महत्वाच्या बातम्या
-
जुमलेबाज मोदी हटाओ, योगी लाओ : लखनौमध्ये पोस्टर
५ राज्यांमध्ये दारुण पराभव झाल्याने सध्या नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाला विरोध होण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर लखनौमध्ये युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा अशी पोस्टरबाजी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या एका हिंदुत्ववादी संघटनेने युपीच्या राजधानीत हे पोस्टर लावल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशात मायावतींचं काँग्रेसला समर्थन
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची अंतिम आकडेवारी जाहीर झाली असून मतदारांनी काँग्रेस आणि भाजप अशा कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत दिलेलं नाही. एकूण २३० जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला ११४ जागांवर विजय मिळाला असला तरी बहुमताचा एकदा ११६ आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाला १०९ जागांवर विजय प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे सपा १, बसपा २ आणि अपक्ष उमेदवारांचा एकूण ४ जागांवर विजय झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शक्तिकांत दास यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी निवड
आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली आहे. शक्तिकांत दास हे माजी केंद्रीय अर्थ सचिव आहेत. सध्या ते अर्थ आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कालच उर्जित पटेल यांनी तडकाफडकी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्याने अर्थव्यवस्थेत खळबळ माजली होती.
6 वर्षांपूर्वी -
नेटकऱ्यांचे प्रश्न: 'मतदारांनी खरे धाडस दाखवले', पण तुम्ही सत्तेला लाथ मारण्याचं धाडस कधी दाखवणार?
४ राज्यांमधील मतदारांनी आगामी निवडणुकीत पर्याय कोण? याचा जराही विचार न करता जे नकोत त्यांना थेट नाकारले आहे. आणि त्यांना उखडून फेकले आहे. त्यामुळे असे धाडस दाखवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चाणक्यांनी छत्तीसगड'मधील पराभवाची जवाबदारी रमणसिंग यांच्यावर ढकलली
आजच्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये भाजपचा धुव्वा उडाला आहे. आजचा निकाल मान्य करताना माजी मुख्यमंत्री रमणसिंग यांनी काँग्रेसला सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु विजय झाल्यावर आतुरतेने पत्रकार परिषदा घेणारे अमित शहा यांनी सर्व जवाबदारी रमणसिंग यांच्यावर ढकलण्याचे बोलले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांची संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आजच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपाला सर्व राज्यांमध्ये अपयश आल्याचे चित्र आहे. प्रसिद्ध होत असलेल्या निकालांनंतर भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नेटकरी अभियान; म्हणतात ‘पप्पू पास पण मोदी नापास’; पाहा ट्रोल्स मालिका
५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या मतदाराने मोदी, अमित शहा आणि एकूणच भाजपाला स्पष्ट नाकारल्याचं चित्र आहे. परंतु. एरवी प्रसार माध्यमांवर संधी मिळताच विरोधकांवर शेलक्या भाषेत टीका करण्यासाठी तयार असणाऱ्या भाजप नेत्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले आहेत. सर्व भाजप कार्यालयात शुशुकाट पसरलेला दिसतो आहे. त्यात ज्या राहुल गांधींना पप्पू म्हणून चिडवण्याची एकही संधी वाया न घालवणारे भाजप नेते सध्या राहुल गांधींच्या यशानंतर आणि मोदींच्या अपयशानंतर चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ते म्हटले होते मोदी पंतप्रधान व्हावे 'ते' झाले, काल म्हणाले मोदींची उलटी गिनती सुरु होणार 'ती' झाली?
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
हिंदी भाषिक राज्यांनी मंदिरांचं धार्मिक राजकारण झिडकारलं, शिवसेना बोध घेईल? सविस्तर
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
छत्तीसगड'मध्ये काँग्रेसची सत्तेच्या दिशेने जोरदार मुसंडी
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतली असून भाजप सत्तास्थापनेपासून फार दूर असल्याचे समजते. सुरवातीच्या हाती आलेल्या कल प्रमाणे भाजप २८ तर काँग्रेसने ५८ जागांवर मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
6 वर्षांपूर्वी -
'आबरा का डाबरा' जादू संपली, २०१९ला मोदी सभा घेतील तिथे भाजपचा पराभव निश्चित? सविस्तर
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आला होता, जेव्हा स्थानिक भाजप नेत्यांनी मोदींना सभेला आणू नका अशी विनंती केली होती. सध्या देशातील या ५ प्रमुख राज्यांमधील जनतेने मोदी आणि अमित शहांना अक्षरशः नाकारलं आहे. त्यामुळे काही दिवसात भाजपमध्ये मोदी-शहा हटाव मोहीम सुरु झाल्यास आश्चर्य वाटायला नको असं राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे.
6 वर्षांपूर्वी -
५ राज्यांमध्ये पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर
५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता येईल असा अंदाज होता. दरम्यान, राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीत अलटुनपालटुन सरकार स्थापन होतात तोच ट्रेंड या निवडणुकीत कायम राहील असं चित्र आहे.
6 वर्षांपूर्वी -
RBI गव्हर्नर उर्जित पटेलांचा राजीनामा हीच मोदी सरकारची उलटी गिनती सुरु : राज ठाकरे
सध्या केंद्रातील मोदी सरकारची उलटी गिनती सुरु झाली आहे. RBI गव्हर्नर उर्जित पटेलांचा राजीनामा यांचा राजीनामाहाच संदेश देऊन जातो अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांचा तडकाफडकी राजीनामा, केंद्राच्या दबावामुळे?
आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी अखेर आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मात्र राजीनामा देताना, मी वैयक्तिक कारणांमुळे माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून मोदी सरकार आणि आरबीआय दरम्यान एक छुपं युद्ध सुरु आहे. त्याला या वादाचीच पार्श्वभूमी आहे का? अशी शंका व्यक्त करण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
एक्जिट पोल मोदी सरकारच्या विरोधात गेल्याने शेअर बाजार कोसळला
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्जिट पोल भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच मोदी सरकारच्या विरोधात गेल्यामुळे आज शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मुंबय शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी बाजार उघडताच ४७८.५९ अंकाची मोठी घसरुन होऊन तो ३५,२०४.६६ वर सुरु झाला होता. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये सुद्धा तब्बल १८५ अंकाची घसरगुंडी झाल्याचे पहायला मिळाले. सकाळी बाजार उघडताच निफ्टीची १०,५०८.७० अंकावर सुरुवात झाली.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रानं आरबीआयच्या कामात हस्तक्षेप करू नये: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
RBI आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयादरम्यान मागील अनेक दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. या संपूर्ण प्रकारानंतर IMF’चे मुख्य अर्थशास्त्री मॅरिस ओब्स्टफील्ड सदर प्रकरणावर जाहीर भाष्य केलं आहे. सर्मप्रथम RBI ने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर भारतातील केंद्र सरकारनं दयायला हवी. तसेच संबंधित सरकारने केवळ राजकीय फायद्यासाठी कोणत्याही केंद्रीय बँकेच्या कारभारात हस्तक्षेप केलेलं आम्ही खपवून घेणार नाही, असं मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी अधिकुतपणे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारला चांगलीच चपराक बसली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणात तुम्हीच जिंकणार ना 'राव', मोदी-शहा-योगींना तेलुगू जनता लांबच ठेवणार?
तेलंगणात विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा टीआरच्या हाती सत्ता जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तेलगू जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना स्पष्ट नाकारल्याचे चित्र समोर येऊ शकते. त्यामुळे दक्षिणेच्या राजकारणातील भाजपच्या प्रवेशाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप एमपी'त बाहेर, राजस्थानात सुपडा साफ तर तेलंगणात क्लीन बोल्ड होणार?
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगण या ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. आता उत्सुकता आहे ती, ११ तारखेच्या निकालांची. आता विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल अंदाज येण्यास एकामागे एक सुरुवात झाली आहे. त्यानुसार मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांची सत्ता भारतीय जनता पक्षाला गमवावी लागेल असं चित्र आहे. तसे झाल्यास भारतीय जनता पक्षासाठी आणि मुख्यत्वे मोदी आणि अमित शहांना तो मोठा धक्का असेल असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणात तब्बल १२० कोटी जप्त; मतदानाच्या आधी आला बेहिशेबी पैसा?
तेलंगणात मतदानाला काही तास उरले असताना काल सकाळी तेलंगणात पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ३ कोटी रुपये जप्त केले. सदर प्रकरणी एकूण ८ जणांना पोलिसांनी विभागाने ताब्यात घेतलं आहे. असं असलं तरी प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम कर्नाटकातून आली असल्याचे पोलिसांनी मत व्यक्त केले आहे. पण पकडण्यात आलेली रक्कम कोणत्या पक्षाशी संबंधित आहे का? यावर काही माहिती समजू शकलेली नाही.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY