NBCC India Share Price | सरकारी कंपनीचा 37 रुपयांचा शेअर तेजीत, सकारात्मक बातमीमुळे शेअर्सची किंमत वेगात धावतेय, फायदा घेणार?
NBCC India Share Price | ‘NBCC इंडिया’ या ‘केंद्रीय शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालय’ च्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची चर्चा शेअर बाजार जोर धरू लागली आहे. ‘NBCC इंडिया’ या कंपनीला केंदिरी गृह मंत्रालयाच्या सीमा व्यवस्थापन विभागाकडून 448.02 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही बातमी येताच कंपनीचे शेअर्स सकारात्मक वाढीसह ट्रेड करु लागले. मिझोरममधील भारत-बांगलादेश सीमेजवळ 88.58 किमी लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी ‘NBCC इंडिया’ कंपनीला ऑर्डर देण्यात आली आहे. NBCC कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,430 हजार कोटी रुपये आहे. 3 एप्रिल रोजी ‘NBCC इंडिया’ कंपनीचे शेअर्स 35.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1.89 टक्के वाढीसह 37.65 रुपये किमतीवर क्लोज झाले. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक किंमत पातळी 43.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 26.55 रुपये होती. (NBCC India Limited)
2 वर्षांपूर्वी