महत्वाच्या बातम्या
-
JNU हल्ला: मोदी आधुनिक हिटलर तर शाह तडीपार’; पुण्यात विद्यार्थ्यांची पोस्टरबाजी
जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक हिटलर असल्याचे पोस्टर्सही आंदोलकांनी हाती घेतले होते. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख ‘तडीपार’ असा केलेले फोटो हाती पकडले होते. सुरक्षित शिक्षण हा आमचा अधिकार असल्याचे पोस्टर्स विद्यार्थ्यांनी दाखवले. या आंदोलनात विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या हे विशेष.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ ८ जानेवारीला देशव्यापी संप
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात शिवसेनेची भारतीय कामगार सेनादेखील सहभागी होणार आहे. शिवसेना व भारतीय कामगार सेना सक्रियपणे या संपात सहभागी होणार असल्यामुळे संपाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र, केरळ व प. बंगालचा चित्ररथ नाकारला, जे बेस्ट होते त्यांनाच संधी : पियुष गोयल
महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारण्यामागे कोणताही उद्देश नाही, ही प्रक्रिया नियमानुसार झाली, असा दावा रेल्वे आणि केंद्रीय वाणिज्य-उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. ‘भारताला सीएएची गरज का?’ या विषयावर मुंबईत आयोजित जाहीर कार्यक्रमात गोयल बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडून महाराष्ट्राचा अपमान; प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात चित्ररथ नाकारला
महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यामुळे यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात राज्याचा चित्ररथ दिसणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राचा चित्ररथ डावलला तरी भाजपा गप्प का? अशी विचारणा केली आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने बोंबाबोंब केली असती अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचा महसूल घटला; काटकसर करण्याची नामुष्की
या आर्थिक वर्षात अपेक्षेप्रमाणे महसूल मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने केंद्र सरकारने काटकसरीचे धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सरकारी खर्चात कपात करण्यात येत असून, या तिमाहीत खर्चाची मर्यादा ३३ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६ हजार जमा करण्यासाठी ३ इव्हेन्ट द्वारे २ हजार
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट खात्यात जमा केली जातो. मात्र सदर रक्कम एकाचवेळी न देता तीन हफ्त्यांमध्ये दिली जाते. त्यानुसार प्रत्येक हफ्त्याला २ हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्याला दिले जातात. शेतकऱ्यांसाठी ही रक्कम अल्प असली तरी मोदी सरकार वर्षाला ३ इव्हेन्ट आयोजित करून २००० हजार रुपये ट्रान्सफर करताना मोठी जाहिरातबाजी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही प्रसार माध्यमांनी एकाचवेळी ट्रान्सफर केली जाणारी रक्कम ११ हजार कोटी तर काहींनी ती १२ हजार कोटी असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मोदी सरकार कडून मार्केटिंग करताना देखील ताळमेळ नसल्याचं दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
वर्षाच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना गॅस दरवाढीचा दणका
गॅस कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर (१४.२ किलो)च्या दरात १९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस ७४९ रुपयांना मिळणार आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडर (१९ किलो)च्या किंमतीत २९.५० वाढ करण्यात आल्याने आता सिलिंडर घेण्यासाठी १३२५ रुपये मोजावे लागणार आहेत. सिंलिंडरचे नवीन दर आजपासून (बुधवार) लागू करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
खरेदीदार न मिळाल्यास एअर इंडिया ६ महिन्यात बंद होणार
आर्थिक संकटात अडकलेली एअर इंडिया ही कंपनी लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी तोट्यात जाणाऱ्या एअर इंडियाला वाचवण्यासाठी सरकारने खासगीकरणाचा निर्णय घेतला पण अद्याप एकही खरेदीदार मिळालेला नाही. जूनपर्यंत एकही खरेदीदार न आल्यास एअर इंडियाचे कामकाज बंद करावे लागणार आहे. सध्या एअर इंडियावर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. तरीही सरकारने या कंपनीच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO - अर्थतज्ज्ञांच्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि सदगुरूंच्या विचारांचा मोदींकडून प्रचार
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अजूनही देशाच्या वेगवेगळया भागांमध्ये आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहिम सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदगुरु जग्गी वासुदेव यांचा सीएए कायद्याचे समर्थन करणारा विस्तृत विश्लेषणाचा व्हिडीओ टि्वट केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या आर्थिक धोरणांमुळे गुंतवणूकदार भारताला टाळत आहेत: फ्रेंच अर्थतज्ज्ञ गय सोरमन
दरम्यान आता विदेशी तज्ज्ञांनी देखील मोदींच्या आर्थिक धोरणांवरून चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम अर्धवटच सोडून दिल्यामुळे भारतातील आर्थिक स्थितीविषयी सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून विदेशी गुंतवणूकदार आता भारताला टाळत आहेत असे फ्रेंच अर्थतज्ज्ञ गय सोरमन यांनी म्हटले आहे. स्थानिक आणि विदेशी गुंतवणुकदारांमध्ये सध्या धास्तीचे वातावरण असून त्यामुळे ते भारतात गुंतवणूक करण्यास तयार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतमाता की जय म्हणणाऱ्यांनाच देशात स्थान: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
‘भारताला आपण धर्मशाळा करणार आहोत का, जो येईल तो येथे राहणार का, याचा विचार करून हे आव्हान आपल्याला स्वीकारावेच लागेल. भारतात ‘भारतमाता की जय’ म्हणावेच लागेल, भारत माता की जय म्हणणारेच देशात राहतील,’ अशा शब्दात पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शनिवारी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या वादाबाबत वक्तव्य केले.
5 वर्षांपूर्वी -
डिटेन्शन कँपची पद्धत ब्रिटिशांनी आणलेली; तीच मोदी आणत आहेत: प्रकाश आंबेडकर
“अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसवर टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
स्वखर्चातून १ लाख २० हजारात मोदींचं मंदिर; अन घरी गॅस जोडणी व शौचालय सरकारी योजनेतून
तामिळनाडूच्या त्रिचीमधील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असणाऱ्या पी. शंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील प्रेमापोटी आपण हे मंदिर बांधल्याचे म्हटलं आहे. येथील इराकुडी गावामध्ये हे छोट्या आकाराचे मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर आता पंचक्रोषीमध्ये ‘नमो मंदिर’ नावाने लोकप्रिय झालं आहे. आजूबाजूच्या गावांमधून अनेकजण या मंदिरामध्ये असणाऱ्या मोदींच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी खोटं बोलत आहेत; आसाममध्ये स्थानबद्धता छावणी (डिटेंशन सेंटर) उभारणी: राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डिटेंशन सेंटरबाबत खोटे बोलले असल्याचा आरोप केला आहे. डिटेक्शन सेंटरबाबत काँग्रेस वाईट हेतूने लोकांमध्ये खोटे पसरवत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरील सभेत बोलताना म्हटले होते. पंतप्रधानांच्या याच विधानाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांवरील अतिआत्मविश्वास भाजपाला नडतो आहे? सविस्तर वृत्त
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने हिंदी भाषिक पट्ट्यातील अजून एक महत्वाचं राज्य गमावलं आहे. यावर सध्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरु असून मुख्य कारणं शोधण्याची प्रक्रिया पार पडत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्राथमिक स्तरावर अनेक धक्कादायक विषय समोर येत असून तीच प्राथमिक स्तरावर पराभवाची कारणं असल्याची खात्री वरिष्ठांना आहे.
5 वर्षांपूर्वी -
झारखंड: मतदाराने मोदी-शहा जोडीसहित भाजपला नाकारलं; काँग्रेस-झामुमोची मुसंडी
झारखंड विधानसभेच्या ८१ जागांवरील मतमोजणी आज सुरु झाली. या निवडणूकीत मुख्यमंत्री रघुवीर दास यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रघुवीर दास यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याची तयारी हेमंत सोरेन यांनी केलेली दिसतेय. पहिला कल ९ वाजता येणार होता, ज्यामध्ये एकूण ६७ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता. एकूण २४ केंद्रावर मतमोजणी होणार आहे. १ हजार २१५ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
तरुणानों, मोदी-शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदी आणि अमित शहा देशाचं विभाजन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय या दोघांनी भारताचं भविष्य नष्ट केलं, असा घणाघातही केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी म्हणाले काँग्रेसने समाज माध्यमांवर फेक व्हिडिओ पसरवले; अन भाजप नेत्यांनी? सविस्तर वृत्त
देशातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी एकदा सुधारित नागरिकत्व कायदा वाचावा आणि समजून घ्यावा. राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत शिकले सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून पसरवण्यात आलेली डिटेन्शन कॅम्पची अफवा खोटी आहे. बदनामी करणारी आहे. देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस व सुशिक्षित अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत: नरेंद्र मोदी
देशातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी एकदा सुधारित नागरिकत्व कायदा वाचावा आणि समजून घ्यावा. राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत शिकले सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून पसरवण्यात आलेली डिटेन्शन कॅम्पची अफवा खोटी आहे. बदनामी करणारी आहे. देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
EXIT POLL: महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये भाजपाची सत्ता जाणार; मोदी-शहांना झटका
झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच एक्झिट पोलचा अंदाज जाहीर झाला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार झारखंडमधून भारतीय जनता पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावं लागणार आहे. तर राज्यात जेएमएम-काँग्रेस आघाडीचं सरकार येण्याची चिन्हे असून भारतीय जनता पक्षासाठी हे निकाल धक्कादायक असल्याचं मानलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल