महत्वाच्या बातम्या
-
अलोक वर्मांकडे राफेल, अर्थ आणि कोळसा खात्या सकट ७ महत्वाच्या फाईल्स होत्या?
सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या सीबीआय संचालकांकडे राफेल, अर्थ आणि कोळसा खात्या सकट ७ महत्वाच्या फाईल्स होत्या अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सात महत्वाच्या फाईल्स अगदी शेवटच्या टप्यात असताना अलोक वर्मांकडून त्यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधकांना या प्रकरणात वेगळाच संशय येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: CBI चे संचालक अलोक वर्मांच्या घराबाहेर पाळत करणारे ४ जण ताब्यात
CBI चे संचालक अलोक वर्मा यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठविलेले असताना काल रात्रीपासून ४ अज्ञात संशयित त्यांच्या घराभोवती वारंवार फिरताना दिसले. वर्मांच्या घरी जनपथवर, दोन गाडीत बसलेल्या चौघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले, गाडीतून खेचून बाहेर काढले आणि दिल्ली पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, ते ४ संशयित आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे कनिष्ठ अधिकारी होते असं समोर आलं आहे. या चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं वर्मा यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचे गंभीर आरोप, आमचं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना वाचवतंय
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी भाजप सरकारवर सीबीआयमधील घटनांवरून गंभीर आरोप केले आहेत. माझं भाजप सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत असून, CBI नंतर पुढची कारवाई ईडी’च्या अधिकाऱ्यांवर होईल, असं भाजप खासदार स्वामी यांनी मत व्यक्त केल्याने भाजप तोंडघशी पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी सीबीआय व रॉ प्रमुखांना स्वतःच्या निवासस्थानी का पाचारण केलं: काँग्रेसला शंका
सीबीआय या देशातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेतील सध्याच्या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जवाबदार आहेत आणि काही दिवसांपासूनची सीबीआय मधील घडामोडी या संशयास्पद आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. दरम्यान, मोदींनी CBI आणि RAW च्या प्रमुखांना आपल्या निवासस्थानी का बोलावले होते? संबंधित चौकशीवर प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न नव्हता का? मोदींनी त्यांना नेमक्या काय सूचना केल्या? असंवैधानिक पद्धतीने तपासात दखल देण्याचा हा प्रकार नव्हे का, असे एक ना अनेक प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भर पत्रकार परिषदेत केली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सीबीआय संचालक मोदी सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात
सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात CBI चे संचालक आलोक वर्मा यांनी मोदी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने केंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. याचिकेत त्यांनी केंद्र सरकारने आपल्याला पदावरून दूर करताना सर्व नियम आणि कायद्यांना पायदळी तुडवल्याचे म्हटले असून थेट मोदी सरकारला न्यायालयात आवाहन दिले आहे. दरम्यान, त्यांची याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल'डील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी पूर्ण होऊ नये, म्हणून CBI मध्ये हालचाली? प्रशांत भूषण
राफेल लढाऊ विमानांच्या डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी CBI कडे यापूर्वीच करण्यात आली होती. दरम्यान, नेमकी तीच चौकशी पूर्ण होऊ नये, म्हणूनच CBI मध्ये सध्या जोरदार हालचाली घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोप ज्येष्ठ विधी तज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी केला आहे. तसेच महत्वाचं म्हणजे CBI संचालक आलोक वर्मा यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची कारवाई म्हणजे याच हालचालींचा मुख्य भाग असल्याचा दावा सुद्धा प्रशांत भूषण यांनी केंद्र सरकारवर केला आहे. दरम्यान, वादग्रस्त अधिकारी राकेश अस्थाना यांना वाचवण्यासाठी मोदी सरकारचा सर्व खटाटोप सुरू आहे, असं थेट विधान सुद्धा त्यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'आयुष्मान'कार्ड परत देत... मोदींकडेच उपचाराला जा! डॉक्टरचा सल्ला
मोदींच्या महत्काकांक्षी योजनेचा देशभरात पूर्ण फज्जा उडण्यास सुरुवात झाली आहे. कारण लखनऊ मधील किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या डॉक्टरनी केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेतून संबंधित रुग्नांवर उपचार करण्यास स्पष्ट नकार देत त्यांना कार्ड परत हातात देऊन मोदींकडेच उपचाराला जा, असा थेट सल्ला दिल्याचा आरोप संबंधीत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसे अधिकृत वृत्त एएनआय’ने दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी
सीबीआयकडून मुख्यालयाची इमारत सील करण्यात आले असून कोणीही अधिकारी किंवा बाहेरील परिचित व अपरिचित व्यक्तीला आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केंद्रीय गुन्हाअन्वेषण विभागात सध्या वरिष्ठ पदस्थांमध्ये तीव्र संघर्ष उफाळून आला आहे. दरम्यान, रात्री मुख्यालयात छापा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, मुख्यालयाची आणि विशेष करून संबंधित २ मजले पूर्णपणे सील करण्यात आले असून कोणत्याही अधिकारी किंवा बाहेरील व्यक्तीला आत जाण्याची परवानगी नाही.
6 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये भाजपचा धुव्वा उडण्याच्या भीतीने १०० आमदारांचा पत्ता कट होणार
पुढील महिन्यात राजस्थानसह एकूण ५ राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या ३ राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. परंतु निवडणूक पूर्व सर्वे निसार या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा पराभव होणार असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे मोदी सरकारने सुद्धा धास्ती घेतली असून स्वतः आरएसएस सुद्धा वेगळे सर्वेक्षण करून घेत आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांनी घेतलं शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन
पंतप्रधान मोदींनी अहमदनगरच्या विमानतळावर काही वेळापूर्वी आगमन झालं. काही वेळेपूर्वीच ते साई समाधी शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले आणि पूजन सुद्धा करण्यात आलं. याशिवाय आज त्यांच्या भेटीदरम्यान विविध कामांचं भूमीपूजनदेखील करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात येणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांच्या भेटीसाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना अटक
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. केरळमधील शबरीमाला मंदिर प्रकरणी आणि महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना सुद्धा महिलांना प्रवेश दिला जात नाही. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीला निघाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साईबाबा समाधी शताब्दी उत्सवासाठी नगरजिल्ह्यात म्हणजे शिर्डीला येणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
संघ दक्ष! भाजप मध्य प्रदेशात तब्बल ७८ आमदारांना तिकीट नाकारणार? संघाचा सल्ला
मध्य प्रदेशातील भाजप विद्यमान ७८ आमदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता आहे. आरएसएस’ने केलेल्या एका सर्वेक्षणात त्या ७८ आमदारांवर मतदार प्रचंड नाराज असल्याचं समोर आल्याने आधीच धोका स्वीकार करा आणि त्यांना पुन्हा तिकीट देऊ नका, अशी सूचना आरएसएस’ने भाजपला केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश भाजपमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक केवळ दीड महिन्यावर आल्याने आणि त्यात संघाच्या या सल्ल्यामुळे भाजप अजूनच अडचणीत आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशात भुकेमुळे प्रतिदिन ८२१ बालकांचा मृत्यू होतो, तर मोदी शासनात ७.८ लाख क्विंटल धान्य सडून वाया
सदर माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे आणि त्यामुळे देशातील प्रगतीचे गोडवे गाणाऱ्या भाजप सरकारचा चेहरा समोर आला आहे. उपलब्ध आकडेवारी नुसार देशभरात किमान २० कोटी गरिबांना अन्नावाचून पूर्णपणे उपाशी राहावे लागते किंवा अर्धपोटी भोजनावर दिनक्रम काढावा लागतो. देशात दरडोई सरासरी ५०० ग्रॅम अन्नाची गरज आहे. दरम्यान, पोटभर अन्न न मिळाल्यामुळे देशभरात प्रतिदिन ८२१ बालकांचा मृत्यू होतो.
6 वर्षांपूर्वी -
राज्यावर दुष्काळाचं सावट तर मोदींच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी २ कोटी खर्च
सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे आणि राज्याच्या तिजोरीत सुद्धा खडखडाट असताना केवळ गर्दी जमविण्यासाठी आणि प्रोमोशनसाठी राज्य सरकारकडून मोदींच्या शिर्डीमधील कार्यक्रमावर तब्बल २ कोटीची उधळपट्टी करण्यात आल्याचे समजते. नियोजित ठिकाणी २० हजार घरकुल लाभार्थी कुटुंबीयांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून, जवळपास ४० हजार लोक उपस्थित राहण्याचे आयोजन सरकारकडून करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
'५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’, मोदींना राष्ट्रवादीचे खोचक प्रश्न
एनसीपीने आपल्या ‘जवाब दो’ मोहिमेअंतर्गत आता थेट पंतप्रधानांना लक्ष्य करत त्यांच्या परदेश वारी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. लवकरच पंतप्रधानांच्या परदेश वारीचे शतक पूर्ण होत असले तरी देशाने त्यातून काय साधले असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना विचारला आहे. युपीएच्या काळात ९ वर्षात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्यांवर ६४२ कोटी रुपये खर्च झाले होते. तर दुसरीकडे मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आज पर्यंत तब्बल १४७४ कोटी रुपये खर्च झाले तरी त्यातून देशाला काय सध्या झालं असा सवाल केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
'अब की बार' सामान्यांच्या खिशावर जास्तच भार; पेट्रोलची नव्वदीकडे
इंधन दरवाढ कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आणि त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सुद्धा महागाईच्या भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ आज सुद्धा कायम आहे. मुंबईत पेट्रोल ११ पैशांनी वाढले आहे. परंतु, डिझेलच्या दरात २४ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ८८.२९ रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर ७९.३५ रुपये मोजावे लागत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
#MeToo : उद्या तसे आरोप मोदींवर सुद्धा होतील : शक्ती कपूर
#MeToo मोहिमेवर सध्या देशभर वादंग निर्माण झालं असताना अभिनेते शक्ती कपूर यांनी वेगळीच शंका या मोहिमेवर उपस्थित केली आहे. त्यांच्या नुसार या प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली या केवळ ब्लॅकमेल करत असल्याची टीका तसेच शंका शक्ती कपूर यांनी व्यक्त केली आहे. उद्या असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा होतील अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस जाहीर
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले करून त्यांना गुजरातबाहेर पळवून लावणाऱ्या आमदार अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये एका १४ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपी बिहारचा असल्याचे समोर येताच उत्तर भारतीयांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आले तसेच त्यांना गुजरात सोडण्याचे आदेश हिंसक जमावाकडून देण्यात आले होते.
6 वर्षांपूर्वी -
दसरा-दिवाळीत महागाई अजून भडकणार, इंधन दरवाढीचा भडका कायम!
इंधन दरवाढ कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आणि त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सुद्धा महागाईच्या भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ आज सुद्धा कायम आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात आज वाढ झालेली नाही. परंतु, डिझेलच्या दरात ९ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ८८.१८ रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर ७९.११ रुपये मोजावे लागत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गुजरात; कामावरुन घराकडे निघालेल्या बिहारी तरुणाची अज्ञातांकडून हत्या
गुजरातमध्ये एका बिहारी तरुणाची क्रूर हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक वृत्त आहे. गुजरातच्या गया येथील केडिया गावात अरमजीत नावाचा युवक हा मूळचा बिहारचा राहणारा होता. शुक्रवारी रात्री उशिरा तो कामावरुन घरी परतत असताना, काही अज्ञातांनी अमरजीतवर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याला क्रूरपणे ठार मारले असं समजत.त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून पुन्हा गुजरात मध्ये उत्तर भारतीयांविरोधात हिंसेचे प्रकार सुरु झाल्याचे समजते. तसेच त्याचा मृत्यू हा गुजरातमधील हिंसक आंदोलनचाच भाग असल्याचा थेट आरोप अमरजीतच्या कुटुंबीयांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार