महत्वाच्या बातम्या
-
मोदींनी म्हटलेला शेर मिर्झा गालिब यांचा नाही, तर तो समाज माध्यमांवरून आलेला
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या एका शायरीचा उल्लेख केला. दरम्यान नरेंद्र मोदींनी शायरीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित असलेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर शायरीच्या अंदाजात निशाणा साधला. त्यावेळी तुमचा नवा भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला जुना भारत परत द्या, अशा शब्दांत आझाद यांनी मोदींना बोचऱ्या शब्दात लक्ष्य केलं होतं. गुलामनबी आझाद यांच्या टीकेला मोदींनी काल शायरीच्या माध्यमातून उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
...तर मुस्लीम युवकांचं शिर कापून टाकलं जाईल: भाजप खासदार सोयम बापूराव
तेलंगणा येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार सोयम बापूराव यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने देशभर चर्चा रंगली आहे. जर कोणी मुस्लीम युवक आदिवासी मुलींच्या पाठीमागे लागला असेल तर त्याचे शिर कापून टाकलं जाईल असं वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे. आदिलाबाद येथील खासदार सोयम बापूराव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे त्यात ते असं विधान करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पद्मश्री पुरस्काराचा काय उपयोग? आता मला शेतात मजूर कामही मिळत नाही: पद्मश्री दैतारी नायक
डोंगरातून तब्बल तीन किलोमीटरचा कालवा खणल्यानं यंदा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या दैतारी नायक सध्या रोजगार नसल्यानं हालाकीची परिस्थिती जगात आहेत. मात्र पद्मश्री पुरस्कार मिळून देखील रोजचा रोजगार मिळण्यात प्रचंड अडथळे येत असल्यानं चरितार्थ चालवणं कठीण होत असल्याची व्यथा नायक यांनी मांडली. तर मोदी सरकारनं देखील आश्वासन न पाळल्याचा आरोप त्यांच्या मुलानं केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशात मागील ५ वर्षापासून 'सूपर इमर्जन्सी': ममता बॅनर्जी
भारतात ४४ वर्षापूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आजच्या या आणीबाणी घटनेला प्रत्येक जण आपल्यापरिने ट्विट करत भाष्य करत आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीच्या या घटनेवर ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून ममता यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आणीबाणी: 'हा नवा भारत आहे' सांगणारे भाजप नेते अजूनही जुन्या आठवणीतच मग्न
देशातील लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आणीबाणीचा दिवस ओळखला जातो. २५ जून १९७५ रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आज आणीबाणीच्या घोषणेला तब्बल ४४ वर्ष उलटली आहेत. आणीबाणी विरोधात पंतप्रधानांसह भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंत्र्यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या विरोधातील एक खास व्हिडीओ ट्विट केला आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खास बॅनर बनवून राजकीय स्वार्थासाठी देशातील लोकशाहीची हत्या केली असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आचारसंहिता भंग: मोदी-शहांच्या निकालातील दुमत उघड केल्यास जीविताला धोका: निवडणूक आयोग
लोकसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंगाच्या प्रकरणांत निर्दोष जाहीर करणाऱ्या निकालातील दुमताचा तपशील उघड म्हणजे सार्वजनिक करण्याची मागणी निवडणूक आयोगाने स्पष्ट पणे फेटाळली आहे. कारण ही माहिती उघड केल्यास कुणाच्या तरी जीविताला धोका पोहोचू शकतो, असे कारण निवडणूक आयोगाने दिले आहे आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ब्रिटीश हेराल्ड: मोदी जगात पॉवरफुल? इथेही खोटी प्रसिद्धी? ते ऑनलाईन मॅगझीन एका भारतीयाचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रभावशाली राजकीय व्यक्ती बनल्याचे ब्रिटीश हेराल्ड’ने २०१९ च्या सर्वेक्षणातून पुढे आले. त्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून मोदींनी येथे बाजी मारली अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि सर्वच प्रसिद्ध प्रसार माध्यमांनी कोणतीही शहानिशा न करता बातम्या प्रसिद्ध केल्या. ब्रिटीश हेराल्डने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी स्वतःच्याच वाचकांचा पोल तयार केला होता. या नामांकनाच्या यादीत जगातील एकूण २५ प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला होता.
6 वर्षांपूर्वी -
मोदींना शिखर धवनच्या दुखापतीची काळजी; बिहारमध्ये चमकी तापाने १६५ बालक मृत्युमुखी पण..?
बिहारमध्ये चमकी तापाचं थैमान अजून सुरु असून मृत बालकांची संख्या १६५ वर पोहोचली असून ३०० जण अद्यापही या अत्यंत गंभीर तापाच्या धोक्यातून बाहेर आलेले नाहीत. तसेच इतर इस्पितळांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारी देखील अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. या एकूण मृत बालकांमध्ये ८५ टक्के प्रमाण हे मुलींचे असल्याने इथली परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरपेक्षा महाग; मग ईव्हीएमचा हट्ट का?
जगातील अनेक प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमाने जाणाऱ्या पैशांचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार ३००, तर ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी ३३ हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच ४५०० कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यात देखील किती पळवाटा आहेत असेही उदयनराजेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान घरकुल योजनेत घोटाळा; न्यायालयात याचिका दाखल, २ सरकारी कर्मचाऱ्यांना अटक
उत्तर प्रदेशात रसडा जिल्ह्यातील अठीला गावात पंतप्रधान घरकुल योजनेत घोटाळा केल्याच्या आरोपावरून स्थानिक पोलिसांनी दोन सरकारी कर्मचाऱ्यांना अटक करून त्यांना तुरुंगात धाडण्यात आले आहे. रसडा गावाचे प्रभारी कोतवाल ज्ञानेश्वर मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नियुक्त केलेले नोडल अधिकारी सेंथिल पांडियन सी यांच्याकडे अठीला गावातील स्थानिक लोकांनी लेखी तक्रार करून पंतप्रधान घरकुल योजनेत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता.
6 वर्षांपूर्वी -
भीषण बेरोजगारी? रेल्वे पोलिसांच्या केवळ १११७ जागांसाठी तब्बल १४ लाख ७१ हजार अर्ज
भारतीय रेल्वे विभागाकडून रेल्वे पोलीस दल आणि रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक संवर्गासाठी (आरपीसीएफ) १११७ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या जागांच्या भरतीसाठी देशभरातून तब्बल १४ लाख ७१ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. म्हणजेच एका जागेसाठी जवळपास १३१७ विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे आहे. यात अर्ज करणारे सर्वाधिक उमेदवार हे महाराष्ट्रातून असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
गरिबी, महागाई व बेरोजगारीवरून लोकांना विचलित करण्यासाठी 'एक देश एक निवडणुकीचा' घाट
एक देश एक निवडणूकवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. परंतु या बैठकीपासून विरोधी पक्षाचे नेते दूरच राहणे पसंत करत आहेत. पश्चिम बंगालच्या राजकारणावरुन ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षापासून दूर राहण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत हे निश्चित आहे.
6 वर्षांपूर्वी -
नोकऱ्यांची कमी! उच्च शिक्षण घेऊन देखील तरुण डिलिवरी बॉय बनत आहेत
देशात सध्या रोजगारावरून परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली असल्याची आकडेवारी समोर आली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. सरकारने देखील एक आकडेवारी मान्य केली आहे जॅमध्ये २०१७-१८ या कालावधीत बेरोजगारी मागील ४५ वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. मात्र विषय केवळ बेरोजगारांचा नसून तो सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकऱ्यांसंबंधित मजबुरीचा देखील आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसंख्येच्या बाबतीत भारत येत्या ८ वर्षात चीनला मागे टाकणार: संयुक्त राष्ट्राचा अहवाल
लोकसंख्येच्या बाबतीत पुढील ८ वर्षात म्हणजेच २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकणार असं संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या विभागाने The World Population 2019 : Highlights या नावे एक अहवाल सार्वजनिक केला आहे. ज्यामध्ये भारत हा २०२७ पर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून उदयास येऊ शकतो असं नमूद केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आसाममधील भाजप सरकार संकटात; सहयोगी पक्षातील कार्यकर्त्यांना मारहाण महागात?
भाजपचे आसाममधील सरकारची सत्ता धोक्यात आली आहे. कारण भाजपचा सहयोगी पक्ष आयपीएफटी’ने भाजपवर आरोप करताना थेट दुसरा पर्याय शोधण्याची धमकी देत एकप्रकारे सरकार अल्पमतात आणण्याची धमकी भाजपाला दिली आहे. विशेष करून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आसाममध्ये आयपीएफटी’च्या कार्यकर्त्यांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा मानसिक छळ आणि त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा गंभीर आरोप केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
खंबाटा एअर लाईन्स डुबल्यानंतर, आता जेट सुद्धा दिवाळखोरीत
मागील २ महिन्यांपासून संपूर्ण व्यवसाय ठप्प अवस्थेत असलेल्या जेट एअरवेजमधील हिस्सा खरेदीसाठी केवळ एकमेव प्रस्ताव समोर आल्याने भांडवली बाजारात सूचिबद्ध हवाई कंपनी दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय अखेर राष्ट्रीयकृत बँक स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेट एअरवेजला ८,००० कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्या व्यापारी बँकांचे नेतृत्व करणाऱ्या स्टेट बँकेने ही भूमिका स्पष्ट केली आहे. धनकोंच्या बैठकीत जेटबाबतचा हा निर्णय झाल्याचे बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीत आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू; विरोधी पक्षनेत्याबाबत संभ्रम कायम
मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज दिवस आहे. दरम्यान या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक विस्कळीत झालेले दिसत आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु विरोधी पक्षांकडून अशा प्रकारचे कुठलेही पाऊल उचललेले दिसले नाही.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: फक्त मोदींना? तसे 'छत्री' सन्मान ७०-८०च्या दशकात सुद्धा भारताच्या पंतप्रधानांना मिळत होते
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीसाठी किरगिझस्तान येथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाटयाला एक सन्मान आला. राजधानी बिश्केक येथे पोहोचल्यानंतर किरगिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष सूरॉनबे जीनबीकोव्ह यांनी समारंभपूर्वक मोदींचे स्वागत केले. त्याचवेळी तिथे पाऊस सुरु झाला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष सूरॉनबे जीनबीकोव्ह यांनी मोदींच्या डोक्यावर छत्री धरली होती.
6 वर्षांपूर्वी -
रशियन एस-४०० खरेदी व्यवहार: ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी
भारत रशियाकडून अत्याधुनिक एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून हा व्यवहार थांबवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. भारताचा हा निर्णय दीर्घ कालावाधीसाठी भारताच्याच हिताचा नसेल, असे अमेरिकेकडून सूचित करण्यात आले आहे. तसेच या व्यवहारामुळे दोन्ही देशांच्या परस्पर भागीदारीवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी धमकी देखील अमेरिकेकडून देण्यात आली. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोंपियो यांच्या भारत दौऱ्यापूर्वी ओसाका येथील जी-२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
तीच तारीख -तोच महिना! राज यांच्या व्यंगचित्रातला मोदींचा 'तो' खासगी 'प्लॅन' सत्य ठरला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १३ जून २०१८ मध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होतं. त्यात राज ठाकरे यांनी यूपीएससी परीक्षा अथक मेहनतीने उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत उच्च पदावर विराजमान होणाऱ्या अधिकाऱ्यांचे भवितव्य आणि UPSCच्या संभाव्य विद्यार्थ्यांच्या डोकावर मोदी खाजगी क्षेत्रातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांची नेमणूक करतील असा ठोकताळा मांडला होता. मात्र आज त्याच तारखेला आणि त्याच महिन्यात म्हणजे १३ जून २०१९ रोजी राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मांडलेला तो राजकीय ‘ठोकताळा’ सत्यात उतरला आहे, असंच मान्य करावं लागेल.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY