महत्वाच्या बातम्या
-
ब्रेकिंग-न्युज: शाहीन बागमध्ये घुसणारी बुरखाधारी महिला आणि मोदी एकमेकांचे फॉलोअर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शाहीनबाग आंदोलनात बुरखा परिधान करून आंदोलकांवर प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या यूट्यूबवरील राजकीय विश्लेषक गुंजा कपूरला महिला आंदोलकांनी घेरून तिची खरी ओळख उघड केल्यामुळे खळबळ माजली होती. दिल्ली पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेतले होतं.
5 वर्षांपूर्वी -
अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा
अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व ६७ एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार आहे. त्याचबरोबर मशिद बांधण्यासाठी सुन्न वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन देण्यासाठी कार्यवाही सुरु झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
सुपडा साफ होणार! मोदी-शहा, २०० खासदार, ७० केंद्रीय मंत्री, ११ मुख्यमंत्री फुसके बार ठरणार: सर्व्हे
बहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळविणार हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी ५४ ते ६० जागांवर आम आदमी पक्षाचा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशभक्तीची नशा एवढी करू नका की मोदीं प्रमाणे लग्नच नाही करायचे: भाजप खा. विजयवर्गीय
भारतीय जनता पक्षाचे कोणता नेता कधी नेमकं कोणतं धक्कादायक विधान करून जाईल याची शास्वती देता येणार नाही. याआधीच मोदी शहांना विष्णूचा अवतार, रामाचा अवतार आणि बरंच काही बोलून झालेलं रोज एक ना एक नेता नवनवीन विधान करून मोदींची स्तुती करत असतात. मात्र आता स्तुतीच्या नादात मोदींचा आपल्याकडून अपमान केला जातं आहे याचे भानही या नेत्यांना नसल्याचे दिसते.
5 वर्षांपूर्वी -
महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा एक मोठं नाटक : भाजप खा. अनंतकुमार हेगडे
बेंगळुरूतील एका कार्यक्रमावेळी भाजपचे नेते अनंतकुमार हेगडेंनी महात्मा गांधींबद्दल धक्कादायक वक्तव्य केले. अनंतकुमार हेगडे हे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. स्वातंत्र्यलढा हा ब्रिटीश सरकारच्या संमती आणि पाठिंब्याने रचला गेला होता. या तथाकथीत नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नव्हता. ही खरीखुरी लढाई नव्हती. हा परस्पर संगनमताने रचलेला स्वातंत्र लढा होता, असे वक्तव्य हेगडे यांनी केले.
5 वर्षांपूर्वी -
प्रख्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश
भारताची ‘फुलराणी’ अर्थात प्रख्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल राजकारणाच्या ‘कोर्टात’ उतरली आहे. राजधानी दिल्लीत सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला. सायनासोबतच तिची बहीण चंद्रांशू हिनेही भाजपचा झेंडा हाती धरला. सायनाच्या रुपाने आणखी एक क्रीडापटू राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सायनाच्या रुपाने भारतीय जनता पक्षाला ‘स्टार प्रचारक’ मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझ्यावर ६ महिन्याची बंदी; पण मोदी एअर इंडियाला कायमची बंदी घालू शकतात: कुणाल कामरा
पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात डिवचल्याचा व्हिडिओ टाकल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर इंडिगो कंपनीने सहा महिन्यांसाठी विमान प्रवासाची बंदी घातली. त्यानंतर एअर इंडियानेही कुणाल कामरावर विमान प्रवासाची बंदी घातली.
5 वर्षांपूर्वी -
मला गोळ्या घाला, सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार; ओवेसींचं अनुराग ठाकूर यांना प्रतिउत्तर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘देशातील गद्दारांना गोळ्या घातल्या पाहिजे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना फटकारले आहे. तसेच ‘तुम्ही मला गोळ्या घाला. त्यासाठी तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे.’ असे आव्हान ओवैसी यांनी अनुराग ठाकूर यांना दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशविरोधी वक्तव्यं भोवलं! जेएनयू स्कॉलर शरजील इमामला अखेर अटक
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा स्कॉलर शरजील इमामला अटक करण्यात आली आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या शरजील इमामला बिहारमधील जहानाबाद इथे अटक करण्यात आली. दिल्ली आणि बिहार पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. त्याआधी पोलिसांनी सोमवारी रात्री शरजील इमामचा भाऊ आणि मित्राला ताब्यात घेतलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
एअर इंडिया विक्रीस; टाटा, हिंदुजा, इंडिगो, स्पाइसजेटला खरेदीत रस
कित्येक महिन्यांपासून चर्चा सुरू असलेल्या आणि कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या एअर इंडियाच्या १०० टक्के हिस्सा विक्रीची निविदा काढण्यात आली असून, त्यासाठी खरेदीदारांकडून स्वारस्यपत्रे मागणविण्यात आली आहे. ती देण्याची मुदत १७ मार्च असून, त्यानंतर लगेचच विक्रीचा निर्णय घेण्यात येणार आहे. टाटा, हिंदुजा, इंडिगो, स्पाइसजेट आणि काही परदेशी कंपन्यांनी सरकारची ही कंपनी घेण्यात आतापर्यंत रस दाखविला आहे. मात्र त्यांच्यापैकी किती कंपन्या स्वारस्यपत्रे सादर करतात, हे १७ मार्चनंतरच स्पष्ट होईल.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - तानाजी अन भाजप; खा. संभाजीराजे मोदी सरकारवर संतापले
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी तानाजी सिनेमाला वापर करण्याता आला आहे. या व्हिडीओमध्ये शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जागी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असलेला चेहरा दाखविण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत या व्हिडीओबाबत नाराजी व्यक्त करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे जागतिक मंदीचे सावट अधिकच गडद: आयएमएफ
भारताची अर्थव्यवस्था पार पूर्णतः बिकट झाली आहे. देशाचा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा विकासदर धिम्यागतीने ४.८ टक्क्यांवर मजल मारेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) सोमवारी वर्तवला. दरम्यान भारतासारख्या देशातील मंदीमुळे वैश्विक विकासदराचा अंदाज घटवल्याचे खापरही आयएमएफने भारतावर फोडले आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: हे कसले पॉलिटिकल किडे? मोदी छत्रपती शिवाजी महाराज तर अमित शहा तानाजी
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. परंतु दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
5 दहशतवादी अटकेत, प्रजासत्ताक दिनी घातपात करण्याचा कट उधळला
जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रजासत्ताकदिनाच्या आधी मोठी कारवाई केली. जैश ए मोहम्मदच्या ५ दहशतवाद्यांना श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले दहशतवादी घातपाताच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला.
5 वर्षांपूर्वी -
आंध्र प्रदेश: एक आमदार असलेल्या पवनकल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत भाजपची युती जाहीर
महाराष्ट्रातील राजकरणात मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाची मनसेसोबत युती शक्य असल्याचं म्हटलं जातं. अगदी मनसेने हिंदुत्वाच्या मुद्याला अनुसरून राजकारण स्वीकारल्यास ते शक्य आहे. विशेष म्हणजे मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारून स्वतःला भाजपपासून वेगळं ठेवत स्वतःच हिंदुत्वाच राजकारण सुरु ठेवल्यास ही युती अधिक शक्य आहे अशी शक्यता आहे. भाजप-मनसे युतीचे पहिले प्रयोग कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नवी मुंबई या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केले जातील. त्यानंतर २०२४ मधील निवडणुकीची आखणी केली जाईल असं राजकीय विश्लेषक म्हणतात. एक आमदार असलेल्या आणि मोदी-शहांना टोकाचा विरोध करणाऱ्या पक्षासोबत ते कसं शक्य आहे असे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र हाच प्रयोग आंध्र प्रदेशात आज उदयास आला आहे. तेलगू देसम आणि वायएसआर काँग्रेस असे पक्ष यांच्यासमोर डाळ शिजणार नसल्याने भाजपने येथे मोदींचा आणि भाजपचा विरोध करणाऱ्या आणि केवळ आमदार असणाऱ्या पवनकल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत अधिकृतपणे युती जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप तोंडघशी; केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून JNU'ची स्तुती
JNU’बाबत भाजपने नेहमीच आक्रमक भूमिका घेत अनेकांनी या विद्यापीठावर बंदी घालण्याची देखील भाषा केली आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना आणि केंद्रातील मंत्र्यांनी देखील जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँग सक्रिय असल्याचा आरोप वारंवार केला आहे. त्यात भारतीय जनता पक्ष आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच अग्रणी असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात केंद्र सरकार तर जेएनयूला’बाबत नेहमीच दुटप्पीपणानं वागत असल्याचा आरोप विरोधकांनी देखील अनेकवेळा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार; यंदा १६ लाख रोजगारांच्या संधी घटणार: SBI अहवाल
एसबीआयच्या रिपोर्टनुसार, या वर्षी आसाम, राजस्थान, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा सारख्या राज्यांमधल्या कर्मचाऱ्यांच्या घरी पैसे पाठवण्याच्या संख्येत कपात आली आहे. इथले लोक मोठ्या रोजगाराच्या शोधात पंजाब, महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीला येतात. रोजगार मिळाल्यानंतर ते लोक कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी पैसे पाठवतात. ईपीएफओ कोणत्याही सरकारी किंवा खासगी नोकऱ्यांची नोंद ठेवत नाही. त्याचं काम २००४पासून नॅशनल पेन्शन योजनेकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत अर्थव्यवस्थेच्या कामगिरीच्या आधारावर केंद्र आणि राज्य सरकारे २०१९-२०’मध्ये नव्या नोकऱ्यांची संख्या ३९,०००ची कपात करू शकते.
5 वर्षांपूर्वी -
CAA: भारतातील सध्याची परिस्थिती वाईट: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला
भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) दररोज आंदोलने होत असताना आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही याविषयी मत व्यक्त केले आहे. भारतात या कायद्यावरून सुरु असलेल्या आंदोलनावरून त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वाढती महागाई - ढासळत्या GDP'ला प्राधान्य द्या; बाकीचं अर्थहीन राजकारण न संपणारं: चेतन भगत
देशातील महागाईने सहा वर्षातील उच्चांक गाठला आहे तर जीडीपी’ने सहा वर्षातील निच्चांक आणि हेच आकडे आपली प्राथमिकता असली पाहिजे. बाकीचं अर्थहीन राजकरण आपल्या देशात न संपणारा विषय असल्याचं सांगत लेखक चेतन भगत यांनी सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना टोला लगावला आहे. मागील महिन्यांभरापासून देशातील सत्ताधारी आणि विरोधक केवळ CAA आणि NRC;वरून राजकारण करण्यात गुंतले असल्याने सामान्यांशी निगडित असणारे मूळ विषय बाजूला पडले आहेत. त्यालाच अनुसरून लेखक चेतन भगत यांनी ट्विट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
५ वर्षांत महागाईचा उच्चांक! मोदी सरकारच्या काळात सामान्यांचा खिसा खाली
सर्वसामान्यांना कांद्याच्या दराने रडवल्यानंतर भाजीपाल्यानेही गेल्या महिन्यात खिशाला कात्री लावली. डिसेंबर महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दराचे आकडे केंद्राकडून जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या महिन्यात महागाईचा दर ७.३५ टक्के इतका झाला आहे. खाद्य पदार्थ आणि तेलांच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर महागाई दरात ही वाढ झाली. याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये महागाई दर ५.५४ टक्के इतका होता. गेल्या वर्षी याच काळात हा दर २.१९ टक्के होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा महागाई दर ४ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता. नोव्हेंबरमध्ये तीन वर्षांचा उच्चांक गाठत महागाई दर ५.५४ टक्क्यांवर पोहोचला होता. जुलै २०१६ मध्ये ग्राहक मुल्य निर्देशांक ६.०७ टक्के इतका होता.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK