सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं वास्तव, तासाभरातच विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री झाले आणि शिंदेंच्या 40 आमदारांचा कार्यक्रम निश्चित झाला?
DCM Ajit Pawar | महाराष्ट्रात झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी फुटला असून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याच पाच वर्षांच्या कार्यकाळात पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. याआधी 2019 मध्ये अजित पवार यांनी आपल्या काकांविरोधात बंड केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. नंतर ते उद्धव यांच्या सरकारमध्ये आणि आता तिसऱ्यांदा शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.
2 वर्षांपूर्वी