महत्वाच्या बातम्या
-
तेलंगणा,राजस्थानमध्ये आज मतदान; अनेक बुथवर EVM मध्ये बिघाड
आज राजस्थान आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पहिले जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे लागून राहिले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाड होण्याच्या घटना समोर येत आहेत असे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
अहंकार चाळवला? कांद्याचे पैसे मनीऑर्डर करणाऱ्या शेतकऱ्याच्या चौकशीचे आदेश
या सिजनमध्ये कांद्याला अवघा एक-दीड रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय काल नाशिक मध्ये आला होता. २०१४ मध्ये “बहुत हुआ किसान पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींची या शेतकऱ्याने चांगलीच कोंडी केली होती. एकूण सात क्विंटल ५० किलो कांदा विकून मिळालेले १,०६४ रुपये संजय साठे या शेतकऱ्याने थेट मोदींना मनिऑर्डर करून पाठवले आणि ‘ठेवा तुम्हालाच’ असा थेट संदेश पंतप्रधांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सीबीआय संचालकांना तडकाफडकी का हटवलं?; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह
सीबीआय सारख्या महत्वाच्या विभागात झाल्याचे हालचालींमुळे देशभर मोदी सरकारवर टीका करण्यात आली होती. दरम्यान, हा वाद इतका विकोपाला गेला होता की विरोधकांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, सध्या हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेला असून तिथे सुद्धा मोदींवर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी! प्रचार संपला, आता तुमचा पार्टटाईम जॉब असलेल्या पीएम पदाकडे जरा लक्ष द्या
सर्वाधिक वेळ परदेश दौऱ्यात आणि देशभरातील निरनिराळ्या निवडणूक प्रचारात अधिक वेळ खर्ची घालणाऱ्या नरेंद्र मोदींवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली आहे. पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार आता पूर्णतः संपला आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचा पार्ट टईम जॉब असलेल्या पंतप्रधानपदाकडे जरा लक्ष द्या आणि कमीत कमी एकतरी पत्रकार परिषद घ्या, असा उपरोधीक टोला राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लष्कराच्या शौर्याचं स्वतःसाठी मार्केटिंग, पण त्याच जवानांची अधिक वेतनाची मागणी फेटाळली
भारतीय लष्कराच्या ज्युनियर कमीशंड अधिकाऱ्यांबरोबर सशस्त्र दलांतील जवळपास १.१२ लाख लष्करी जवानांची जास्त पगाराची मागणी नरेंद्र मोदी सरकारनं स्पष्ट पणे फेटाळून लावली आहे. सैन्य सेवा एकूण वेतनात अधिक वाढ करून द्यावी अशी मागणी सुरक्षा दलांकडून करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही प्रलंबित मागणी केंद्र सरकारनं जास्त वेळ न घेता फेटाळून लावली आहे. त्यामुळे भारतीय सैन्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या त्या वक्तव्याने त्यांनी सरदार पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं?
स्वातंत्र्याच्या काळात भारतातील नेत्यांकडे शहाणपण नसल्यामुळे पंजाबमधील तीर्थस्थळ कर्तारपूर हे पाकिस्तानात गेले, असे सांगत पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. तसेच नरेंद्र मोदी स्वतःला सर्वेश्रेष्ठ नेता सिद्ध करण्यासाठी गांधी, पटेल आणि इतर नेत्यांना खालच्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षांनी मोदींवर निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ! मोदीना विकास नाही 'विनाश पुरुष' म्हटल्याने उमा भारतींचा लोकसभेत पत्ता कट?
आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही असे उमा भारती यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. तसेच यापुढे मी संपूर्ण लक्ष अयोध्येतील राम मंदिर आणि गंगा नदीवर केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केले आहे. उमा भारतींनी हा मोठा निर्णय घेतला असला तरी मूळ कारण वेगळंच असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीत मोर्चेकरी शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, पण देसींगर्लच्या रिसेप्शनला मोदींची हजेरी
प्रसिद्ध बॉलिवूडची अभिनेत्री आणि ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनास २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्याआधी ते शनिवारी, १ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. त्यानंतर पुन्हा रविवारी २ डिसेंबरला पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला होता. दरम्यान काल मंगळवारी दिल्लीतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये प्रियांका-निकचं ग्रँड रिसेप्शन पार पडलं.
6 वर्षांपूर्वी -
कर्ज फेडतो, पण व्याज नाही देणार, कर्जबुडव्या माल्याचा बँकाकडे प्रस्ताव
सरकारी बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये आश्रयासाठी फरार झालेल्या विजय माल्याने बँकांना कर्जाची परतफेड करण्याची दर्शवली आहे. परंतु त्याने घातलेली अट बँका मान्य करणार का प्रश्न आहे. त्याने ठेवलेली अटी नुसार मी केवळ मुद्दल परत करू शकतो परंतु त्यावरील व्याज परत करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
6 वर्षांपूर्वी -
धक्कादायक: २०१६ची मर्यादा उलटूनही अनिल अंबानींनी नौदलाला ५ ‘ओपीव्ही’ जहाजे दिलीच नाहीत
आधीच राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेवरून देशात आणि विदेशात वादळ उठलं असताना आता अनिल अंबानी पुन्हा भारतीय नौदलाच्या एका कंत्राटामुळे चर्चेत आले आहेत. भारतीय नौदलासाठी सागरी गस्ती जहाजे अर्थात ‘आॅफशोअर पॅट्रोल व्हेसल-ओपीव्ही’ बांधण्याचे मोठं कंत्राट मिळालेल्या अनिल अंबानी ग्रुपच्या रिलायन्स नेव्हल अॅण्ड इंजिनीअरिंग म्हणजे आरनेव्हल या कंपनीने अजून एक सुद्धा जहाज भारतीय नौदलाला ठरलेल्या वेळेत बांधून न दिल्याने अखेर भारतीय नौदलाने आरनेव्हल कंपनीने एकूण कंत्राटाच्या १० टक्के म्हणजे २,५०० कोटी रुपयांच्या बँक गॅरन्टी वटवून घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
PHOTO: मोदींना अक्कल दाढ आली नव्हती तेव्हा पंडित नेहरुंनी इस्त्रोची स्थापना केली
काँग्रेसने थेट विकासाचं प्रदर्शन भरवत मोदींना चांगलीच चपराक दिली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी यांनी ‘सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताह’ आयोजित केला असून त्यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात हे छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींना नेहरुंच्या जॅकेटवर गुलाब दिसला, पण आपल्या जॅकेटवरील नेहमीचं कमळ विसरले?
सध्या राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील प्रचारात आज काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिलं. याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींनी हिंदुत्त्वाबद्दल काय माहित आहे असा प्रश्न उपस्थित केला होता. त्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील कृषी क्षेत्राची बिकट अवस्था असण्याला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु जबाबदार असल्याची बोचरी टीका केली.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसने देशाला चार गांधी दिले, तर भाजपने तीन मोदी दिले
पंजाब राज्य सरकारमधील विद्यमान मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी जयपूर येथील प्रचार सभेत भाजपावर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. भाषणादरम्यान नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारतातून परदेशात पलायन करणारे कर्जबुडवे उद्योगपती नीरव मोदी, ललित मोदी आणि स्वतः नरेन्द्र मोदी यांच्यावरून भारतीय जनता पार्टीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी राजवटीत बँका आजारी! सरकारी आर्थिक औषधाची गरज: मुडीजचा अहवाल
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग क्षेत्राचे भांडवलीकरण हे सध्या खूपच कमकुवत झाले असून केंद्र सरकारने आर्थिक मदत केल्यासच त्यांना दिलासा मिळू शकेल. या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केंद्र सरकारच्या आर्थिक औषधाची अत्यंत गरज असल्याचा अहवाल मुडीजने या आंतरराष्ट्रीय संस्थेने आज सार्वजनिक केला आहे. त्यामुळे आर्थिक उत्कर्षाचे गोडवे गाणारे मोदी सरकार तोंडघशी पडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आम्ही सांगतो त्या दिवशी व त्या ठकाणी लग्न सोहळे करायचे नाहीत: योगी सरकार
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता प्रयागराज येथील विवाह सोहळ्यांवरच अधिकृत बंदी आणली आहे. २०१९ मधील जानेवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात येणार नाही असे स्पष्ट सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीत जर स्थानिक लोकांनी विवाह मुहूर्त काढला असेल तर तो बदलावा असे थेट आदेश आहेत. कारण, याच कालावधीत कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते. त्यासाठी योगी सरकारने तडकाफडकी आदेश जारी केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांकडून करप्टमोदी.कॉम वेबसाइट लाँच, सर्व भ्रष्टाचारांची माहिती
सध्या विरोधकांनी सुद्धा भाजपाला डिजिटल जगाचा चांगलाच इंगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेत आणि भाजप प्रणित विविध राज्यांच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाने केलेले घोटाळे लोकांसमोर पोहोचविण्यासाठी विरोधकांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी थेट करप्टमोदी.कॉम म्हणजे CorruptModi.com नावाने वेबसाइट लाँच करून भाजपचे सर्व घोटाळे सार्वजनिक केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जी-२० परिषद: काळ्या पैशांविरोधात सर्वांनी एकत्र यावे: मोदींचे आवाहन
अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र आले पाहिजे, असे मत भारताच्या पंतप्रधानांनी जी२० परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना दिले. शुक्रवारपासून ब्यूनस आयर्स येथे सुरु झालेल्या जी-२० सदस्य देशांच्या शिखर परिषदेत मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची विशेष भेट घेतली.
6 वर्षांपूर्वी -
गुजरात: ब्राह्मण समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार?
महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून वातावरण क्षमते ना क्षमते तोच गुजरात भाजपाची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मागील अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये पाटीदार समाजाची आंदोलनं सुरु आहेत. त्यात आता गुजरातमधील ब्राह्मण आणि राजपूत समाजाने सुद्धा आरक्षणाची मागणी केल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज शेतकऱ्यांच्या भव्य महामोर्चाची धडक थेट संसदेवर
देशभरातला बळीराजा संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट भाव, शेतकरी पेंशन, दुष्काळ, विमा, जमिनीचे हक्क अशा अनेक प्रश्नांसंदर्भात मोदी सरकारला जाग आणण्यासाठी राजधानी दिल्लीत २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी भव्य किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज दिल्लीच्या रामलीला मैदानात देशभरातील बळीराजा दाखल होणार असून उद्या हा मोर्चा थेट संसदेवर धडकणार आहे, त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानचे ‘सार्क’ परिषदेचे निमंत्रण भारताने फेटाळले
भारत आणि पाकिस्तानमध्ये डेरा बाबा नानक-करतारपूर साहिब कॉरिडॉरवरुन सुरू असलेल्या वादादरम्यान पाकिस्तानला आणखी एक दणका मिळाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, मोदी सरकारने पाकिस्तान सरकारचे हे निमंत्रण नाकारले असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL