महत्वाच्या बातम्या
-
सर सलामत तो हेल्मेट पचास | नाशकात आजपासून 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' अभियान
आपल्या देशाची संस्कृती ही कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबासाठी आपले जीवन सुरक्षित असणे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यासाठी कोणतेही वाहन चालवितांना आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच आज (रविवारी) जिल्ह्यात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरीकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये सोमवारपासून 8 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु | पाणी कपातीचीही भुजबळांची घोषणा
डेल्टा व्हेरिएंट आणि रुग्णसंख्येतील वाढ या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केलीय. भुजबळ यांनी आज नाशिकमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निर्बंधांची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये उद्यापासून सरकारी, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचं दत्तक नाशिक | स्मार्ट सिटीच्या विकासाला नाशिककर कंटाळले | स्थानिकांची बॅनरबाजी
आपलं शहर स्मार्ट असावं, अशी प्रत्येक शहवासीयांची अपेक्षा असते. परंतु चुकीच्या आणि रेंगाळलेल्या कामांमुळे वैताग आल्यावर हे काम थांबवण्याची मागणी नागरिकांना करावी लागते. काहीशी अशीच परिस्थिती नाशिकमधील मुख्य रस्त्यांची झाली आहे. दहीपूल बाजारपेठेतील रस्ते खोदून त्याची उंची काम केली आहे. यामुळे पावसाचे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि रहिवाश्यांच्या घरात घुसण्याची शक्यता आहे. यामुळे स्थनिक नागरिकांनी काम थांबवण्याची मागणी करणारा फलकच लावला आहे. मुख्य रस्त्यावर असलेला पिंपळपार चौकात स्मार्ट सिटीचे काम संथगतीने सुरु आहे. यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. हे काम त्वरित थांबवण्याची विनंती नागरिकांनी केली आहे. त्यासाठी फलकाचा आधार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | नाशिकमध्ये 12 मे पासून 10 दिवसांचा कडक लॉकडाउन
नाशिक जिल्ह्यात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 12 मे रोजी 12 वाजल्यापासून 22 मे पर्यंत 10 दिवस जिल्ह्यातील मार्केट पूर्णपणे बंद पाडले जाणार आहे. या लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक हादरलं | एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन हत्या
नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आल्याने नाशिक जिल्हा हादरला आहे. चव्हाण कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केल्याची घटना रात्री घडली. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुका हादरला आहे. गळा चिरुन हत्या करण्यात आल्याने चव्हाण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सकाळी ही बाब उघड झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी मालेगांव , नांदगाव पोलीस दाखल झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: अडगावकर सराफाच्या दुकानात हजारो गुंतवणूकदारांची धाव; मोठा गोंधळ
गुंतवणुकीच्या नावाखाली नाशिकमध्ये फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. नाशिकच्या आडगावकर सराफने ‘सुवर्णसंधी’ या नावाने योजना सुरू केली होती. या योजनेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पैसे गुंतवले. मात्र कालावधी संपून देखील त्यातील पैसे, दागिने पुढील सहा महिने उलटूनही गुंतवणूकदारांना मिळाले नाहीत. तेव्हा आज कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ शॉपमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी मोठा गोंधळ घातला. परतावा आणि मुद्दलही मिळत नसल्यानं गुंतवणूकदार संतप्त झाले.
5 वर्षांपूर्वी -
साईबाबा जन्मस्थळाचा वाद; शिर्डी आजपासून बंद
साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर उघडे राहणार असून, दुकाने, बाजार मात्र बंद राहतील. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकच्या रस्त्यावर धावणार 'पिंक ऑटो'
शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासह त्यांना प्रवासात सुरक्षेची हमी देणाऱ्या पिंक रिक्षा नवी दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक शहरातील रस्त्यावरही धावणार आहेत. स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या महत्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप आले असून, महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शहरातील महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण व परवाने दिले जाणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
‘स्मार्ट सिटी’ केवळ निवडणुकीचं गाजर, अनेक ठिकाणी सुरुवातच नाही
स्मार्ट सिटी परियोजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या नागपूर, औरंगाबाद, पुणेसह महाराष्ट्रातील आठ शहरांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १,५६८ कोटी रुपये दिले आहेत; मात्र वस्तुस्थिती ही आहे की, ४ वर्षांनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवडत्या योजनेंतर्गत निर्धारित कार्यांतील ५८ टक्के कामांना अद्याप सुरुवातच करण्यात आल्याचे निष्पन्न झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे सत्तेत असताना नाशिक महानगर पालिकेत केलेले कचरा व्यवस्थापन...विरुद्ध औरंगाबादमधील कचराकोंडी
मनसे सत्तेत असताना नाशिक महानगर पालिकेत केलेले कचरा व्यवस्थापन…विरुद्ध औरंगाबादमध्ये झालेली प्रचंड कचराकोंडी आणि मुख्यमंत्र्यांचे हतबल होऊन औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करण्याचा इशारा
7 वर्षांपूर्वी -
'एनी टाईम मिल्क' एटीएम मशिन लोकार्पण : नाशिक
या ‘एनी टाईम मिल्क’ एटीएम मशिन मुळे ग्राहकांचा थेट फायदा होणार असून, दलालांच्या नफ्याला ही चाप लावण्यासाठी मोठी मदत होऊ शकते.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL