महत्वाच्या बातम्या
-
शहिदांचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत सदस्यपदी
मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत स्थान देण्यात आले आहे. साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून त्या चर्चेत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष नेत्यांवर जादू टोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते.
5 वर्षांपूर्वी -
पालघरमध्ये शेतकऱ्यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन जनसुनावणी उधळून लावली
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात पालघरमध्ये आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी शेतकऱ्यांनी उधळून लावली. पालघर पंचायत समितीमध्ये उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘बुलेट ट्रेन’च्या संदर्भात सुनावणी लावण्यात आली होती. या सुनावणीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद होता. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं लेखी निवेदन न देता सुनावणी लावण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी ही सुनावणी उधळून लावली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी मुंबईपासून जवळपास १४० किलोमीटर दूर पालघर जिल्ह्यामध्ये २८८ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, या निर्णयाला भूमिधारक शेतकऱ्यांचा विरोध आहे.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांची मोदींसोबत तब्बल पाऊण तास चर्चा
एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला असून अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं सांगत मदत जाहीर करण्याची विनंती नरेंद्र मोदींकडे केली. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये जवळपास पाऊण तास बैठक सुरु होती. शरद पवारांनी नरेंद्र मोदींना राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष निर्माण झाला असल्या कारणाने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही त्वरित हस्तक्षेप करावा अशी विनंती केली.
5 वर्षांपूर्वी -
मानवनिर्मित चुकांमुळे आणि नैसर्गिक बदलांमुळे देश भीषण बेरोजगारीकडे: सविस्तर वृत्त
जर भारतीय अर्थव्यवस्थेतील सुस्ती कायम राहिली तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या वर्षात आपल्या ३० ते ४० हजार कर्मचाऱ्यांना कमावरुन कमी करु शकतात, अशी भीती इन्फोसिसचे माजी चीफ फायनान्शिअल ऑफिसर (सीएफओ) मोहनदास पै यांनी दोन दिवसनपूर्वी व्यक्त केली होती. आयटी क्षेत्रात प्रत्येक ५ वर्षांनंतर हजारो लोकांच्या नोकऱ्या या प्रकारे जातात. कारण, ५ वर्षांत आयटी क्षेत्रात मोठे बदल होत असतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांतून काढले जाते, असे पै यांनी म्हटले होतं.
5 वर्षांपूर्वी -
बीएसएनएल'च्या बिकट आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांची व्हीएसआर'ला मोठी पसंती: सविस्तर वृत्त
ठरल्याप्रमाणे दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्याद्वारे ८० हजार कर्मचारी कमी होतील, असा अंदाज आहे. या कंपन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय सरकारने आधीच घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी शहांनी यापुढे काँग्रेस-मुक्त भारताची कल्पनाही करू नये: काँग्रेस
मागील लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस मुक्त भारत करण्याचा निर्धार अनेक सभांमधून केला होता. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोदी-शहांना इशारा दिला आहे. यापुढे मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये, असे गहलोत यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानातील पालिका निवडणुकीत २३ ठिकाणी काँग्रेसची सत्ता; भाजपचा सुपडा साफ
दोन दिवसांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने आयत्यावेळी जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत भाजपाला धक्का दिला होता. मात्र, वर्षभरात कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत पुन्हा सत्ता स्वतःकडे खेचून आणली होती.
5 वर्षांपूर्वी -
६ वर्ष भ्रष्टवादी संबोधलं; मोदींसाठी राष्ट्रवादी अचानक सद्गुणी; पवारांनी चाणक्यचा अर्थ शिकवला?
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि बिजू जनता दल (Biju Janata Dal) या दोन पक्षांचं कौतुक केलं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. या दोन्ही दलांकडून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा. भारतीय जनता पक्षानं (Bharatiya Janata Party) देखील शिकायला हवं, असं मोदी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
जस्टीस जोसेफ यांनी राफेल घोटाळ्याच्या चौकशीचे द्वार खुले केले: राहुल गांधींनी ट्विट केले पेपर्स
केंद्र सरकारने फ्रान्स खरेदी केलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे राफेल घोटाळ्याच्या चौकशीचे दरवाजे उघडले असून आता याप्रकरणी गंभीरपणे चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या संबंधित काही कागदपत्रांचा आधार घेत आणि संबंधित न्यायाधीशांचा उल्लेख करत त्यांनी संसदेच्या लवकरच होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपप्रणीत एनडीए'मध्ये मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता? सविस्तर वृत्त
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजप पाठोपाठ शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, २०१४ मधील मोदी लाटेनंतर एनडीए’चं राजकारण मोदी आणि अमित शहा केंद्रित झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर एकामागे एक सहा इतर राज्यात विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचे परिणाम दिसू लागले आणि परिणामी भाजपअधिक उन्मत्त होऊ लागला. त्यात सर्वात मोठ्या घटना म्हणजे स्थानिक पक्षांचं अस्तित्व शिस्तबद्ध संपविण्याच्या योजना भाजप आखू लागला आणि काँग्रेसमुक्त भारतात स्वतःचीच एकाधिकारशाही देशभर कशी प्रस्थापित करतात येईल यासाठीच सत्ता वापरू लागला. सत्तेच्या आडून केवळ विरोधी पक्षच नव्हे तर सहकारी पक्षांवर देखील दबाव सुरु झाल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
पोटनिवडणुकीत ६ जागा जिंकल्या नाहीत तर कर्नाटकातील भाजप सरकार धोक्यात
कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष या दोन पक्षातील १७ बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या १७ आमदारांना आगामी पोटनिवडणूक लढवता येईल असा निर्णय न्यायालयाने दिला. पण त्याचवेळी कोर्टाने कर्नाटकच्या तत्कालीन अध्यक्षांनी या आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. हा निर्णय देताना कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की अपात्रता अनिश्चित काळासाठी असू शकत नाही.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्रीमंडळाची मजुरी; कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट जाहीर होण्याची शक्यता?
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असून राज्यपाल कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. भारतीय जनता पक्षाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून शिवसेनेने पुन्हा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो यावर सगळी गणितं अवलंबून असून आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
ब्राझिल दौऱ्यावर निघण्यापूर्वी मोदींनी अचानक केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं हे दोन्ही पक्ष सरकार बनविण्यात असमर्थ ठरले असून राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचं दिसून येत असल्याने राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेत केंद्रीय गृहमंत्रालयाला ही शिफारस पाठविली असल्याची माहिती सरकारी वृत्तवाहिनी दूरदर्शनने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आ. राजू पाटलांचा सेनेला सावधतेचा इशारा 'धनुष्य आलंय मोडकळीला, जाणीव नाही “बाणा”ला?
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भारतीय जनता पक्षाच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
नोटबंदीला ३ वर्ष पूर्ण; काँग्रेसची आरबीआय'च्या दिल्ली कार्यालयाबाहेर जोरदार निर्दर्शनं
नोटबंदीच्या निर्णयाला आज ३ वर्ष पूर्ण झाली असून काँग्रेसने भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यालाच अनुसरून दिल्लीत नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्त युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करत सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान, यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनेकांचा जीव घेणारी नोटबंदी म्हणजे दहशतवादी हल्लाच: राहुल गांधी
नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं आहे. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नोटबंदीला ३ वर्ष पूर्ण; अर्थव्यवस्थेच्या संकटावरून प्रियांका गांधींचा मोदींवर निशाणा
नोटाबंदी ही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी एक ‘आपत्ती’ असल्याचे सिद्ध करत काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. नोव्हेंबर २०१९ मध्ये नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रियंकाने मोदी सरकारवर हल्ला केला.
5 वर्षांपूर्वी -
धक्का! इन्फोसिसमधील १२ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार
आयटी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या कॉग्निझंटने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आता इन्फोसिसनेही त्याच दिशेने पाऊल टाकले आहे. इन्फोसिस मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कॉग्निझंटने कर्मचारी कपातीसाठी जो मार्ग अवलंबला आहे तशाच प्रकारे इन्फोसिसही कपात करणार आहे. वरिष्ठ आणि मधल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढणार आहे. यानुसार इन्फोसिस १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर आणखी महाग
सिलिडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ७७ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता ६८१.५० रूपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईत १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ६५१ रूपये मोजावे लागणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये प्रवेश करणारे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर पोटनिवडणुकीत पराभूत
केवळ महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीतच नव्हे, तर गुजरातमध्येही भाजपाचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमधील ६ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपने बायड व थाराद या विधानसभा जागा गमावल्या असून कॉंग्रेसचा विजय झाला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY