महत्वाच्या बातम्या
-
आम्हाला मोदी भक्त म्हटलं जातं अंध भक्त नाही: भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ
भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नवा जावई शोध लावला आहे. त्यांच्या महान अध्यात्म ज्ञानानुसार नरेंद्र मोदी म्हणजे भगवान विष्णूचा ११ वा अवतार असल्याचं वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं आहे. भारताच्या हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुतं आहेत, तसेच भारतमातेला आपण देव मानतो. पंतप्रधान हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्याप्रमाणे करत आहेत त्याचा विचार करता आमच्यासाठी ते देवासमानच आहेत, असे वाघ यांनी म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी फ्रान्स दौरा, राहुल गांधींचं प्रश्नचिन्ह?
राफेल लढाऊ विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या न्यूज पोर्टलने केला होता आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राफेल करारासाठी दसॉल्टला रिलायन्ससोबत व्यवहाराची अट घालण्यात आली होती? मीडियापार्टचा गौप्यस्फोट
भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल या लढाऊ विमान खरेदी करारावरून फ्रान्सच्या प्रसार माध्यमांकडूनच नवे खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा फ्रान्समधील मीडियापार्ट या नामांकित डिजिटल न्युजने केला होता. दरम्यान, दसॉल्ट एव्हिएशनने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, आम्ही केवळ स्वायत्तमपणे भागीदार म्हणून रिलायन्सची निवड केल्याचे स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च दणका! राफेल विमान खरेदी प्रक्रियेची पूर्ण माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे मोदी सरकारला आदेश
राफेल विमान करारावरून मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांनी आधीच राफेल करारातील व्यवहाराची माहिती सामान्यांना उघड करावी अशी मागणी केली होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव मोदी सरकारने ती फेटाळली होती. परंतु आता सुप्रीम कोर्टातूनच मोदी सरकारला आदेश गेल्याने केंद्र सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
चेतावणी पोश्टर? गुजराती नरेंद्र मोदी, गुजराती व मराठी लोकांनी एका आठवड्यात वाराणसी सोडा
मोदींचा उत्तर प्रदेशातील मतदारसंघ वाराणसी शहरात जागोजागी पोस्टर लावले जात आहेत. ज्यावर असा मजकूर छापण्यात आला आहे की “गुजराती नरेंद्र मोदी वाराणसी सोडा, गुजरात आणि महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांच्या निषेदार्थ वाराणसीत जंग ए ऐलान”. तसेच वाराणसीतील गुजराती समाजातील आणि मराठी लोकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी शहर सोडावं असा चितावणीखोर मजकूर त्या पोस्टरवर छापण्यात आले असून ते शहरभर लावण्यात येत आहे. शहरभर पोश्टर लावणारे हे सर्व प्रतिनिधी यूपी बिहार एकता मंच या संघटनेशी संबंधित आहेत असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
#MeToo: मोदी सरकारमधील मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
सध्या देशभरात लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्याचे प्रमाण #MeToo च्या माध्यमातून वाढीस लागलं आहे. अनेक सेलिब्रेटी याच्यात अडकल्यानंतर आता थेट मोदी सरकार मधील मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. याद्वारे अनेक महिला आपल्यावरील कथित अत्याचाराबद्दल जाहीरपणे बोलू लागल्या आहेत, त्यामुळे दाबून टाकलेली लैंगिक छळ प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात
दिवाळी जसजशी जवळ येऊ लागली आहे तस तशी महागाईसुद्धा सीमा ओलांडणार असं चित्र आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले असून इंधन दरांनी पुन्हा नौवदीच्या दिशेने कूच केली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील बलात्कार प्रकरण, तब्बल ५० हजार यूपी बिहारींचे गुजरातबाहेर पलायन
साबरकांठा येथे एका १४ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याने गुजरातमध्ये सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर बलात्कारी आरोपी हा बिहारी असल्यामुळे उत्तर भारतीयांविरोधात संपूर्ण गुजरात मध्ये आंदोलन पेटलं आहे. त्यानंतर भेदरलेल्या उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन करण्यास सुरुवात केली असून, आता पर्यंत तब्बल ५० हजारांवरून अधिक युपी-बिहारींनी गुजरातच्या बाहेर पलायन केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातींना धमकी? गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे, मोदींनाही वाराणसीला जायचे आहे
चिमुकलीवर गुजरातमध्ये झालेल्या बलात्कारानंतर सध्या उत्तर भारतीयांना गुजरातमधून मारहाण करून हुसकावून लावण्यात येत आहे. अगदी गुजरात मध्ये पोलिसांना फ्लॅगमार्च करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या संजय निरुपम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसेच गुजराती समाजाला अप्रत्यक्ष धमकावत आहेत अशी चर्चा राजकीय निरुपम यांच्या नागपूरमधील वक्तव्यावरून रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमधून यूपी-बिहारींचे मिळेल त्या गाडीने पलायन, पोलिसांचा फ्लॅग मार्च
बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमधील वातावरण यूपी-बिहारींच्या विरोधात प्रचंड तापले असून उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांनी मिळेल त्या गाडीने पळ काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून सुद्धा सध्या अनेक ठिकाणी फ्लॅगमार्च करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे हल्ला झाल्याने आतापर्यंत एकूण ४२ गुन्हे दाखल झाले असून ३४२ जणांना अटक करण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हिंसेच्या भीतीने परराज्यांतून विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांनी गुजरातच्या अनेक भागातून पलायन करण्यास सुरुवात केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीरच्या सरकारी कर्मचाऱ्यांना अनिल अंबानींच्या 'आरोग्य विमा' कंपनीचा विमा अनिवार्य? राहुल गांधी
राफेल करारावरून आधीच चर्चेत आलेले अनिल अंबानी आणि मोदी सरकार पुन्हा नव्या वादात येण्याची शक्यता. कारण अनिल अंबानींच्या मालकीची रिलायन्स जनरल इन्शुरन्स लिमिटेडकडून आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांवरील लाठीहल्ला; यूपीच्या त्या गावात भाजपला बंदी, थेट फलक लावून इशारा
भाजपच्या नेत्यांना आणि पक्षाला उत्तर प्रदेशातील धनौरा तालुक्यातील रसूलपूरच्या गावकऱ्यांनी गावाच्या सीमेवर थेट फलक लावून भाजपच्या नेत्यांना इशारा दिला आहे. शिवाय गावात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते फिरकू नये म्हणून पहारा सुद्धा देण्यात येत आहे. “जर आमच्या गावात भाजप नेते मतं मागण्यासाठी आले, तर ज्याप्रकारे दिल्लीच्या सीमेवर आम्हा शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला, त्याचप्रकारे भाजप नेत्यांचं आमच्या गावात स्वागत केले जाईल” अशा कडक शब्दात हा इशारा देण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीआधी ३ राज्यांमध्ये राहुल गांधी मोदींना जोरदार धक्का देणार, सर्वे रिपोर्ट
कालच मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगण या ५ राज्यांमध्ये १२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत मतदान तर, ११ डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याधर्तीवर प्रसारित करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या ३ तीन राज्यांमध्ये मोदींनी सभा घेताल्यातरी सत्तापरिवर्तन अटळ आहे असं म्हटलं आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल आणि त्यात राजस्थानमध्ये भाजपचा धुव्वा उडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
५ राज्यांच्या निवडणूका जाहीर; ११ डिसेंबर रोजी मतमोजणी
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम या चार राज्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम तसेच तेलंगाणा या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत आयोजित करून प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या सभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली: काँग्रेसचा थेट आरोप
लवकरच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा पूर्ण कार्यक्रम अधिकृत पणे जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने या नियोजित पत्रकार परिषदेच्या वेळात ऐनवेळी बदल करून ही पत्रकार परिषद दुपारी ३.३० वाजता होणार असल्याचे जाहीर केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
जो संसार करत नाही त्याला घरी गेल्यावर काय काम नसते, मग महागाई काय समजणार?
जो स्वतः संसार करत नाही, मग अशा माणसाला महागाई काय समजणार अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. देशात प्रचंड महागाई वाढली आहे आणि जो स्वतः संसार करत नाही त्याला घरी गेल्यावर काही काम नसते असं अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांना हसू आवारता आलं नाही.
6 वर्षांपूर्वी -
बलात्काराच्या घटनेनंतर मोदींच्या गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलन पेटलं
गुजरात राज्यातून सध्या उत्तर प्रदेशातील आणि बिहारच्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. कारण चिमुकल्या मुलीवर क्रूर पणे बलात्कार झाल्यानंतर गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारपासून गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनांनी पेट घेतला आहे. या हिंसक हल्ल्यात यूपी आणि बिहारी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
रशियाकडून एस-४०० खरेदी केल्यास अमेरिका भारतीय उत्पादनांवर कर लादणार?
भारताने रशियासोबत महत्वाकांक्षी असा एस-४०० वायु संरक्षण प्रणाली खरेदी करार केल्यास अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन भारतातील उत्पादनांवर मोठे कर लादण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजून आर्थिक संकटात जाईल अशी शक्यता आहे. भारतीय लष्कराला हवाई सुरक्षेसाठी रशियाकडून मिळणारी एस-४०० वायु संरक्षण प्रणाली सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. त्यात आधीच अमेरिका आणि रशिया यांच्यात पूर्वीपासून तणावाचे संबंध राहिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
चिमुकलीवरील बलात्कारानंतर उत्तर भारतीयांवर गुजरातमध्ये हल्ले, थेट गुजरात सोडण्याच्या धमक्या
एका १४ महिन्यांच्या चिमुकलीवर बिहारी मजुराने बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधातील वातावरण तापलं आहे. या घटने नंतर गुजराती समाज उत्तर भारतीयांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत असून, काल गुरुवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी बिहारचा रहिवासी असल्याने आंदोलकांकडून एकूणच उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात भर म्हणजे त्यांना थेट गुजरात सोडून जाण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ मध्ये सत्तेत येण्याची खात्री नव्हती, म्हणून आश्वासनं देत सुटलो: नितीन गडकरी
आम्हाला २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्याची खात्री नसल्याने काही जणांनी मतदाराला आश्वासने द्यायला सांगितली. त्यानंतर आम्ही इतकी आश्वासने दिली लोकांना की ती आता आठवत सुद्धा नाहीत अशी कबुली खुद्द केंद्रीय दळणवळन मंत्री नितीन गडकरी यांनी मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमा दरम्यान दिली. परंतु, त्यांच्या या विधानाने भाजपच्या अडचणी वाढणार असून गडकरींच्या या कबुलीने भाजपची एक प्रकारे पोलखोल झाली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो