महत्वाच्या बातम्या
-
#VIDEO: राहुल गांधींच्या एका व्हिडिओ पुराव्याने मोदींसहित संपूर्ण भाजप तोंडघशी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण माफी मागणार नसल्याचं सांगितलं आहे. रेप इन इंडिया वक्तव्यावरुन राहुल गांधी यांच्यावर टीका करत भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करत सभागृहात गदारोळ घातला होता. यावर बोलताना राहुल गांधी यांनी आपण कधीही त्यांची माफी मागणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे मोदी सरकारवरील ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक ढासळला
भारतीय अर्थव्यवस्था बर्याच महिन्यांपासून अत्यंत बिकट परिस्थितीतून जातं आहे. मागील अवघ्या 15 दिवसात अशा अनेक घटना घडल्याअसून त्यावरून अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेचा अंदाज स्पष्ट होतं आहे. सदर आकडेवारीवरूनच हा मोदी सरकारला मोठा धक्का असल्याचं अनेक अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसात समोर आलेल्या आकडेवारीचा आधार त्यासाठी घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAB २०१९: राष्ट्रपतींची विधेयकावर स्वाक्षरी, विधेयकाचे रुपांतर कायद्यात
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला रात्री उशिरा मंजुरी दिली. राष्ट्रपतींनी काल रात्री उशिरा या विधेयकावर सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. लोकसभेत हे विधेयक संमत झाल्यानंतर त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळाली. मात्र, या विधेयकाला विरोध करताना ईशान्य भारतातील आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक; आरबीआय'चा बँकांना इशारा
मंदीने अर्थव्यवस्थेला चांगेलच हैराण केले असून RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नजीकच्या काळात आर्थिक स्थिती आणखी बिकट आणि आव्हानात्मक होईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळं येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी बँकांनी सुसज्ज राहावे, असा सल्ला दास यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
NRC: वायुदलाच्या नावाने निवडणूक प्रचार; अन तेच अधिकारी नागरिकत्वापासून वंचित: सविस्तर वृत्त
एनआरसीची अंतिम यादी सप्टेंबरमध्ये जाहीर झाल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या एका माजी जवानाचा या यादीत समावेश नसल्याचं समोर आलं. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सदर यादीत समावेश असला तरी त्यांचं या शेवटच्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे. भारतीय वायुदलाच्या सेवानिवृत्त फ्लाइट लेफ्टनंट छबिंद्र सरमा हे आसाममधील बिस्नाथनाथ चरियालीचे रहिवासी असून शेवटच्या यादीत त्यांचे नाव नसल्याची धक्कादायक घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ना खाऊंगा ना खाणे दूंगा! लाचखोर भाजप नगरसेविकेला कोर्टाकडून ५ वर्षांचा कारावास
मीरा भाईंदर महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली हिला लाच प्रकरणी ठाणे कोर्टाने ५ वर्ष कैद आणि ५ लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नगरसेविका वर्षा भानुशाली लाचप्रकारणी ५ वर्षांचा कारावास आणि ५ लाख दंड अशी शिक्षा असून दंड न भरल्यास आणखी ६ महिन्याचा कारावास भोगावा लागेल.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात दंगल: मोदींना राज्य सरकारकडून क्लीन चिट; सप्टेंबर'मध्येच सुप्रीम कोर्टाने काय म्हटले होते पहा?
२००२ साली झालेल्या गुजरात दंगली प्रकरणीचा नानावटी-मेहता आयोगाचा अंतिम अहवाल आज गुजरात विधानसभेत सादर करण्यात आला असून, या दंगली प्रकरणी तत्कालील मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार सुरक्षा यंत्रणांना खासगी डेटावर लक्ष ठेवण्याचा अधिकार देणार?
आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कुठलीही माहिती गुप्त ठेवणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे वैयक्तिक, खाजगी महत्त्वाची माहिती गोपनीय ठेवणे अवघड झाले आहे. आता तर तुमच्या पर्सनल डेटावर सरकारचीही नजर राहण्याची शक्यता आहे. देशाची एकात्मता आणि अखंडता, देशाची सुरक्षा, न्यायव्यवस्थेची योग्य अंमलबजावणी आणि इतर राष्ट्रांसोबत मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी सरकार तुमचा पर्सनल डेटा कधीही पाहण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून मोदी सरकार कोणता घाट घालतंय? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं
बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला असून, ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात आंदोलने तीव्र झाली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नागरिकत्व सुधारणा विधेयक: मोदी सरकारची राज्यसभेत संख्याबळामुळे परीक्षा
बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला असून, ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात आंदोलने तीव्र झाली आहेत. लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या सोबत शिवसेना, जेडीयू, बीजेडी आणि पूर्वोत्तर राज्यातील काही लहान पक्षांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केलं.
5 वर्षांपूर्वी -
ट्विटरनुसार २०१८ मध्ये मोदींचे सर्वाधिक फेक फॉलोअर्स; २०१९ मध्ये हे 'गोल्डन ट्विट' ठरलं
आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या टि्वटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर २०१९ हे वर्ष ‘लोकसभा इलेक्शन २०१९’ या हॅशटॅगने गाजवले, तर सर्वाधिक लोक्रप्रिय १० व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अव्वल स्थान पटकावले. त्या खालोखाल राहुल गांधी यांना पसंती मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कर्नाटक निकाल: ४ राज्यात भाजपने जनादेश धुडकावल्याचं विसरून मोदी-फडणवीसांचा सेनेला टोला
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची री ओढत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कांदा ८० किलो झाला असता आंदोलन व टीका करणाऱ्या या नेत्यांना देश चालविण्याचा अर्थ कळला? सविस्तर
आज देशभर कांद्याच्या भावाने १८० किलोच्या आसपास एवढा उच्चांक गाठलेला असताना देशभर मोदी सरकारवर टीका होतं आहे. त्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि उपाय योजनावरून संसदेत प्रश्न उपस्थित केला आणि त्यावर ‘मी आणि माझ्या घरात कोणीही कांदा खात नाही’ असं उत्तर देत त्यांच्या बुद्धीच्या विचारशक्तीचा उंची सिद्ध केली.
5 वर्षांपूर्वी -
महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी शाळा आणि महाविद्यालये उभारणे गरजेचे: रघुराम राजन
सर्वच अधिकार पंतप्रधान कार्यालयात एकवटल्याने इतर मंत्र्यांकडे अधिकार नाहीत त्यामळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीने बेजार झाली असून नजिकच्या काळात ती आणखी खोलात जाईल, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी राजन यांनी काही सूचना केल्या आहेत. भांडवली बाजार आणि गुंतवणूक, जमीन, कामगार कायदा या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज राजन यांनी व्यक्त केली होती.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राकडे MTNL-BSNL वाचवायला पैसे नाही; बिर्ला म्हणाले मदत करा अन्यथा व्होडाफोनला टाळं
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोन आयडीयाला ५३ हजार कोटींचे शुल्क सरकारकडे भरावे लागणार आहे, मात्र यामध्ये केंद्र सरकारने कंपनीला दिलासा दिला नाही तर मात्र कंपनीला नाईलाजास्तव व्यवसाय गुंडाळावा लागेल, असा ईशाराच आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि व्होडाफोन आयडियाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आधी विष्णूचा अवतार, मग छत्रपती शिवाजी महाराज, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी मोदींची तुलना
उद्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबरला ६३वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून २५ लाखांहून अधिक अनुयायी दादर चैत्यभूमी येथे येतात. या अनुयायांना शहरातील विविध ठिकाणी नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. त्याअनुषंगाने भाजप अशी वातावरण निर्मिती करत असल्याची चर्चा रंगली आहे आणि पुन्हा मोदींना केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतं आहे असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजकीय फायद्यासाठी उटसूट सर्जिकल स्ट्राईक; बलात्काऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक का सुचत नाही?
सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये घडली. स्थानिक न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना सकाळच्या सुमारास पाच तरुणांनी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात - रोड सेफ्टीच्या नावाने दांडिया करून झाल्यावर शहरांमध्ये हेल्मेट सक्ती हटवली
गुजरातमधील विजय रूपानी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे गुजरातच्या शहरी भागात दुचाकी चालविणाऱ्या लोकांना हेल्मेट घालणे सक्तीचे राहणार नाही. याची अधिकृत घोषणा गुजरात सरकारचे परिवहन मंत्री आर.सी. फलडू यांनी केली. (Chief Minister of Gujarat Vijay Rupani)
5 वर्षांपूर्वी -
झारखंड- महिला शिक्षिकेच्या खुनातील आरोपी भाजपचा उमेदवार; मोदींकडून जोरदार प्रचार
झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले डॉ. शशिभूषण मेहता यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत व्यासपीठावर स्थान मिळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शशिभूषण मेहता यांच्यावर खुनाचा आरोप असून ते सध्या जामीनावर आहेत. परंतु, महिला शिक्षिकेच्या खुनात आरोपी असलेल्या शशिभूषण मेहता यांना भारतीय जनता पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, ते आज चक्क पंतप्रधान मोदींच्या स्टेजवर दिसले.
5 वर्षांपूर्वी -
बलात्काराच्या आरोपानंतर नित्यानंद स्वामी भारतातून पळाला अन थाटलं स्वतःच हिंदू राष्ट्र
बलात्काराच्या आरोपा नंतर देश सोडून गेलेला ‘स्वयंभू महाराज’ नित्यानंद आता एका देशाचा मालक झाला आहे. नित्यानंद जेव्हा देशापासून पळाला तेव्हापासून त्याचा शोध भारतातील पोलीस यंत्रणा घेत आहे. परंतु आता त्यांने एक देश बनविला आहे असं समोर आलं आहे. जगातील कोणत्या कोपऱ्यात नेमका लपला आहे हे अद्याप माहित नसलं तरी नित्यानंद यांनी संबंधित देशाचे नाव ‘कैलासा’ ठेवले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS