद्र मोदी सरकारने दलित समाजातून कामेश्वर चौपाल यांना ट्रस्टमध्ये सामील केले आहे. त्यामुळे ओबीसीला देखील संधी द्यायला हवी होती. राम मंदिर आंदोलन सर्व हिंदुंनी केले होते आणि त्याचे नेतृत्व सुद्धा ओबीसीने केले आहे. राम मंदिर ट्रस्टमध्ये सरकारकडून दलित समाजातील एका व्यक्तीला स्थान देण्यात आले आहे. मात्र ओबीसी समाजातील व्यक्तीला ट्रस्टमध्ये न घेणे चुकीचे असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे. त्यामुळे राम मंदिराच्या ट्रस्टवरून राजकारण तापलं असून त्याला जातीय रंग देण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या 'ओएसडी'ना लाच घेताना अटक
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे ‘ओएसडी’ गोपाल कृष्ण माधव यांना लाच घेताना सीबीआयने गुरुवारी रात्री अटक केली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोपवरून दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शाहीनबाग: ५०० रु. प्रतिदिन आणि एक प्लेट बिर्याणी मिळाली होती जाण्यासाठी..पण तुम्ही: गुंजन कपूर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शाहीनबाग आंदोलनात बुरखा परिधान करून आंदोलकांवर प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या यूट्यूबवरील राजकीय विश्लेषक गुंजा कपूरला महिला आंदोलकांनी घेरून तिची खरी ओळख उघड केल्यामुळे खळबळ माजली होती. दिल्ली पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेतले होतं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY