महत्वाच्या बातम्या
-
तेव्हा कविता करकरेंनी मुख्यमंत्री मोदींची आर्थिक मदत नाकारली होती
काल साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले होते आणि देशात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून साध्वींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दरम्यान, सामान्यांपासून ते विरोधी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटताच साध्वी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून ते माझे वैयक्तिक मत असल्याचीही कबुली दिली आहे आणि भाजपने देखील प्रकरण अंगलट येईल म्हणून सदर विषयावर हात वर केले आहेत. दरम्यान, भाजप आता विषयाला बगल देण्यासाठी मोदी करकरेंच्या कुटुंबियांना भेटले होते असा खोटा कांगावा करत आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचं प्रतिक: नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमधील भाजपच्या अधिकृत उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या उमेदवारीच समर्थन केलं आहे. दशतवादाविरुद्ध कठोर पाऊल उचलणाची भाषा करणाऱ्या मोदी सरकारने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभेची उमेदवारी कशी काय दिली? असा थेट प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना टाईम्स नाऊ वाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना मोदींनी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचं प्रतिक असून काँग्रेसला ते अत्यंत महागात पडेल, असे धक्कादायक उत्तर मोदींनी दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
टि्वटरने योगी आदित्यनाथ यांचे 'ते' वादग्रस्त टि्वट हटवले
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ता संघर्षासाठी एकमेंकावर टीका करने चालू आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीगवर वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. यावर टि्वटरने कारवाई करत योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त टि्वट वेबसाईटवरून कायमस्वरूपी हटवले आहे. यासोबतच इतर नेत्यांचेही ३४ टि्वट हटवले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बोलायला मुद्दे नाहीत म्हणून जातीचे कार्ड खेळताय मोदी : अजित पवार
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून जोरदार प्रचार सभा घेतल्या जात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला जातीवरून टार्गेट करण्यात येत असल्याचं सांगितले. यावर अजित पवार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. बोलायला मुद्दे नाहीत म्हणून नरेंद्र मोदी जातीचे कार्ड खेळताय आशी टीका एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी केली आहे. आयोजीत प्रचार सभेत त्यांनी प्रसार माध्यमांसमोर मत व्यक्त केलं.
6 वर्षांपूर्वी -
एमपी, राजस्थान व गुजरातमध्ये पावसाने ३५ जणांचा बळी, मोदींच केवळ गुजरातसाठी मदतीचं ट्विट
मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सलग दोन दिवस म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी सुसाट वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी लाट नसल्याने धक्कादायक निकाल लागतील: राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणे मोदी लाट नसल्याने धक्कादायक निकाल लागू शकतात असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. ते पुण्यामध्ये बोलत होते. नरेंद्र मोदींबद्दल सामान्य जनतेमध्ये पाठिंब्याची थोडीफार भावना असली तरी मोदी लाट नक्कीच नाहीय. त्यामुळे २०१४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मोठी चुरस पाहायला मिळेल, असे सुहास पळशीकर म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल ३६ उद्योगपती देशातून फरार झाले आहेत; ईडीची न्यायालयात माहिती
फौजदारी गुन्हे दाखल असलेले तब्बल ३६ उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत, त्यामुळे ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुशेन मोहन गुप्ता देखील पळून जाण्याची शक्यता व्यक्त करत सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने सोमवारी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्यामुळे केवळ विजय मल्या आणि नीरव मोदीच नव्हे, तर अलीकडच्या काळात तब्बल ३६ उद्योगपती देशातून पळून गेले असल्याची माहिती ईडीने सोमवारी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयाला दिली.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी पाकबद्दल नाही तर भारताविषयी बोला : प्रियंका गांधी
भारतीय जनता पक्षाचे नेते फक्त स्वत:लाच राष्ट्रवादी आणि देशाप्रती प्रेम असणारी मंडळी समजतात. ते खरे असेल, तर देशातील साऱ्या शहीद जवानांचा सन्मान करावा. जर ते राष्ट्रवादी असतील तर लोकसभा निवडणुकांच्या काळात केवळ पाकिस्तानविषयी नव्हे, ता भारताविषयी बोलावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले. काँग्रेसचे स्थानिक उमेदवार राज बब्बर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचारसभेत त्या उपस्थितांना संबोधित करत होत्या. या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील मार्गदर्शन केले.
6 वर्षांपूर्वी -
‘चौकीदार चोर हैं’ वक्तव्य, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाची नोटीस
राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेवरुन सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना ही नोटीस बजावली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी तुम्हाला पँट घालता येत नव्हती तेव्हा नेहरु व इंदिराजींनी सैन्य दल उभारले : कमलनाथ
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देशाचे सैन्य दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना कमलनाथ यांनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पँट घालायला शिकले नव्हते तेव्हा जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधींनी देशाच्या सैन्यदलांची उभारणी केली असे कमलनाथ म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
तेव्हा राज ठाकरे आठवतील? मराठी युवकांच्या रोजगाराचा व मुंबईचा स्मार्ट गेम 'गिफ्ट'मार्गे होणार?
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांनी वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात रोजगारासारखे महत्वाचे मुद्दे मोदींच्या भाषणातून लुप्त झाले आहेत आणि त्याची जागा हिंदुत्व आणि भारतीय लष्कराच्या शौर्याने घेतली आहे. देशात २ कोटी रोजगार निर्माण करण्याचं आमिष देशातील तरुणांना दाखवत प्रत्यक्षात ५ कोटीच्यावर तरुण देशभरात बेरोजगार केले गेले. केंद्र सरकारला त्याचं काहीच सोयर सुतक नाही अशीच एकूण परिस्थिती आहे. समाज माध्यमाच्या विकृतीतून अनेक तरुणांचे मेंदू धर्म आणि भारतीय लष्कराच्या शौर्याभोवती असे काही गोंगावात ठेवले आहेत की त्या ‘फेसबुक’ वरील फ्री नेटपॅकने आपल्याला कधीच बेरोजगार केलं आहे याची कल्पना देखील तरुणांना राहिलेली नाही.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ला मोदींनी आखलेला पूर्वनियोजित कट; केवळ लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी
माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजीज कुरेशी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अजीज कुरेशी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट होता असा धक्कादायक आरोप केला आहे. अजीज कुरेशी यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अजीज कुरेशी उत्तराखंड आणि मिझोरामच्या राज्यपालपदी होते.
6 वर्षांपूर्वी -
इम्रान खान आणि मोदींचे फिक्सिंग : प्रकाश आंबेडकर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपसात फिक्सिंग आहे असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. इतकंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आयसिसचा काही संबंध आहे का? ते मोहन भागवतांनी सांगावं असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आरएसएस’वर कठोर शब्दात निशाणा साधला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, या भेटीमागे दुसरे कोणतेही अर्थ काढू नका भेट कारण सहजच घेतली भेट होती आणि त्यामागे कोणतंही राजकारण नव्हतं असंही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: संरक्षण करार, अनिल अंबानी रशियाच्या दौऱ्यात देखील मोदींसोबत होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रांसच्या कंपनीसोबत राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याची घोषणा केली. कालांतराने अनिल अंबानी आणि राफेल करारावरून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आले. सुरक्षाविषयक महागड्या सौद्यांमध्ये केवळ फ्रान्स नसून रशियासोबत देखील एस-४०० मिसाईल डिफेन्स यंत्रणेसाठी तब्बल ४०,००० कोटींचा करारवर ऑक्टोबर २०१८ मध्ये अधिकृतपणे स्वाक्षऱ्या झाल्या जेव्हा रशियाचे पंतप्रधान २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. मात्र तत्पूर्वी २४ डिसेंबर २०१५ मध्ये रशियाच्या दौऱ्यावर गेले होते आणि विशेष म्हणजे त्यात देखील अनिल अंबानी यांचा समावेश होता. त्यात भर म्हणजे रशियन प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी देखील अनिल अंबानींचा होते हे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि काही अंतरावर स्वतः नरेंद्र मोदी देखील उपस्थित विराजमान असल्याचे दिसत होते. तसेच काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांनी देखील राफेल सौंदयापूर्वी फ्रान्सचा दौरा केल्याच्या बातम्या फ्रान्समधील प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: हे काय? मोदींच्या हेलिकॉप्टरमधून बॉक्स उतरवून ते पटापट इनोव्हामध्ये लोड केले?
काँग्रेस पक्षाने एक व्हिडिओ सार्वजनिक करून मोदींना कोंडीत पकडून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्नाटकातील सभेसाठी मोदी एका हेलिपॅडवर उतरले आणि त्याच दरम्यान काही घडलेला घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाल्याने खळबळ माजली आहे. त्यानुसार मोदींच हेलिकॉप्टर जमिनीवर उतरताच काही क्षणात एक मोठा बॉक्स उतरविण्यात आला आणि तो काही जणांनी धावत पळत एका जवळच उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हामध्ये लोड करण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
मोदींकडून १० एप्रिल २०१५ ला राफेल कराराची घोषणा, मग ६ महिन्यांत अंबानींच्या कंपनीला करमाफी
फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल लढाऊ विमाने घेण्याचा सौदा भारत व फ्रान्स यांच्यात होत असतानाच दुसऱ्या बाजूला अनिल अंबानी यांच्या फ्रान्समध्ये व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीस तेथील सरकारने सुमारे १,२६० कोटी रुपयांचा (१४३ दशलक्ष युरो) कर माफ केल्याचे वृत्त ‘ल मॉन्द’ या अग्रगण्य फ्रेंच वृत्तपत्राने दिल्यानंतर भारतात आधीपासून सुरु असलेल्या राफेल वादास शनिवारी नवी उकळी फुटली.
6 वर्षांपूर्वी -
भाजप चक्रव्यूहात? पक्षाला देणगी देणार्या प्रत्येकाची नावे सांगा: सर्वोच्य न्यायालय
सुप्रीम कोर्टाने ‘निवडणूक रोखे’ प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशाने भारतीय जनता पक्षाला अक्षरश: घाम फुटला आहे. या रोख्यांद्वारे भारतीय जनता पक्षाने देणग्या मिळवून सर्वाधिक रक्कम पक्षाच्या तिजोरीत भरली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने देणगी देणार्या प्रत्येकाच्या नावाची यादी तयार करून ती यादी मुख्य निवडणूक आयोगाला सादर करण्यास सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
हवेची दिशा? प्रत्येक बातमीवर मोदींवर समाज माध्यमातून नकारात्मक हल्लाबोल
सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी देशभर सभांचा धडाका लावला आहे. त्यात सभांमधून येणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यातून देखील अनेक बातम्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. देशभर निरनिराळ्या सर्व्हेमध्ये जरी भाजपाला पोषक वातावरण दाखवण्यात आलं असलं तरी समाज माध्यमांवर उमटणाऱ्या प्रतिक्रियांमधून वेगळेच निष्कर्ष समोर येताना दिसत आहेत. त्यासाठी आम्ही हिंदी, इंग्रजी आणि मराठी वृत्तवाहिन्यांच्या तसेच वर्तमानपत्रांमधील समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या बातम्यांचा आणि त्यावर येणाऱ्या संपूर्ण प्रतिक्रियांचा आढावा आपण घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते म्हणाले 'आता बॉम्बस्फोट होत नाहीत'; मोदींना पुलवामात काय झालं ते अजून माहित नाही?
आता बाँबस्फोट होत नाहीत. कारण दहशतवाद्यांना माहीत आहे चौकीदार त्यांना कोठुनही शोधून काढील आणि शिक्षा करेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये केले. काँग्रेस – एनसीपीच्या काळात दहशतवाद वाढला होता. देशात दररोज कुठे ना कुठे बाँबस्फोट होत होते. त्यात सामान्य लोकांचे बळी पडत होते.
6 वर्षांपूर्वी -
मतदारांचा आरोप; आम्ही बटण हत्तीचं दाबलं पण चिठ्ठी कमळाचीच बाहेर आली
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच देशातील एकूण ९१ मतदारसंघात मतदान घेण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांसह दक्षिण आणि उत्तर भारतातही ठरल्याप्रमाणे मतदानप्रकिया पार पडली. परंतु, बहुतांश ठिकाणी ईव्हीएममध्ये मोठे घोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यूपीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला BSP मतदान केल्यास, ते मत भारतीय जनता पक्षाला मिळत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE