महत्वाच्या बातम्या
-
निवडणुका संपताच भक्तांसकट सगळ्यांनाच टोप्या लावून ‘नमो टीव्ही’ गायब
लोकसभा निवडणुका संपताच सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला ‘नमो टीव्ही’ हे चॅनल दूरचित्रवाणीवरुन अचानक गायब झालं आहे. ‘नमो टीव्ही’वरून केवळ भारतीय जनता पक्षाशी संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जात होते. या चॅनलला भारतीय जनता पक्षाकडून निधी पुरवठा होत असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबताच या चॅनचलं प्रसारण देखील लगेच बंद झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून, केवळ लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा आणि स्वतःचे मार्केटिंग करण्यासाठी तो सुरु करण्यात आल्याच्या संशयाला जागा आहे.
6 वर्षांपूर्वी -
ऑस्ट्रेलियात संसदीय निवडणुकीत प्रत्यक्ष निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध लागले
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर रविवारी सर्वच टीव्ही वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांनी काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळाली. देशभरातील जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच सत्तेत विराजमान होणार असे संकेत देण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ वगळता यापूर्वी एक्झिट पोल खोटी ठरली व भलतेच निकाल आल्याचा इतिहास
काल लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपताच अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांची विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलची निरीक्षणं प्रसिद्ध केली आहेत. वास्तविक २३ तारखेला खरं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये एक्झिट पोलची दिली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळंही असू शकतं असा पूर्व इतिहास देखील आहे. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ मधील एक्झिट पोलची आकडेवारी त्याच उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्याव्येतिरिक्त ही अनेकदा निरनिराळ्या एजन्सीने केलेली एक्झिट पोल खोटी ठरली असल्याचे इतिहास आहे.
6 वर्षांपूर्वी -
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजार उसळला
लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल काल सर्वच वृत्तवाहिन्यांनी जाहीर केल्यानंतर आज शेअर बाजाराने मोठी उसळी मारल्याचे समजते. आज सकाळी शेअर बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स तब्बल ९०० अंकांनी वधारला. तर निफ्टी देखील ११,६४८ अंकांवर पोहोचला. यासह रूपया देखील ७३ पैशांनी मजबूत झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
बहुमत मिळणार नसल्याने मोदी लवकरच सरसंघचालकांची भेट घेणार; नागपूर लॉबी सक्रिय?
लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या २ दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात जाऊन विविध मुद्द्यावर सरसंघचालकांशी चर्चा करणार असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहेत आणि त्यामुळे २ दिवसांपूर्वी होणाऱ्या या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
EVM मध्ये फेरफार करण्यासाठी Exit Polls चा होतोय वापर: ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवरुन ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोठी शंका उपस्थित केली आहे. ‘एक्झिट पोलवर माझ्या विश्वास नाही, कारण अशा रणनितीचा वापर फक्त ईव्हिएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो’, असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
७व्या टप्प्यातील मतदान पूर्ण; थोड्याच वेळात जाहीर होणार एक्झिट पोल
लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या आणि ७व्या टप्प्यातील मतदान संध्याकाळी ६ वाजता अधिकृतपणे पूर्ण झाले असून संध्याकाळी ६:३० वाजता एक्झिट पोलचा अंदाज जाहीर होणार आहे. २३ मे रोजीच्या मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
५०० रुपये देऊन भाजपने बोटावर बळजबरी शाई लावली व मतदान करु नये सांगितलं
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे ७व्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांकडून आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. परंतु, युपीच्या चंदौली लोकसभा क्षेत्रातून एक अतिशय धक्कादायक वृत्त आहे. येथे मतदानाच्या एक दिवस आधीच मतदारांच्या बोटावर जबरदस्तीने शाई लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
केदारनाथला ध्यानसाधनेवेळी फोटोग्राफर व कॅमेरामन? ऐसा पंतप्रधान पुन्हा होणे नाही!
नरेंद्र मोदी कालच्या पत्रकार परिषदेवरून झालेल्या टीकेतून बाहेर येत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर पुन्हा जोरदार टीका करण्यात येत आहे. कारण केदारनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी दर्शन घेत ध्यानसाधना सुद्धा केली. त्यांच्या या ध्यानसाधनेची समाज माध्यमांमध्ये जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
आजवर मोदी व शहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी केली तर बिघडले कुठे? राज ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. मात्र आजवर या दोघांनी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतरांसोबत दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर त्यात बिघडले कुठे? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून अमित शहा पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
चुनावी जुमला! मतदान जवळपास संपण्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यातील २,००० रुपये परत घेतले?
लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून केवळ ७व्या टप्प्याचे मतदान उरले आहे. मात्र त्यानंतर हळुवारपणे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेले २,००० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडू लागले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप पसरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
परीक्षा आली! 'देवा मला पास कर' तशी 'त्यांची' आजची अवस्था?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि त्याचे थेट प्रक्षेपण देशभरातील वृत्त वाहिन्यांवर होईल याची देखील दक्षता घेतल्याचे पाहायला मिळाले. मोदींनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विशेष पूजा केली. यानंतर मोदी केदारनाथमध्ये ध्यान करणार आहेत. मोदींचा उत्तराखंड दौरा दोन दिवसांचा आहे. यानंतर ते सोमवारी (१९ मे) बद्रिनाथला जातील.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पत्रकार परिषदेत ‘मौन की बात’! राज ठाकरेंचं ट्विट
नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. परंतु त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मोदींना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी उत्तरं दिली. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच विरोधकांनी मोदींवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. आमच्या देशाचा पंतप्रधान पत्रकारांना सामोरा जायला घाबरतो, अशी टीका महिन्याभरापूर्वी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मोदींवर नेमक्या शब्दांत शरसंधान साधलं.
6 वर्षांपूर्वी -
प्रचारात 'ये मोदी हैं, जवाब जरूर देगा' आणि पत्रकारपरिषदेत 'अध्यक्षजी जवाब देंगे'!
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताना दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींनी प्रसार माध्यमांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. या पत्रकार परिषदेत मोदींसोबत अमित शहा आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र जर पत्रकार परिषदेत मोदींना प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरच द्यायची नव्हती तर त्यांनी येथे हजेरी तरी का लावली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
प.बंगालमधील घटनाक्रम हा ममतांना लक्ष करण्यासाठीच: मायावती
पश्चिम बंगालमध्ये काल घडलेला प्रकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लोकसभा निवडणुकीत लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता हे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीचा असा प्रचार धोकादायक आणि फार अन्यायकारक आहे. अशाप्रकारचं राजकारण पंतप्रधानपदाला न शोभणारं असल्याचा आरोप बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी, शहांना निवडणूक आयोग शरण: काँग्रेसचा थेट आरोप
कोलकाता येथे मंगळवारी अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी आणि जाळपोळ झाली. दरम्यान, या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या एकतर्फी भूमिकेवरून काँग्रेसने मुख्य निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर अक्षरशः शरणागती पत्करली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारावर एक दिवस आधीच बंदी घालण्याचा निर्णय हा पूर्णपणे घटनाविरोधीत आहे, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
माझी एकच जात आहे ती म्हणजे 'गरिबी' : नरेंद्र मोदी
मी कधी सुद्धा देशातील गरिबांचे पैसे लुटण्याचं पाप केलं नाही, आमच्यासाठी गरिबांचे रक्षण करणं हेच संपूर्ण जीवन आहे. जे दुख गरीब सहन करतात ते दुखं मी स्वत: सहन केलं आहे. मी गरिबांचे दुखं दूर करण्यासाठी जगतो. माझी फक्त एक जात आहे आणि ती म्हणजे गरिबी. त्यामुळे या गरिबीपासून मुक्त होण्याचा संकल्प आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचा वाराणसी गलिच्छतेच्या निच्चांकावर, २९व्या क्रमांकावरून ७०व्या क्रमांकावर घसरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता मोहिमे’चा नारा दिला असला तरी, स्वतःचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात मात्र वेगळे आणि अत्यंत भयाण चित्र पाहायला मिळते आहे. वाराणसी असंख्य मंदिरे आणि छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांनी भरलेले शहर आहे. मंदिरांच्या अवतीभोवतीचा परिसर आणि अरुंद गल्ल्यांमधील कचरा वाराणसीसारख्या सांस्कृतिक वारसा असलेल्या शहराला गालबोट लावतो. या वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात वाराणसीची ७०व्या क्रमांकावर घसरण झालेली असून मागील वर्षी वाराणसी २९व्या क्रमांकावर होते.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओकॉन बँक कर्ज घोटाळा: ईडीकडून चंदा कोचर यांची ८ तास कसून चौकशी
बँक कर्ज घोटाळा प्रकरणी आयसीआयसीआयच्या बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची सोमवारी तब्बल ८ तासांहून अधिक काळ अंमलबजावणी संचालनालयाने कसून चौकशी केली. त्याच्याविरोधातील बँक कर्जघोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ते ईडीसमोर उपस्थित झाले होते. सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झालेल्या कोचर दाम्पत्यांनी सुटका रात्री ८च्या सुमारास करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: ‘ती’ मुलाखत फिक्स होती ? मोदींवर गंभीर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, या मुलाखतीत बालाकोट एअरस्ट्राइकबाबत आणि १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेरा तसेच ई-मेलच्या वापराबाबत केलेल्या विधानांवरुन पंतप्रधानांवर मोठ्या प्रमाणात टीका होत करण्यात येते आहे. परंतु, या संपूर्ण मुलाखतीचं कथानक आधीच तयार होतं आणि त्यातील प्रश्न देखील ठरवून विचारण्यात आले, असा थेट आणि गंभीर आरोप मोदींवर काँग्रेस आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर व्हिडिओ द्वारे मुलाखत आधीच फिक्स करण्याचे आरोप होत आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा