महत्वाच्या बातम्या
-
भाजपचा संबंध नाही कसा? दिल्ली पक्ष कार्यालयातच पुस्तक प्रसिद्ध झाले: शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी पुस्तक मागे घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल रात्री उशिरा दिली. मात्र यावरुन शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाचा लक्ष्य केलं आहे. ‘आज के शिवाजी’ पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना असल्याची टीका शिवसेनेनं ‘सामना’मधून केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे भाजपकडून आदेश
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाचं प्रकाशन करत वाद ओढवून घेणारे जयभगवान गोयल यांनी पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असल्याचं सांगितलं. तसंच कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही ते म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO - खासदार छत्रपती संभाजी राजेंचं 'त्या' पुस्तकावरून भाजपाला चोख प्रतिउत्तर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तक प्रकाशनाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्यात यावरून ट्विटर वॉर पाहायला मिळाले आहे. भारतीय जनता पक्षात शिरलेल्या छत्रपतीच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का?, असा सवाल करणाऱ्या संजय राऊत यांना छत्रपती संभाजी राजे यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
संतापजनक! मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारं पुस्तक भाजपकडून प्रकाशित
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं भाजपकडून दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आले. यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींनी अनेक महापुरुषांशी आणि देवी-देवतांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती, तर भाजपच्या प्रवक्त्यांपासून ते देशपातळीवरील नेत्यांनी मोदी आम्हाला भगवान विष्णू समान असल्याचं म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
देशाला २०२० पर्यंत महासत्ता बनविण्याचं कोणीतरी सांगितलं होतं: बॉक्सर विजेंदर सिंग
जगविख्यात भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग नेहमीच मोदी सरकारला त्यांच्या ध्येय धोरणांवरून लक्ष करताना दिसला आहे. मात्र यावेळी झालं असं की, तामिळनाडूतील सेलम शहरात एका आईने तिच्या तीन मुलांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी चक्क स्वतःचे केस कापून ते १५० रुपयांना विकले आणि मुलांची पोटाची भूक बघवली. त्या आईचं नाव प्रेम असं तिचं वय ३१ वर्ष असल्याचं समोर आलं. तिच्या पटीने ७ महिन्यापूर्वी आत्महत्या केल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तेच वृत्त ट्विट करत विजेंदरने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत, मोदी सरकारची एका वाक्यात पोलखोल करून त्यांच्या खोट्या आश्वासनांवरून प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानुसार, ‘कोणीतरी देशाला २०२० मध्ये महासत्ता बनविण्याचं म्हटलं होतं’ अशी आठवण करून देत देशातील भीषण परिस्थितीवरून टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA कायदा: मोदीजी तुमच्या वडिलांचे आणि खानदानाचे जन्म दाखले हिंदुस्थानाला दाखवा
नागरिकत्व दुरुस्ती कायदा संपूर्ण देशभरात लागू झाला असून, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अनुराग कश्यप यांनी सुरुवातीपासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ११ डिसेंबर रोजी संसदेत मंजूर करण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
ममता बॅनर्जी आणि मोदी यांच्यात CAA, NRC आणि NPR वर चर्चा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. नागरिकत्व सुधारणआ कायदा (सीएए) आणि एनआरसी संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यात सीएए आणि एनआरसीला आमचा विरोध असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे स्पष्ट केले. दिल्ली आणि कोलकाता दोन्ही शहरांमध्ये या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना, ही भेट झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
JNU: सीसीटीव्ही'त दिसणाऱ्या मुलीचं नाव कोमल शर्मा असून ती ABVP संबंधित - ऑल्ट न्यूज़ वृत्त
जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यात व्हिडिओमध्ये दिसलेल्या मुलीची ओळख ओळख समोर आली आहे. सरकारने आणि पोलिसांनी डोळेझाक केली असली त्यावर समाज माध्यमांवर अनेक पुरावे समोर आले असून त्यात ‘फॅक्टचेक’ केल्यानंतर तथ्य असल्याचं उघड झालं आहे आणि तसा दावा ऑल्टन्यूज आणि सत्य हिंदी न्यूज पोर्टलने केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देशात विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर शांत बसणार नाही: फ्रान्सिस दिब्रेटो
देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शुक्रवारी एल्गार पुकारला. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरून अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी (मॉब लिंचिंग), विरोधी मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकारांविरोधात सारस्वतांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला. ‘देशाला वेठीस धरले जात आहे,’ अशी सडकून टीका साहित्यिकांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
CAA : देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू, केंद्राकडून अधिसूचना जारी
देशभरातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (Citizenship Amendment Act) विरोध होत असताना केंद्र सरकारकडून या कायद्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये गृह मंत्रालयाकडून देशात 10 जानेवारीपासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendment Act) लागू झाल्याची सूचना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने काल म्हणजे १० जानेवारी रोजी या कायद्याबाबत अधिसूचना जारी केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश, आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या मुस्लिम वगळता इतर धर्माच्या शरणार्थींना देशाचे अधिकृत नागरिकत्व मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलिसांची भूमिका पूर्वग्रहदूषित; माझ्यावर हिंसाचाराचा ठपका पण गुन्हा दाखल नाही
JNU हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांची भूमिका पूर्वग्रहदूषित आहे असा आरोप JNUSU ची अध्यक्ष आयशी घोषने केला आहे. “आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्यावरही हिंसाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे, मात्र माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. माझ्याकडेही माझ्यावर हल्ला कसा झाला याचे पुरावे आहेत” असंही आइशीने म्हटलं आहे. “आम्ही काहीही चुकीचं वागलो नाही. आम्ही दिल्ली पोलिसांना घाबरत नाही. आम्ही लोकशाही मार्गाने सगळ्या प्रश्नांचा सामना करु. दिल्ली पोलीस पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेवून वागत आहेत असाही आरोप आयशी घोषने केला.
5 वर्षांपूर्वी -
JNU हिंसा: आयशी घोषसह ९ जणांवर पोलीस चौकशीत ठपका
रविवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष हिच्यासह ९ हल्लेखोर होते. प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये आरोपींची नावंही देण्यात आली आहेत. यात जेएनयूचे माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता तालुकदार आणि प्रिया रंजनदेखील आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी जाट आहे अंधभक्त नही! JNU हिंसाचारावरुन बॉक्सर विजेंदरने नेटकऱ्याला सुनावलं
दिल्लीत जेएनयू युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या विरोधात आपला आवाज उठवत आहेत. भारतीय संघाचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत विद्यार्थ्यांना आपला पाठींबा दर्शवला होता.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात: CAA कायद्याला आणि मोदींना पाठिंबा देण्यासाठी शाळेची विद्यार्थ्यांना धमकी
सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच अभिनंदन करणारं पत्र लिहिण्याची सूचना केल्यानं गुजरातमधील शाळा वादात सापडली आहे. याबद्दल पालकांनी जोरदार आक्षेप नोंदवल्यानं शाळेनं माफी मागितली. या पत्रातला मायनादेखील शाळेतील शिक्षकांनी वर्गांमधल्या फळ्यावर लिहून दिला होता. हाच मजकूर पत्रात लिहिण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं हे वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावले
जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदी संदर्भातील निर्णयाचा पुन्हा आढावा घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ याबाबतचा निर्णय सुनावला आहे. ‘इंटरनेटचा वापर हा मुलभूत अधिकार आहे. अपवादात्मक स्थितीतच इंटरनेट बंदी करता येऊ शकते. त्यामुळे ७ दिवसांत इंटरनेट बंदीच्या निर्णयाचा आढावा घेण्यात यावा,’ असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या कार्यकाळात तरुणांच्या बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या: NCRB अहवाल
देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०१७-१८ मधील आकडेवारी जाहीर केली आहे. नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरो ही गृह मंत्रालयातंर्गत येणारी संस्था आहे. देशभरातील गुन्हे व त्यांच्याशी निगडीत घटनांचे आकडेवारी एनसीआरबी जाहीर करते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे वर्ष २०१८ मध्ये १२ हजार ९३६ लोकांनी आत्महत्या केली. तर, कर्ज व शेतीच्या इतर कारणांमुळे १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केली.
5 वर्षांपूर्वी -
CAA विरोध: सुरक्षेच्या कारणामुळे मोदींचा आसाम दौरा दुसऱ्यांदा रद्द
खेलो इंडिया या युवा राष्ट्रीय स्पर्धेला साममधल्या गुवाहाटी येथे १० जानेवारीसून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पण आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला मोदी येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. आपल्या जीवाला असणारा मोठा धोका टाळण्यासाठीन नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
सर्वेक्षण: केजरीवाल सरकारच्या विकासकामांमुळे मोदी-शहांच्या भाजपचा सुपडा साफ होणार
बहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळविणार हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी ५९ जागांवर आम आदमी पक्षाचा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’, केवळ धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा प्रयत्न: तरुण गोगोई
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’ असल्याची टीका तरुण गोगोई यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माच्या आधारे विभाजन करण्याचा मोहम्मद अली जिना यांचा ‘दोन देश सिद्धांत’ राबवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील २५ कोटी कामगारांचा उद्या मोदी सरकारविरोधात संप
मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनतेच्या इच्छेविरोधी धोरणांच्या विरोधात ८ जानेवारी रोजी देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये २५ कोटी भारतीय सहभागी होतील असं समितीने सोमवारी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या संपामध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना देखील सहभागी होणार आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK