महत्वाच्या बातम्या
-
कर्नाटकमधील भाजपच्या मंत्र्याची थेट ‘गोध्रा’सारख्या परिस्थितीची धमकी
कर्नाटकातील काँग्रेस नेते यु. टी. खादेर यांनी म्हटलं होतं की, “जर सुधारित नागरिकत्व कायदा राज्यात लागू झाला तर कर्नाटक जळेल.” खादेर यांच्या या विधानावर प्रत्युत्तर देताना मंत्री रावी यांनी म्हटलं, “जर बहुसंख्याकांचा संयम सुटला तर गोध्रा सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते”.
5 वर्षांपूर्वी -
ASSOCHAM'च्या कार्यक्रमात अर्थव्यवस्थेबद्दल मोदी धादांत खोटं बोलले; पहा २०१४ आधीचे वृत्त
भारताकडून जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था होण्याचा मान काढून घेण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा दृष्टीनं भारताची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं वर्षं 2018मध्ये सुस्त राहिल्यानं त्याचा मोठा भुर्दंड देशाला बसला आहे. जागतिक बँकेच्या आकड्यांनुसार वर्ष 2018मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर आहे. त्यामुळेच या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पछाडत पुढे जाण्याचा मान मिळवला आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर सहाव्या क्रमांकावर फ्रान्स कब्जा मिळवला आहे. जिथे भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावरून घसरून सातव्या क्रमांकावर गेली असून, अमेरिका या यादीत नंबर वनवर कायम आहे.
5 वर्षांपूर्वी -
५-६ वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था भयानक स्थितीत होती; आम्ही स्थिर केली: नरेंद्र मोदी
देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत गदारोळ सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दिल्लीत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, देशासाठी काम करताना मोठ्या प्रमाणावर लोकांचा राग सहन करावा लागतो, तसेच बर्याच लोकांना असंतोष देखील सहन करावा लागतो आहे, याशिवाय अनेक आरोपांनाही तोंड द्यावं लागतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ASSOCHAM कार्यक्रमात अर्थव्यवस्था, जीएसटी आणि ‘इज ऑफ डोईंगच्या’ रँकिंगबद्दल मत व्यक्त केले.
5 वर्षांपूर्वी -
अफवा न पसरविण्याच्या मोदींच्या आवाहनाकडे भाजपच्या 'तुकडे-तुकडे' गॅंगचं दुर्लक्ष? सविस्तर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया सोमवारी ट्विटवरुन दिली. मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. “सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘मेक इन इंडिया’ म्हणजे काम कमी, बडबड जास्त: भारताचे हवाई दल प्रमुख
भारताचे हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावरुन मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची निर्मितीचा उद्देश आहे. पण सध्या काम कमी आणि फक्त चर्चा सुरु आहेत. मेक इन इंडियाचा उद्देश खूप चांगला आहे. पण प्रत्यक्षात काम खूप धीम्या गतीने सुरु आहे असे भदौरिया म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार, फक्त बोंबलून प्रश्न मांडू नका
नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तीव्र शब्दांत निषेध केला. ‘तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी तोफ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर डागली.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी 'मन की बात'साठी नेटिझन्सकडून सूचना मागविल्या; सूचना वाचून फक्त हसाल
मन की बात अंतर्गत मोदी दार महिन्याला नेटिझन्ससोबत संवाद साधत असतात. त्यासाठी ते नेटिझन्सकडून ऑनलाईन सूचना आणि काही नव्या कल्पना देखील मागवत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढलेले बेरोजगारी, महागाई, ढासळती अर्थव्यवस्था आणि तरुणांशी संबधित न वाढणारे रोजगार आणि इतर कृषीविषयक निरनिराळ्या समस्या पाहता, मोदींनी दाखवलेल्या खोट्या स्वप्नांवरून लोकं संतापल्याच पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात पॉर्न साईट्सवर बंदी घाला; नितीश कुमार यांची पंतप्रधानांकडे मागणी
संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात इंटरनेटवरील पॉर्न साईट्स आणि अश्लिल मजकुरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बलात्कारासारख्या घटनांसाठी पॉर्न साईट्सच जबाबदार असतात, असं वक्तव्य यापूर्वी त्यांनी केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
मोदींना चपराक! खरंतर 'तुकडे-तुकडे गॅंग' तुमचा IT सेल आहे - रेणुका शहाणे
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शनं झाली व हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेल्या जवळपास ५० निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सोडले आहे. दुसऱ्या दिवशीही जामिया विद्यापीठामधील वातावरण तापलेले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पात्रा म्हणाले औवेसी देशाचे नवे जिन्ना; पण अडवाणी जिन्ना यांना 'धर्मनिरपेक्ष' म्हणाले होते
संसदेत बहुमताने सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर देशातील काही भागात हिंसक आंदोलन होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जबाबदारीने वागत नसल्याचं दिसून येतं. राजकीय पक्षांनी आपापल्या ओवैसींना मुस्लिम मतांसाठी उतरविले आहे. औवेसी देशाचे नवे जिन्ना आहेत असा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
उन्नाव बलात्कार: माजी भाजपा आमदार कुलदीप सिंग सेंगर न्यायालयाकडून दोषी
देशभर गाजत असलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणी भारतीय जनता पक्षाचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी ठरला आहे. दिल्लीच्या तीसहजारी कोर्टाने आज हा महत्त्वाचा निकाल दिला. सेंगर यांच्यासोबतच शशी सिंहलाही कोर्टाने दोषी ठरवलं असून शिक्षेची सुनावनी १९ डिसेंबरला होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी आमदारानेच बलात्कार केल्याने प्रचंड वाद निर्माण झालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
CAB २०१९ आणि NRC विरोधात ममता बॅनर्जी आंदोलनासाठी रस्त्यावर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व कायदा आणि एनआरसी राज्यात लागू होऊ देणार नाही, असं सांगत त्याविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली मार्च निघाला असून, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
CAB २०१९ आणि NRC भारतीयांमध्ये फूट पाडणारी अस्त्रे: राहुल गांधी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध विद्यार्थ्यांची हिंसक निदर्शने आणि विद्यापीठ परिसरातील वाढता तणाव लक्षात घेऊन दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून ५ जानेवारीपर्यंत विद्यापीठाला हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAB २०१९: तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका; चेतन भगतचा मोदी सरकारला इशारा
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरुन जामिया विद्यापीठामध्ये झालेल्या हिंचारावरुन चेतन भगतने सरकारला तरुणांच्या संयमची परिक्षा घेऊ नका असा इशारा दिला आहे. “गडगडणारी अर्थव्यवस्था. कमी नोकऱ्या उपलब्ध असणे. इंटरनेट बंद करणे. पोलिसांना वाचनालयामध्ये घुसवणे. तरुणांकडे संयम नक्कीच आहे. पण त्यांच्या संयमीची परिक्षा पाहू नका,” असं ट्विट चेतन भगतने केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अडवाणींनी पाकिस्तानचे जनक महंमद अली जीना यांना धर्मनिरपेक्ष म्हटलं अन 'ब्रँड-मोदी'? सविस्तर
पाकिस्तानचे जनक महंमद अली जीना यांना मुस्मिांची संख्या अधिक असलेले परंतु, धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवे होते, या आपल्या विधानाचा भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुनरूच्चार केला होता. पात्यानंतर त्यांना पक्षाध्यक्ष पद सोडावे लागले होते.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींना माफीचे डोस पाजून मोदी स्वतः महिला शिक्षिकेच्या खुनातील आरोपीच्या प्रचारात
देशभरात केंद्रातील भाजप नेतृत्वातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोषामुळे भडका उडाला आहे. काँग्रेसदेखील याचा विरोध करण्याकरिता स्त्यावर उतरलेली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक अशा रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता रॅलीला सुरुवात होणार असून यामध्ये नागरिकत्व सुधारणा विधयेक, वाढती महागाई, महिला सुरक्षा, सर्वसामान्यांची होणारी लूट या सारख्या विषयावर रॅलीतून प्रहार करण्याची योजना आखण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
उलट मोदींनी आणि त्यांचे असिस्टंट अमित शहांनी देशाची माफी मागावी: राहुल गांधी
भाषणावेळी राहुल गांधी म्हणाले, “काल संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे त्यासाठी माझ्याकडून माफी मागितली जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल.”
5 वर्षांपूर्वी -
GST वाद चिघळला! तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, मोदी सरकारवर शिवसेनेची टीका
केंद्र सरकारकडून राज्यांना देणे असलेला वस्तू व सेवा कर अर्थात, जीएसटी (GST) परतावा रखडल्यामुळं संतापलेल्या शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘जीएसटी परताव्यावरून राज्यांची मुस्कटदाबी व आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रकार सुरू असेल तर केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना आवाज उठवावा लागेल,’ असं ठणकावतानाच, ‘तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता,’ असा खडा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’तून करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भीषण! देशातील आर्थिक मंदी नव्हे तर ही महामंदी आहे: देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार
भारताच्या अर्थव्यवस्थेची मोठ्या मंदीच्या दिशेने वाटचाल सुरु असून अर्थव्यवस्था आयसीयूत जात असल्याची चिंता देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सरकारला दुहेरी ताळेबंदाच्या समस्येपासून सावध करतानाच यामुळे मोठी किंमत चुकवावी लागू शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्मृती इराणींच्या कमी शिक्षणाचे मूळ कारण म्हणजे?....काँग्रेसकडून बोचरी टीका
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्यावरून शुक्रवारी लोकसभेत गदारोळ पहायला मिळाला. स्मृती इराणी यांच्यासोबत भाजपाच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP