महत्वाच्या बातम्या
-
कोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या
देशात कोरोना रुग्ण संख्या काही अंशी कमी होताना दिसत आहे. तसेच, लसीकरण जोरदार सुरु आहे. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलं की कोरोनाची दुसरी लोट अजून गेली नाही. मात्र, कोरोनाशी सामना करण्यासाठी देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या. तसेच अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचे नवे कामगार कायदे | हातात येणारा पगार कमी होणार आणि PF'वर मोठा परिणाम
लवकरच काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार चार कामगार कायदे लागू करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार या कामगार कायद्यांवर शेवटच्या टप्य्यात असून तो लवकरात लवकर लागू करण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाती येणारा एकूण पगार पहिल्यापेक्षा कमी होणार आहे, तर पीएफ वाढणार आहे. कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडमध्ये जादा पैसे टाकावे लागणार आहेत. या नव्या नियमांमुळे बेसिक सॅलरी, भत्ते आणि पीएफचे गणित पूर्णपणे बदलणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | महागाईने लोकांचं जगणं महागलं | खाद्यतेलाची किंमत 11 वर्षात सर्वात जास्त
भारत देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने कित्येक लोक बेरोजगार झाले आहे. देशात पेट्रोल डिझेलसह इतर ही वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खाद्यतेलाच्या तेलाच्या किंमती 11 वर्षांत सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | CBSE परीक्षा रद्द | मोदींनी साधली मॅनेज मार्केटिंगची संधी? | चेहऱ्यावर हसूच हसू , एकाचे पालक म्हणाले...
मंगळवारी १ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे देशभरातील CBSE बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरात राज्य सरकारने देखील त्यांच्या राज्यातील बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या. पण आता परीक्षांशिवाय विद्यार्थ्यांच्या गुणांचं मूल्यमापन कसं करणार आणि त्यांना गुण कशाच्या आधारावर देणार? हा यक्षप्रश्न सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
१ कोटींपेक्षा जास्त लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड | चांगल्या नोकऱ्यांसाठी तरुणांना १ वर्ष वाट पाहावी लागणार
कोरोना महामारीमुळे देशावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेने देशाची परिस्थिती बिकट झाली, तर दुसऱ्या लाटेने एक कोटींपेक्षा जास्त लोकांना बेरोजगार केले. यात 97% पेक्षा जास्त कुटुंबांची कमाईदेखील कमी झाली. प्रायवेट थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) चे CEO महेश व्यास सांगतात की, मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील बेरोजगारी दर 12% पर्यंत येऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | अर्थव्यवस्थेला ४० वर्षांतील मोठा फटका | GDP ७.३ टक्क्यांनी घसरला
कोरोनाच्या महासाथीचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठा फटका बसला असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या GDP’मध्ये ७.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहिमध्ये मात्र जीडीपीमध्ये १.६ टक्क्यांची वाढ झाली.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र असो किंवा प. बंगाल | वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरून केंद्रीयं अडथळ्यांचे राजकारण सुरूच
वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य आणि पक्षीय राजकारण स्वतःच्या ताब्यात घेण्याचं मोदींच गुजरातमधील तंत्र देश पातळीवर देखील राबवलं गेल्याचे अनेक दाखले आहेत. अगदी उत्तर प्रदेशात देखील त्यांनी माजी प्रशासकीय अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री पदी बसवून तिथलं राजकारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतःकडे ठेवण्याची योजना आखल्याचं वृत्त आहे. तर महाराष्ट्रात देखील राज्यातील नेमके जे वरिष्ठ IPS अधिकारी केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर गेले त्यांनीच राज्य सरकारला अडचणीत आणल्याचं राजकारण देखील ताजे आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान असावेत का? | ५३ टक्के लोकं म्हणाले 'नाही' - सर्व्हे
मोदी सरकारच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला तुम्ही किती स्टार द्याल? या प्रश्नावर ३६.४२ टक्के लोकांनी १ स्टार दिला आहे. म्हणजेच ३६.४२ टक्के लोक मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. १४.९३ टक्के लोकांनी २ स्टार दिलेत, १०.७८ टक्के लोकांनी ३ स्टार दिलेत. १४.३७ टक्के लोकांनी ४ स्टार दिलेत. तर २३.५० टक्के लोकांनी ५ स्टार देत मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
आर्थिक अधोगती, जगात नाचक्की, द्वेष, महागाई आणि बेरोजगारी | मोदी सगळ्यात अपयशी व नापास नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रामध्ये सत्तेत दुसऱ्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांच्यापासून सर्वच नेत्यांनी यासंदर्भात ट्विट करून मोदींची स्तुती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
PM केअरचे वादग्रस्त वेंटिलेटर | मोदींना महागडा सूट देणारा याच कंपनीचा मालक | केंद्राकडून कोर्टात होतोय बचाव
देशभर वादग्रस्त ठरलेली “ती’ व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवलेली नाहीतच, असा धक्कादायक दावा केंद्र सरकारच्या वतीने औरंगाबाद खंडपीठापुढे सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत करण्यात आला. विशेष म्हणजे, या वादग्रस्त व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणाऱ्या आणि दुरुस्तीसाठी सहकार्य न करणाऱ्या राजकोट येथील ज्योती सीएनसी कंपनीची यात चूक नसून, ही “मॉडर्न’ व्हेंटिलेटर्स वापरण्याचे “प्रशिक्षण’ असलेले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी औरंगाबादमध्ये नसल्याचा युक्तिवाद करत केंद्र सरकारने कंपनीची पाठराखण केली.
4 वर्षांपूर्वी -
फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार? - शिवसेना
देशातील कोरोना मृतांचे खरे आकडे लपवले जात असल्याची बोंब जागतिक पातळीवर मारली जात आहे. ही बोंब मारण्यासाठी कुणीतरी ‘ट्विटर’चे माध्यम वापरले म्हणून मध्यरात्री दिल्लीच्या ‘ट्विटर’ मुख्यालयावरच पोलिसांनी धाडी घातल्या. आता या समाज माध्यमांवरही बंदी घालण्याचे विचार सुरू आहेत. आम्हाला वाटते, थोडे थांबायला हवे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर अशी घाईघाईने बंदी घातली तर मेहुल चोक्सीला पकडल्याचा व हिंदुस्थानात आणल्याचा आनंदसोहळा भक्तमंडळ कसे साजरा करणार? असा टोला शिवसेनेने आजच्या (२८ मे) सामना संपादकीयमधून लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
OTT प्लॅटफॉर्म, ऑनलाईन न्यूज पोर्टलला सरकारची 15 दिवसांची डेडलाईन | गाइडलाइन्सवर काय केले सांगावे
केंद्र सरकारने सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी माहिती व प्रसारण विभागाने डिजिटल माध्यमांसह ओटीटी प्लॅटफॉर्मला 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. त्याअंतर्गत अशा कंपन्यांना सांगावे लागेल की नव्या मार्गदर्शक सूचनांच्या बाबीत काय केले गेले.
4 वर्षांपूर्वी -
नद्या, जंगलं संकटात आहेत; निसर्गाचा आदर करा ही तर बुद्धांची शिकवण – नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बुद्ध पौर्णिमेच्या औचित्यावर वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये व्हर्चुअली संबोधन केले. यावेळी त्यांनी कोरोना महामारीवर भाष्य केले. ते म्हणाले की, ज्यांनी कोरोना महामारीत आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले, त्यांच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. कोरोनाने संपूर्ण जगाला बदलून टाकले. आशा कठीण परिस्थितीत भगवान बुद्धांच्या आदर्शांवर चालण्याची गरज आहे.
4 वर्षांपूर्वी -
पहा जे पत्रकार काँग्रेसविरोधात ट्विट करत आहेत त्यांना ब्लॉक केलं गेलं, हे धक्कादायक आहे - नरेंद्र मोदी
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 ला सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदी भक्ताने PM केअरला अडीच लाख दिले, त्यांच्या आईचा बेड न मिळाल्याने मृत्यू | आता संताप व्यक्त
गुजरातमध्ये विजय पारिख यांच्या आईला करोना झाला होता. मात्र बेड न मिळाल्याने त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांनी पीएम केअर फंडासाठी २ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती. दरम्यान, त्यांनी रोष व्यक्त करत ट्वीट करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केला आहे. पुढच्यावेळी किती दान द्यावे लागेल की, अशी परिस्थिती येणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
दुसरी लाट आणि लसीकरण | फायझर लस संदर्भातील मोदी सरकारची 'ती' गंभीर चूक भारताला भोवणार?
भारतात रुग्णसंख्या सातत्याने घटत असतानाही लसटंचाईमुळे कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत होत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांत लस नसल्यामुळे मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. केंद्र सरकारने १९ एप्रिलला राज्यांना थेट कंपन्यांकडून लस खरेदीची मुभा दिली, मात्र त्यातही एक महिना वाया गेला. यूपी, पंजाब, दिल्लीसह ९ राज्यांनी जगभरातील लस निर्मात्यांकडून २८.७ कोटी डोस खरेदीच्या जागतिक निविदा काढल्या, मात्र एकही कंपनी यंदा लस पुरवठा करण्याच्या स्थितीत नाही.
4 वर्षांपूर्वी -
छत्रपती संभाजीराजेंच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे - काँग्रेस
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी संभाजीराजेंना भेटले का नाही यावर देखील पाटील पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत ४,४५४ रुग्णांचा मृत्यू | वॉशिंग्टन विद्यापीठाचं संशोधन सत्य ठरण्याच्या दिशेने
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच बघायला मिळाला. एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा दुर्दैवी जागतिक विक्रमही भारताच्या नावावर नोंदवला गेला. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. तर करोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असं असलं तरी करोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे देशावरील चिंतेचं ढग अद्याप कायम आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातचे अकार्यक्षम मॉडेल देशापुढे उघड झालंय | भाजपशासित राज्यातच मोदी मॉडेलचा फज्जा उडाला
भारतातील भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्येच ‘मोदी मॉडेल’चा फज्जा उडाला असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय पॅनल प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे. “२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ज्या ‘गुजरात मॉडेल’ चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली, त्याच गुजरातमधे कोरोनाची दूसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल तिथल्या स्थानिक प्रसारमाध्यमांनीच वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाडे काढले आहे.
4 वर्षांपूर्वी -
प.बंगाल | तृणमूल सोडून भाजपात गेलेले नेते काही दिवसातच भाजपाला कंटाळले | ममतांना पत्र
प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आटोपून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं असलं, तरी राजकीय घडामोडींचा सपाट सुरूच आहे. तब्बल चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र लिहिलं आहे. “भारतीय जनता पक्षात प्रवेश करून चूक केली, दिदीशिवाय राहू शकत नाही,” असं म्हणत घरवापसी करून घेण्याची विनवणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News