महत्वाच्या बातम्या
-
मोदींचा चमत्कारी विजय ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत चिंतेची बाब: द वॉशिंग्टन पोस्ट
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात मोदी लाट नसताना देखील प्रत्यक्षात मोदी त्सुनामी आली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मोदींच्या या यशानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तसेच लोकांमध्ये सुद्धा आता २-३ दिवसानंतर वेगळीच चर्चा चौकाचौकात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने या संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला आहे. भारतासारख्या विशाल लोकशाहीत मोदींचा आश्चर्यकारक विजय अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
6 वर्षांपूर्वी -
गावं-शहरांतील चौकांमध्ये गप्पा रंगल्या 'यांना मतं नक्की दिली तरी कोणी?'
देशभरात रोजगार आणि महागाईसारख्या प्रमुख विषयांवरून भाजप आणि मोदी विरोधी वातावरण असताना स्वतः भाजप देखील बहुमताने सत्तेत येईल का या भीतीने ग्रासली होती. समाज माध्यमांवर मोदी किंवा भाजप संबंधित येणाऱ्या बातम्यांवर नेटिझन्स देखील तुफान टीकेची झोड उठवताना दिसत होते. त्या प्रतिकऱ्यांमध्ये भाजप किंवा मोदींच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया शोधून देखील सापडणं कठीण होतं. मात्र मोदी लाट तर सोडा, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी मोदी त्सुनामी आली अनेकजण बुचकळ्यात पडल्याचे चित्र आहे.
6 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! मुस्लिम तरुणाची टोपी काढली व जय श्रीराम बोलण्यास सांगून जबर मारहाण
येथे काही अज्ञात तरुणांनी एका २५ वर्षीय मुस्लिम युवकाला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने पारंपारिक टोपी घातली असल्याने ही मारहाण करण्यात आल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मोहम्मद बरकत आलम असं या तरुणाचं नाव असून तो मुळचा बिहारचा आहे. गुरुग्राम येथील जकोब पुरा परिसरात तो राहतो.
6 वर्षांपूर्वी -
मोदी लाट नसताना 'मोदी-त्सुनामी' आली आणि या बातम्या समाज माध्यमांवर व्हायरल
देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
भारताने पुरवलेल्या ‘EVM’वर बोत्स्वाना देशात संशय; थेट निवडणूक आयोगाला कोर्टात हजेरीचे आदेश होते
देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात राष्ट्रवादीला दुसरा सहकारी शोधण्याची गरज; अन्यथा काँग्रेससोबत स्वतःही?
लोकसभेचे निकाल लागले आणि पुन्हा मोदी सरकार सत्तेत आले, मात्र काँग्रेस देशात जवळपास भुईसपाट झाली. अगदी देशाच्या संसदेत विरोधी पक्ष नेत्याचं पद देखील अशक्य झालं आहे. देशभरातील तब्बल ८ राज्य काँग्रेसमुक्त झाली आहेत. मात्र महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर इथे देखील राज्य काँग्रेसमुक्त होण्यापासून थोडक्यात वाचलं. परंतु ते देखील लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर काही दिवसांनी आयत्यावेळी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये आले आणि चंद्रपूर लोकसभेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि त्यामुळे काँग्रेस ९ राज्यात भुईसपाट होण्यापासून थोडक्यात वाचली.
6 वर्षांपूर्वी -
'PM नरेंद्र मोदी' सिनेमाकडे भक्तांसहित प्रेक्षकांची पाठ; कार्टून सिनेमाची कमाई पण अधिक
भारताच्या राजकीय इतिहासात बहुमताने निवडून येणारे मोदींना त्याच्या जीवनपटावर आधारित सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक अल्पमतात देखील हजेरी लावताना दिसत नाही. देशाची सत्ता पुन्हा एकदा मिळवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाकडं सिनेरसिकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटानं केवळ २.२५ ते २.५० कोटींची कमाई केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा; उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता
१६ वी लोकसभा विसर्जित करण्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. तर १७ व्या लोकसभा गठीत करण्याची एनडीए’कडून पूर्ण तयारी सुरु झाली आहे. या दरम्यान एनडीएची आज नवी दिल्ली येथे संध्याकाळी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नियुक्ती होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ७:३० वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत अधिकृत वृत्त अजून प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO - लोकसभेचा निकाल लागला आणि गोरक्षकांचे हल्ले पुन्हा सुरु
भाजपने २३ मे रोजी दणदणीत विजय प्राप्त केला आणि त्यांच्या समर्थकांचा धिंगाणा पुन्हा सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सदर घटना मध्य प्रदेशातील असल्याचं समजतं आहे. व्हिडिओ २-३ दिवसांपूर्वीचा आहे आणि ही घटना मध्य प्रदशातील शिवणी जिल्ह्यातील असल्याचे वृत्त टाइम्सनाऊ’ने प्रसिद्ध केले आहे. श्रीराम सेनेचे हे गोरक्षक रिक्षाने बीफ घेऊन जाणाऱ्या मुल्सिम युवकाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांनी EVM'ची 'ती' तांत्रिक बाजू समजून घ्यावी, अन्यथा राजकीय त्सुनामी दर ५ वर्षांनी येईल
काही महिन्यांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशिन्स सुरक्षित नसल्याचा आणि त्यात फेरफार शक्य असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतरच व्हीव्हीपॅट’चा पर्याय पुढे आला होता. मात्र २०१४ पासून ते कालच्या निकालापर्यंत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे मोदी त्सुनामी आणि ईव्हीएम. या बातमीमागील उद्देश हा भारतीय निवडणूक आयोगावर संशय घेणं नसून तर केवळ तंत्रज्ञानाच्या शक्य असणाऱ्या शक्यता मांडणं हा आहे. वास्तविक ईव्हीएमबाबत तांत्रिक (तंत्रज्ञान) चुकीच्या इतक्या बातम्या पेरल्या गेल्या आहेत की प्रत्येकाला त्यात काहीच नवल वाटताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
EVM: विरोधकांनो भाजप नेत्याचं हे पुस्तक वाचा; प्रेरित व्हा; रस्त्यावर उतरा, अन्यथा नष्ट व्हा
सध्या देशात मोदी विरोधी वातावरण असताना भाजपाला मिळालेलं यश हे अनेकांना न समजण्यापलीकडील झालं आहे. अगदी नगरसेवक पदावर ८-१० हजार मतांचा पल्ला कधी गाठू न शकणारे ५-६ लाख मतं घेऊन घेऊन विजयी झाले. तसेच अनेक उमेदवारांना स्वतःचं आणि कुटुंबातील लोकं मतदान करत नसल्याचे दैवी चमत्कार देखील पाहायला मिळत आहेत. मात्र अशीच काहीशी स्थिती भाजपाची २००९ मधील निवडणुकीत झाली होती आणि लालकृष्ण अडवाणी पासून सर्व नेत्यांनी ईव्हीएम’वर संशय व्यक्त करत आगपाखड केली होती.
6 वर्षांपूर्वी -
सुरतमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सला आग लागून २० जणांचा मृत्यू
गुजरातमधल्या सुरतच्या तक्षशिला इमारतीला आग लागून आत्तापर्यंत एकूण वीस निरपराधांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तब्बल दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे असेही समजते आहे. दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या इमारतीला या इमारतीला लागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी उड्या टाकल्या आहेत. काहीजण या इमारतीत अडकलेही आहेत. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आहे. हा क्लास सुरू असतानाच अचानक आग लागली त्यामुळे विद्यार्थ्यांनी अडकलेल्या लोकांनी उड्या टाकल्या. तसेच इतर काही लोकांनीही इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या टाकल्या.
6 वर्षांपूर्वी -
जीएसटी'मुळे मलेशिया, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सरकार पराभूत, तर भारतात?
जगात जीएसटी म्हणजे ‘वस्तू आणि सेवा कर’ लागू करणाऱ्या सरकारचे दारुण पराभव झाले आहेत. मात्र आपल्या देशात नेमकं त्याच्या विरुद्ध होताना दिसत आहे. स्वतः उद्योगधंदे करणाऱ्या राज्याच्या जनतेचे म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरुवातील नरेंद्र मोदी यांनी जीएसटी’ला प्रचंड विरोध केला होता आणि तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. मात्र सत्तेत येताच विरोध करणाऱ्या नरेंद्र मोदींनी भारतात जीएसटी लागू केल्याचे सर्वश्रुत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मतदान झालं राष्ट्रवाद व धर्मावर; आता बेरोजगारी व महागाईवर तरुणांचा व सामान्यांचा वाली कोणीच नसेल?
काळाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकाल राष्ट्रवाद आणि धर्म हेच आपल्या देशातील मुख्य आणि महत्वाचे प्रश्न असल्याचं अधोरेखित केलं आहे. त्यामुळे यापुढे सामान्यांशी आणि प्रत्येक घराशी निगडित असणारे महागाई आणि रोजगार सारखे अत्यंत महत्वाचे प्रश्न आता निडणूकीचे विषय राहिले नाहीत हे सत्य आहे. कारण मागील ५ वर्ष महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांनी आणि बेरोजगारांनी स्वतः सरकारला भासगोस मतदान करून, सरकारला आम्ही बेरोजगार आणि महागाईने होरपळून मेलो तरी चालेल, परंतु धर्म आणि राष्ट्रवाद महत्वाचा आहे संदेश दिला आहे. त्यामुळे आता त्याच विषयावर आधारित खाद्य सामान्यांना सरकार देत राहील.
6 वर्षांपूर्वी -
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमकी
लोकसभा निवडणुकींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला मोठं यश प्राप्त झालं आहे. दरम्यान या यशाबद्दल दिग्दर्शक अनुराग कश्यप याने पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्याच वेळी त्याने माझ्या मुलीला धमकावणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशाप्रकारे तोंड द्यावं हे देखील आम्हाला सांगा असाही टोलाही त्याने मोदींना लगावला आहे. मोदींच्या विजयानंतर अनुरागच्या मुलीला ट्विटवरुन एका मोदी समर्थकाने अश्लील भाषेत थेट बलात्काराची धमकी दिली आहे. याच ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत अनुरागने मोदींना सवाल केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप स्वबळावर सत्तेत आल्यास शिवसेनेची अवस्था पुन्हा रडकुंडीची होणार?
सत्तेत येण्यासाठी भाजपने मित्र पक्षांना जवळ केलं खरं आणि शिवसेनेने देखील भाजपाला आपल्याशिवाय गत्यंतर नाही असं वातावरण निर्माण केल्याचे चित्र होते. २०१४च्या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेची अवस्था सत्तेत असून देखील नसल्यासारखीच असल्याचे पाहायला मिळाले. मात्र सध्या सुरु असलेले निकालाचे कल पाहता भाजप बहुमताने पुन्हा सत्तेत येईल अशी अशी चिन्हं आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार केवळ २०० ते २००० मतांनी आघाडीवर; कल कधीही बदलू शकतात
सध्याच्या प्राथमिक फेरीत जरी युतीचे उमेदवार आघाडीवर असले तरी त्यांच्या आघाडीत केवळ २०० ते २००० मतांचा फरक आहे. त्यामुळे सध्या प्राथमिक फेरीत दिसणारे कल शेवटच्या क्षणी बदलू शकतात असं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'एक्झिट पोल'खेळ: झटपट शेअर मार्केट नफा; पण निकाल वेगळेच असतील आणि ही आहे रणनीती
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी एवघा केवळ दिवस शिल्लक आहे. लोकसभेसाठी शेवटच्या म्हणजे ७व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि देशभरातील टीव्ही वृत्त वाहिन्यांनी एकप्रकारे पैसे घेऊन ‘एक्झिट पोल’खेळ केल्याचं अनेक तज्ज्ञांशी संपर्क साधल्यावर समोर येत आहे. कारण यामागे देखील ४-५ दिवसात शेअर बाजारातून मोठा नफा कमावून स्वतःच भांडवली मूल्य वाढवणे, इंट्रा-डे शेअर खरेदी विक्रीतून ४-५ दिवस बक्कळ नफा कमावणे आणि एक कोणालाही न समजणारी राजकीय गणितं आखणे असं सिद्ध होतं आहे. कारण मुळात देशात मोदी लाट नसताना देखील जे चित्र अचानक एका दिवसात उभं केलं गेलं आहे त्यामागे देखील मोठं षडयंत्र आहे, ज्यामध्ये विरोधक अडकल्याचे दिसत आहे. कारण निकाल देखील ‘एक्झिट पोल’खेळच्या वेगळेच लागणार आहेत हे दुसरं सत्य आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO : 'एक्झिट पोल' आणि ईव्हीएम'वरून थेट शस्त्र आणि रक्तपाताची भाषा
मागील रविवारी संपलेल्या मतदानानंतर ‘एक्झिट पोल’ जाहीर झाले आणि देशभरातील विरोधकांनी निरनिराळी विधानं करण्यास सुरुवात केली आहे. जाहीर झालेल्या सर्वच पोल्समध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात यावेळी देशभरातील वृत्त वाहिन्यांनी केला आहे. यामुळे सत्तेत येण्याची आस लावून बसलेल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांचा अपेक्षाभंग झालाय. त्यामुळे बिथरलेल्या बिहारच्या नेत्याने चक्क शस्त्रच हातात घेण्याचं आवाहन केलं.
6 वर्षांपूर्वी -
खासगी वाहनं व दुकानांमध्ये ईव्हीएम सापडली; फेरफार होत असल्याचा संशय
लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास अवघे २ दिवस असताना ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे ठिकाणी भरून नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या व्हिडीओंमध्ये EVM मशीन्स अनधिकृत ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. यापैकी काही मशीन्स स्थानिक दुकानात, तर काही खासगी गाडीत असल्याचं दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY