महत्वाच्या बातम्या
-
नरेंद्र मोदींकडून हिटलरची कॉपी, राज ठाकरेंचा घणाघात
नरेंद्र मोदी हे एडॉल्फ हिटलरची कॉपी करत आहेत असा घणाघात राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केला. तसेच जर त्यांच्याविरोधात तोंड उघडलं की देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं ही हिटलरचीच मूळ संकल्पना आहे याची त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली. त्याचाच कित्ता सध्या नरेंद्र मोदी गिरवत आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच २०१४ देशाला दाखवलेली ‘अच्छे दिन’ ही मूळ संकल्पना अमेरिकेतील रूझवेल्ट यांच्या वडिलांची आहे ज्यांनी “Happy Days will come” असा नारा त्यावेळी दिला होता. आता नरेंद्र मोदींनी नेमकी त्यांचीच कॉपी केली आहे, असा आरोप राज ठाकरेंनी भर सभेत केला.
6 वर्षांपूर्वी -
नवरदेवाचं लग्नाच्या पत्रिकेतून मोदींना मतं देण्याचं आवाहन; निवडणूक आयोगाची कारवाई
सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना भाजप आणि मोदी सार्थक देखील निरनिराळे फंडे अंमलात आणत आहे. त्याचाच भाग म्हणजे एका मोदी समर्थकाने स्वतःच्या लग्न पत्रिकेवर नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं आणि लग्न गडबडीतच निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडला आहे. सदर इसम हा नगरचा असून फिरोज शेख असं त्याच नाव आहे. सुजय विखेंना मतदान करण्याचं त्याने लग्न पत्रिकेद्वारे आवाहन केलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या देशभर भाषणात भगवा आणि काश्मीरमध्ये जाहिरातीत हिरवा रंग
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशभर हिंदुत्वाचा अजेंड्यावर लोकसभा निवडणूक लढणाऱ्या भाजपचा दुतोंडीपणा समोर आला आहे. नरेंद्र मोदी देशभर भाषणांमध्ये हिंदुत्व आणि पाकिस्तानच्या नावाने बोंब मारत असले तरी जम्मू काश्मीरमध्ये भाजपने प्रचारासाठी आणि प्रमोशनसाठी हिरवा रंग वापरणं पसंत केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज मोदींची नांदेडमध्ये तर राज ठाकरेंची मुंबईत सभा
आज गुढीपाडव्याचा मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर तोफ धडाडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरता आघाडीला मदत करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभूत करण्यासाठी रणशिंग फुंकणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील नांदेडमध्ये सभा असून भाजप देखील कामाला लागली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: चौकीदार व मेहुल चोक्सी एकाठिकाणी एकत्र होते हे राजनाथ सिंह यांना माहित नसावे?
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी युपी’तील बुलंदशहर येथे भाषणामध्ये काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशात काँग्रेसचं सरकार असेपर्यंत नीरव मोदी, विजय माल्या, मेहुल चोक्सी देशातून पळाले नाहीत. परंतु, त्यांना जेव्हा माहीत पडलं काँग्रेस सत्तेतून गेलं आणि सतर्क चौकीदाराचं सरकार देशात आलं तेव्हा त्यांनी भारत सोडून विदेशात पलायन केलं असा आरोप सिंह यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या घरात करोडो रुपये, आयकर विभाग कारवाई करेल काय?
लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने आता प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यातच तामिळनाडूमधील द्रविड मुनेत्रा काझगम अर्थात (डीएमके) पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी भारताच्या आयकर विभागाला थेट आव्हान देत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. जर आयकर विभागाने नरेंद्र मोदी यांच्या घरी छापे टाकावेत, असे एमके स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराला ‘मोदींची सेना’ म्हणणारेच देशद्रोही: माजी लष्करप्रमुख व भाजप नेते व्ही.के.सिंग
भारतीय लष्कर ही ‘मोदी यांची सेना’ आहे, असे धक्कादायक वक्तव्य करणारे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माजी लष्करप्रमुख आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेले जनरल व्ही.के.सिंग यांनी चांगलीच चपराक दिली आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून, अशाप्रकारे भारतीय सैन्याचा अपमान करणारेच देशद्रोही असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाच्या विचारधारेशी असहमत असणारे लोक देशविरोधी नाहीत: आडवाणी
आमच्या विचारांशी असहमत असलेले कोणीही असोत पण ते देशविरोधी नाहीत असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी म्हटले आहे. जे आमच्या म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी सहमत नसलेले लोक देशविरोधी नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. त्याद्वारे त्यांनी स्वतःची सविस्तर भूमिका मांडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशद्रोह म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळतं का? न्यायाधीशांचा दिल्ली पोलिसांना प्रश्न
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असं दंडाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे संबंधित व्हिडीओ छेडछाड करण्यात आलेली होती, असंदेखील या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सदर अहवाल दिल्ली सरकारला आज सादर केला जाऊ शकतो. एकूण २५ पानांच्या या अहवालात जेएनयूमध्ये घडलेल्या संपूर्ण घटनांचा क्रम देण्यात आलेला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दंडाधिकाऱ्यांचा अहवाल; जेएनयू'त 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असं दंडाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे संबंधित व्हिडीओ छेडछाड करण्यात आलेली होती, असंदेखील या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सदर अहवाल दिल्ली सरकारला आज सादर केला जाऊ शकतो. एकूण २५ पानांच्या या अहवालात जेएनयूमध्ये घडलेल्या संपूर्ण घटनांचा क्रम देण्यात आलेला आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: गोंदियात मोदींच्या सभेसाठी प्रति १००-१५० रुपये देऊन गर्दी जमवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल गोंदियात जाहीर सभा पार पडली. याआधी मेरठ आणि वर्धा येथील सभेत गर्दी न झाल्याने भारतीय जनता पक्ष आणि मोदींची मोठी नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र गोंदियात भारतीय जनता पक्षाने विशेष काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले, परंतु त्यातही ते पकडले गेले असंच म्हणावं लागेल. कारण लोकं मोदींना ऐकण्यासाठी स्वतःहून आले नाही तर ही गर्दी पैसे देऊन जमा करण्यात आल्याचे प्रसार माध्यमांच्या पाहणीतून रेकॉर्डवर आलं आहे. त्यामध्ये १०० रुपयांपासून ते प्रति गाडी ५०० रुपयांपर्यंत असं पैसे वाटप करून सभेसाठी लोकांनी आणण्यात आल्याचं स्वतः लोकांनीच कॅमेऱ्यावर मान्य केले.
6 वर्षांपूर्वी -
सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही; माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास संतापले
माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास यांनी युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना चांगलेच झाडाले आहे. देशाचं सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे रामदास यांनी ध्यानात आणून दिले आहे. आदित्यनाथ यांनी एका सभेदरम्यान सैन्याचा उल्लेख “मोदीजी की सेना” असा उल्लेख करत सैन्याच्या राजकीय वापर करणाचा प्रयत्न केला होता. त्यावर संतापलेल्या माजी नौदल प्रमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बिहारमधील मोदींच्या सभेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांचा राडा, एकमेकांना खुर्चा फेकून मारल्या
काल बिहारमधील गया येथे नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. परंतु, मोदींच्या भाषणादरम्यानच उपस्थित भाजप कार्यकर्त्यांचे दोन गट आपसात भिडले आणि मोठी धांदल उडाली होती. भाजप कार्यकर्ते वरिष्ठ नेत्याचं ऐकण्याच्या देखील मनस्थितीत दिसत नव्हते. नेत्यांनी आवाहन करून देखील हाणामारी सुरूच होती.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणातून महागाई, बेरोजगारी व दुष्काळ गायब
लोकसभेच्या आखाड्यात सध्या सर्वच पक्षांकडून प्रचारसभा आणि भाषणं सुरु झाली आहेत. परंतु २०१४ मध्ये विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे सध्या सामान्य माणसाच्या दैनंदिन विषयांना बगल देत भगवं वादळ, मंदिर आणि पाकिस्तान अशा विषयावर भाषणं ठोकताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या राफेल जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राफेल लढाऊ विमानांच्या कराराचा मुद्दा आक्रमकपणे वापरला जात असताना याबाबत काँग्रेसने जाहिरातीत राफेलच्या प्रतिकृतीच्या वापर केल्याने निवडणूक आयोगाने त्याबाबत आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या ९ पैकी ६ जाहिरातींवर आयोगाने आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये राफेलबाबत असलेल्या जाहिरातीचाही समावेश करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
संबित पात्रांनी व्हिडिओ शेअर केला आणि सरकारच्या उज्वला योजनेची पोलखोल झाली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना पक्षाने ओरिसातील पुरी येथून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं आहे. त्यानंतर ते इथे हजर झाले असून जोरदार प्रचाराला लागले आहेत. परंतु, समाज माध्यमांवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे एकूणच भाजप आणि स्वतः नरेंद्र मोदी तोंडघशी पडल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
टॅक्सचोरीसाठी इतर राज्यांमध्ये नोंदणीकृत केलेल्या गाड्या मुंबईत 'मै भी चौकीदार' अभियानासाठी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैं भी चौकीदार ही मोहिम सुरू केली. त्यानंतर देशभर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र उभे केले गेले. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला समर्थन देण्यासाठी १० वॉलेंटियर्सच्या वतीने कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामासारखं काहीतरी होणार हे नक्की होतं आणि तसंच झालं: रॉ गुप्तचर यंत्रणेचे माजी अधिकारी
जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेला दहशदवादी हल्ला म्हणजे लोकसभा निवणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाला मिळालेली एक भेट आहे, असं वक्तव्य रॉ या गुप्तचर यंत्रणेच्या रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंगचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी शनिवारी केलं. तसेच पाकिस्तानात असणाऱ्या आतंकवादी तळांवर हल्ला करणं हे अगदी योग्य असल्याचंही मत देखील त्यांनी मांडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ला हा निवडणुकांपूर्वी जैशकडून मोदींना व भाजपला मिळालेली एक भेट: रॉ R&A चे माजी प्रमुख
जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेला दहशदवादी हल्ला म्हणजे लोकसभा निवणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाला मिळालेली एक भेट आहे, असं वक्तव्य रॉ या गुप्तचर यंत्रणेच्या रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंगचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी शनिवारी केलं. तसेच पाकिस्तानात असणाऱ्या आतंकवादी तळांवर हल्ला करणं हे अगदी योग्य असल्याचंही मत देखील त्यांनी मांडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
BSF जवान उतरणार नरेंद्र मोदीं विरोधात रिंगणात?
सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजे बीएफएस जवानांना मिळणाऱ्या हलक्या दर्जाच्या अन्नाचा भांडाफोड करणारे जवान तेज बहादूर यादव हे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. विशेष म्हणजे तेज बहादूर यादव हे इतर कोणाविरुद्ध नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेज बहादूर यादव हे मोदींना वाराणसी मतदारसंघात आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मोदींविरोधात अपक्ष लढून सैन्यदलात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा मानस तेज बहादूर यादव यांचा आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY