महत्वाच्या बातम्या
-
हरयाणा निवडणुकीत मोदी हवा ओसरली; राहुल गांधींचा संयमी प्रचार फलदायी
एकतर्फी विजय मिळवून हरयाणात सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आज जोरदात धक्का बसला. आज झालेल्या हरयाणा विधानसभेच्या मतमोजणीचा कौल त्रिशंकू लागला असून, भारतीय जनता पक्षाला ४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ३१ जागांवर विजय मिळवला आहे. हरयाणामध्ये जननायक जनता पार्टी किंगमेकर ठरली असून, जननायक जनता पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. तर इतरांच्या खात्यात ९ जागा गेल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अडचणीत असलेल्या BSNL, MTNLचे विलिनिकरण होणार: केंद्राचा निर्णय
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बीएसएनएल आणि एमटीएनएलचं विलिनीकरण होणार आहे. आज झालेल्या केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या दोन्ही कंपन्या सरकार बंद करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
Exit Poll: हरियाणामध्ये भाजपाला धक्का बसण्याची शक्यता
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी या निवडणुकांच्या निकालाबाबतचे अंदाज व्यक्त केले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचं सरकार येईल, असा अंदाज सर्वच संस्थांच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. परंतु हरियाणाबाबत एका संस्थेनी वर्तवलेल्या अंदाजाने भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मागील ५ वर्षांपासून एनपीए समस्येमुळे बँकिंग क्षेत्रावरील संकट चिंताजनक: अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी
देशातील बँकिंग क्षेत्रावरील संकट चिंताजनक आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी धडाडीने निर्णय घ्यायला हवेत, असे मत नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
मीडिया तुम्हाला माझ्याविरुद्ध बोलायला भाग पाडेल; मोदींचा सावध राहण्याचा इशारा
पंतप्रधान मोदी यांनी मला मीडियापासून सावध राहण्यास सांगितलंय. मीडिया तुम्हाला माझ्या विरोधात बोलायला भाग पाडेल,’ असं त्यांनी हसत-हसत सांगितल्याची माहिती नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आज दिली.
6 वर्षांपूर्वी -
राज यांनी सभेत विषय ताणला; झोपलेल्या भाजपाला जाग; अमोल यादवला उड्डाण परवाना मंजूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील जवळपास सर्वच सभांमध्ये अमोल यादव या मराठी तरुणासंबंधित विषय उचलून धरला. सरकारच्या मेक इन इंडिया योजनेचे वाभाडेच राज ठाकरे यांनी सभांमधून काढले होते. एक मराठी तरुण एवढी मोठी झेप घेतो आणि त्यानंतर त्याचा उपगोय सत्ताधारी केवळ स्वतःचं मार्केटिंग करून घेताना दिसले. सरकार दरबारी हेलपाटे घालणारा अमोल यादव जवळपास अमेरिकेत जाण्याच्या तयारीत होता आणि त्यासाठी त्याने प्राथमिक स्वरूपात संपर्क देखील केला होता. सरकार दरबारी सदर विषय जवळपास दुर्लक्षित झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: EVM मशिन सेट आहे; कोणतही बटन दाबलं तरी मत कमळालाच; भाजप उमेदवाराचा दावा
मागील काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षावर ईव्हीएम’मधील गडबडीवरून विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवाराकडे कोणतीही प्रचार यंत्रणा नसताना देखील अनेकजण मोठ्या फरकाने आमदार-खासदार बनत असल्याचा आरोप झाला आहे. भाजप ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुका जिंकतं असा आरोप यापूर्वी अनेकवेळेला झालेला असताना भाजपचे अनेक उमेदवार अनेकवेळा ते खुलेआम स्वीकारताना दिसले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: २०१४ पासून भाजपच्या मोबाईल टॉर्च इव्हेन्टला अनेक शहरं फसली; नंतर विकासाला मुकली?
पंतप्रधान नरेंद्र यांची काल पुण्यात विधानसभेच्या निमित्ताने सभा पार पडली. वास्तविक प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोदींच्या दिशेने असले तरी सभेत पुढचा काही भाग सोडल्यास रिकाम्या खुर्च्यांची खच मात्र सहज नजरेस पडत होता. सभेला संबोधित करताना मोदींनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं. त्यात ते असं म्हणाले की, ‘सरकार येऊन आता कुठे ५ महिने झाले आहे आणि खूप काही करायचं आहे’, यावरून मोदींना केंद्रात भाजपचं सरकार मागील सलग साडेपाच वर्षांपासून असल्याचा विसर पडल्याचं दिसून आलं.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: मोदींनी भाजपच्या खासदार व आमदारांच्या ५ वर्षातील कामांचा हिशेबच दिला नाही
पंतप्रधान नरेंद्र यांची काल पुण्यात विधानसभेच्या निमित्ताने सभा पार पडली. वास्तविक प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोदींच्या दिशेने असले तरी सभेत पुढचा काही भाग सोडल्यास रिकाम्या खुर्च्यांची खच मात्र सहज नजरेस पडत होता. सभेला संबोधित करताना मोदींनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं. त्यात ते असं म्हणाले की, ‘सरकार येऊन आता कुठे ५ महिने झाले आहे आणि खूप काही करायचं आहे’, यावरून मोदींना केंद्रात भाजपचं सरकार मागील सलग साडेपाच वर्षांपासून असल्याचा विसर पडल्याचं दिसून आलं.
6 वर्षांपूर्वी -
सलग ५ वर्ष ५ महिने सत्तेत तरी मोदी पुणेकरांना म्हणाले, 'सत्तेत येऊन ५ महिने झाले'
पंतप्रधान नरेंद्र यांची काल पुण्यात विधानसभेच्या निमित्ताने सभा पार पडली. वास्तविक प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोदींच्या दिशेने असले तरी सभेत पुढचा काही भाग सोडल्यास रिकाम्या खुर्च्यांची खच मात्र सहज नजरेस पडत होता. सभेला संबोधित करताना मोदींनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं. त्यात ते असं म्हणाले की, ‘सरकार येऊन आता कुठे ५ महिने झाले आहे आणि खूप काही करायचं आहे’, यावरून मोदींना केंद्रात भाजपचं सरकार मागील सलग साडेपाच वर्षांपासून असल्याचा विसर पडल्याचं दिसून आलं.
6 वर्षांपूर्वी -
अर्थशास्त्राचे नियम कुणाची छाती किती इंचाची आहे, हे बघत नाही: माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा
देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रुळावर येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणा-या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय अर्थव्यवस्था किमान ३ वर्षे तरी रुळावर येणार नाही: माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा
देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रुळावर येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणा-या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांचा प्रश्न राज्यातील मूलभूत मुद्द्यांवर बोलण्याचा; मोदींनी थेट राज्यातील शहीद जवानांशी संबंध जोडला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. कलम ३७० हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. त्यांना त्रास होत आहे. अशी मंडळी कलम ३७० चा महाराष्ट्राशी काय संबध आहे, असा सवाल विचारत आहेत. कलम ३७० चा महाराष्ट्राशी संबंध काय असे विचारणाऱ्यांनो डूब मरो, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेत CRPF जवानांच्या अन विधानसभेत राज्यातील जवानांच्या बलिदानाचा उल्लेख करत मतं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. कलम ३७० हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. त्यांना त्रास होत आहे. अशी मंडळी कलम ३७० चा महाराष्ट्राशी काय संबध आहे, असा सवाल विचारत आहेत. कलम ३७० चा महाराष्ट्राशी संबंध काय असे विचारणाऱ्यांनो डूब मरो, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या नव्या भारतात उपासमारीची स्थिती पाकिस्तानपेक्षाही भीषण: ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट
भारतात उपासमारीची समस्या अधिक गंभीर झाल्याचं ग्लोबल हंगर इंडेक्समधून (जीएचआय) समोर आलंय. जीएचआयमध्ये भारताची घसरण झालीय. ११७ देशांच्या यादीत भारत १०२व्या क्रमांकावर फेकला गेलाय. दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वांत खालचा क्रमांक आहे. दक्षिण आशियातील इतर देश हे ६६ ते ९४ व्या स्थानावर आहेत. भारत या यादीत ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्याही मागे आहे. तर पाकिस्तान या यादीत ९४व्या क्रमांकावर आहे.
6 वर्षांपूर्वी -
PMC बँक: नोटबंदीप्रमाणेच लोकांचे जीव जात आहेत; पण मोदी सभेत भाष्य करणार का?
घोटाळ्याच्या विळख्यात अडकलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यानंतर या बँकेच्या प्रामाणिक खातेदारांवर मोठा आघात झाला असून आपली आयुष्याची कमाई बुडाल्याच्या भीतीने खातेधारक व त्यांचे कुटुंबीय गलितगात्र झाले आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या दोन दिवसांत या बँकेच्या दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या संकटाला वेगळंच वळण लागलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
PMC बँक ग्राहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; सरकारमुळे चिमुकल्याने त्याचा बाबा गमावला
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँक घोटाळ्यातील खातेदार संजय गुलाटी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. संजय गुलाटी यांच्या कुटुंबाचे तब्बल ९० लाख रुपये पीएमसी बँकेत अडकले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यापूर्वी संजय गुलाटी यांनी स्वतःची जेट एअरवेजची नोकरी गमावली होती आणि आता आयुष्यभर कमावलेले पैसे पीएमसी बँकेत अडकल्याने आणि सरकारची जवाबदारी झटकण्याची बातमी पाहून ते मागील काही दिवसांपासून प्रचंड तणावात होते. मात्र तोच धक्का असह्य झाल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष सोमवारी संजय गुलाटी किल्ला स्वतः देखील कोर्टासमोर झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. पण दुपारी घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
#मोदी_परत_जा ट्रेंडिंग धुमाकूळ; एका दिवसात लाखाहून अधिक ट्विट
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा रविवारी जळगावमध्ये पार पडली. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाला मराठीमधून सुरुवात केली. मात्र मोदींच्या या पहिल्याच सभेला अनेकांनी विरोध केल्याचे इंटरनेटवर पहायला मिळाले. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग रविवारी रात्री मोदी भाषण संपवून परत गेल्यानंतरही ट्विटवर इंडियावर टॉप ट्रेण्डींग होता.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजींच्या राज्यात शेतकरी चिंतेत आणि उद्योगपती मजेत - राहुल गांधी
उद्योगपतींचं साडेपाच लाख कोटींचं कर्ज माफ झालं. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? मोदी, शहा मूळ प्रश्नांवरून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीसाठी औसामधील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्रातील काँग्रेसमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात काँग्रेसची पाळमुळं रुजली आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या विषयांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचा काश्मीर केंद्रित प्रचार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा झाली आहे. जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदींच्या पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली. तर यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्यांना निवडून द्या असं आवाहनही मोदींनी यावेळी जनतेला केलं. दरम्यान, याहीवेळेस मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON