महत्वाच्या बातम्या
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवू नका, मोदींच भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना आवाहन केलं की, ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवू नका, हा मुद्दा एखाद्या विचारसरणीचा नसून, सभ्य समाजाला अशा प्रकारचे वर्तन शोभा देत नाही, असे मोदींनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
नोटबंदी हा 'माष्टरस्ट्रोक' नव्हे तर मोदी सरकारचा फुसका बार, ९९.३० टक्के नोटा RBI कडे परत: आरबीआय अहवाल
नोटबंदी हा मोदी सरकारचा ‘माष्टरस्ट्रोक’ म्हणत जी काही हवा निर्मिती करण्यात आली होती, तो वास्तविक मोदी सरकारचा फुसका बार असल्याचे आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २०१७-१८ च्या वार्षिक अहवालात समोर आलं आहे. त्या वार्षिक अहवाल आज सादर झाला असून यातील आकडेवारीवरुन नोटाबंदीचा निर्णय फसल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मोदी सरकार नोटबंदी या विषयावर अक्षरशः तोंडघशी पडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरात गोध्रा हत्याकांड; दोघांना जन्मठेप तर तिघांची निर्दोष मुक्तता
गुजरातमधील गोध्रा हत्याकांडप्रकरणी एसआयटी कोर्टाने ५ पैकी २ आरोपींना दोषी ठरविले असून इतर तिघांची पुराव्या अभावी सुटका केली आहे. निर्णयाअंती एसआयटी कोर्टाने इमरान उर्फ शेरु भटुक आणि फारुख भाना यांना जन्मठेपेची शिक्षा तर हुस्सैन सुलेमान मोहन, फारुक धांतिया आणि कासम भमेडी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅपला फटकारले
सुप्रीम कोर्टाने इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सअॅपला नोटीस बजावून चांगलेच झापले आहे. व्हॉट्सअॅपला नोटीस बजावून सर्वोच न्यायालयाने प्रश्न विचारला आहे की, ‘अद्याप भारतात तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक का करण्यात आलेली नाही?’.
6 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणुकीपूर्वी सर्व पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा, अन्यथा तुमचा पेट्रोल पुरवठाच बंद करू
आगामी निवडणुकीपूर्वी सर्व पेट्रोल पंपावर नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळ जनक दावा भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेने केला असल्याचे वृत्त ‘द हिंदू’ वृत्तपत्राने प्रसिध्द केले आहे. त्यामुळे केंद्राकडून सरकार कडून २०१९ पूर्वी पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावा यासाठी दबाव वाढत असून प्रमोशनसाठी जाणीवपूर्वक हे प्रकार केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील शिव स्मारक पहिल्या विटेच्या प्रतीक्षेत, तर सरदार पटेलांचा १९८९ कोटीचा पुतळा येत्या ३० दिवसांनी पूर्ण होणार
गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच आणि तब्बल १९८९ कोटी रुपये खर्चून भव्य असा पुतळा येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असं लिखित निवेदन खुद्द गुजरात सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्याची घोषणा गुजरात सरकारने केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्यापेक्षा भाजपने पंतप्रधानांचं नाव बदलून वाजपेयी करावं, तरच मतं मिळतील: केजरीवाल
दिल्लीच्या प्रसिद्ध रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणं देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महापालिकेच्या काही नगरसेवकांनी दिल्यामुळे भाजप विरोधात आता आवाज उठण्यास सुरुवात झाली आहे. त्यालाच अनुसरून आप’चे संयोजक तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप तसेच मोदींना खोचक टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील तरुणाईचा कल काँग्रेसकडे? गुजरातमध्ये ABVP ला धक्का आणि एनएसयूआय'चा विजय
आरएसएस तसेच भाजप प्रणित विद्यार्थी संघटनेला गुजरातच्या बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात काँग्रेस प्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात ‘एनएसयूआय’ या संघटनेने धक्का देत विजय संपादित केल्याने मोदींच्या गुजरात मधील तरुणाईचा कल काय असू शकतो ते प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे असे स्थानिक राजकीय विशलेषक मत व्यक्त करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
त्या महान भारतरत्नाचे अस्थिकलश; भाजप नेत्यांचा कुठे हास्यांचा बाजार तर कुठे सेल्फी; ही कसली आस्था?
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आणि संपूर्ण भारत तसेच सर्व पक्षीय नेते मंडळी शोकाकुल झाली होती. कारण भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे राजकारणापलीकडे जाऊन आणि पक्षीय मतभेद बाजूला सारून प्रत्येकाशी मनापासून जोडले गेले होते. परंतु त्यांच्या मागील अनेक वर्षांच्या आजारपणात त्यांची साधी आठवण सुद्धा न काढणारे, आता त्यांच्या अस्थिकलश समोर जरी प्रामाणिकपणे नतमस्तक झाले असते तरी सर्व काही सत्कारणी लागल्यासारखे झाले असते.
6 वर्षांपूर्वी -
मोदी व भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीतील मतांसाठी वाजपेयींच्या मृत्यूचं राजकारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाचं राजकारण करत आहेत, असा थेट आरोप वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्वकाही आधार'शी जोडल्याने भारतावर ‘सिव्हील डेथ’च सावट : एडवर्ड स्नोडेन
अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने भारतातील ‘आधार’ संबंधित केलेल्या विधानामुळे खळबळ माजली आहे. भारत सरकारने UIDAI च्या माध्यमातून सार्वत्रिक दक्षता प्रणाली बनवली आहे. परंतु भारत सरकारच्या आधार’ला सर्वकाही जोडण्याच्या सक्तीमुळे भारताला ‘सिव्हिल डेथ’ म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याच्या समाप्तीचा धोका असल्याचं विधान केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून पूरग्रस्त केरळसाठी ५०० कोटींची मदत जाहीर
केरळच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० कोटी रुपयांची आपत्कालीन मदत जाहीर केली आहे. केरळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून पडत आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यच ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज ७२ वा स्वातंत्र्यदिन, पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं
आज ७२ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर देशाला संबोधित करताना अनेक मुद्दे मांडले आणि भविष्यातील योजनांची जनतेला माहिती करून दिली.
6 वर्षांपूर्वी -
आज ७२ वा स्वातंत्र्यदिन, देशभरात उत्साह
आज ७२ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर देशाला संबोधित करताना अनेक मुद्दे मांडले आणि भविष्यातील योजनांची जनतेला माहिती करून दिली.
6 वर्षांपूर्वी -
ओपिनियन पोल: छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशात भाजप जोरदार धक्का बसणार?
या वर्षाअखेर छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेश या तीन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या तिन्ही राज्यात सध्या भाजपचे सरकार असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसून काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
जातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही: पंतप्रधान
देशभर अनेक महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्यावर रान उठले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी आरक्षण, एनआरसी आणि जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना अशा विविध प्रश्नांना जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान राफेल विमान खरेदीबाबत संसदेत एक मिनिट सुद्धा बोलत नाहीत: राहुल गांधी
राहुल गांधी सध्या राजस्थान विधानसभेच्या अनुषंगाने राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल विमान खरेदीवरून जोरदार हल्ला चढवला असून त्यामागील वास्तव काय ते मोदी संसदेत बोलायचं टाळतात असा घणाघात केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात आयआयटी'चा मोठा वाटा : नरेंद्र मोदी
मुंबई आयआयटी’च्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण जगभरात डंका आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात आयआयटीचा मोठा वाटा आहे. भारतातून विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून जगभरात भारताचे नाव उंचावत आहेत. त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आयआयटी विद्यार्थ्यांबाबत गौरोद्गार काढले.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा
पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार आसाम मधल्या नगांव जिल्ह्यात हा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर महिलेला त्यांची ओळख पटली असून गोहेन यांचं त्या महिलेकडे जाणं येणं होतं असं त्या महिलेचं म्हणणं आहे. पोलिसांकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्या नुसार याची नोंद ८ महिन्यांपूर्वीच करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशात तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम बंदी?
देशात जर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाच तर थेट फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडियांवर बंदी आणण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. कारण तणावाच्या काळात अफवांचा सुळसुळाट वाढतो आणि अशावेळी परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केंद्र सरकार यावर गंभीरपणे विचार करत आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल