महत्वाच्या बातम्या
-
सर्जिकल स्ट्राईक वरून मतं मागणारे मोदी स्वतः स्ट्राईकसाठी गेले होते कि जवान? - शरद पवार
नागपूर: पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणायचे ‘घर मै घूस कर मारुंगा… ‘, मात्र दहशतवाद्यांना मारायला एअर स्ट्राईकमध्ये मोदी स्वतः गेले होते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अनिल देशमुख यांच्या प्रचारसभेत बोलत होते तेव्हा त्यांनी सर्जिकल स्ट्राईक वरून नरेंद्र मोदींची खिल्ली उडविली.
5 वर्षांपूर्वी -
पालघर: शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
निवडणुकांचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना देखील अजून पक्षप्रवेश सूरच आहेत. सत्ताधारी पक्षातील म्हणजे शिवसेना आणि भाजपमधील तिकीट न मिळालेली मंडळी दुसऱ्या पक्षात उडया घेताना दिसत आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आता एनसीपी’मध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेने पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिखर बँकेत भाजपचे संचालक आहेत हे भाजपने जनतेपासून का लपवलं: अजित पवार
राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.
5 वर्षांपूर्वी -
ईडी चौकशी: युतीच्या यात्रांची चर्चा संपली; ग्रामीण भागात पवारांची चर्चा आणि भावनिक किनार: सविस्तर
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज शरद पवार ईडी कार्यालयात; परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तासह कलम १४४ लागू
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: राष्ट्रवादीची पोलीस चौकीसमोरच 'देवेंद्र-नरेंद्र चोर है' घोषणाबाजी
महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांसह एकूण ७० नेत्यांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. ईडीने केलेल्या कारवाईविरोधात बारामतीकरांनी बारामती बंदची हाक दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बीडमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची शरद पवारांकडून घोषणा
आमदार, खासदार पक्ष सोडून जात असल्यानं काहीशा बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार केल्याचं दिसत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच त्यासाठी मैदानात उतरले असून त्यांनी आज बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची अचानक घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सत्ताधारी भाजप-शिवसेनेला टक्कर देण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्यासह सर्व तुल्यबळ मोहरे मैदानात उतरवले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गणेश नाईकांना भाजपच्या व्यासपीठावर स्थान नाही; भाजपातलं स्थान समजलं?
भारतीय जनता पक्षाच्या गोटात दाखल होऊन काही दिवस उलटत नाही तोच गणेश नाईक यांना उपेक्षित वागणुकीला सामोरे जावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जागा न मिळाल्यामुळे गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक कार्यक्रमातून आल्या पावली माघारी परतले. त्यामुळे भविष्यात गणेश नाईक आणि भारतीय जनता पक्षाचे कितपत जमणार, याबाबत शंका व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. तर दुसरीकडे गणेश नाईक यांचा वाढदिवस असल्याने ते कार्यक्रमातून लवकर निघून गेल्याचेही सांगितले जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंगलदास बांदल आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील यांच्या विरुद्ध सेनेकडून लढण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
5 वर्षांपूर्वी -
उदयनराजे भाजपात जाणार, त्यामुळे रामराजे निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण येथील निवासस्थानी गुरुवार सायंकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रामराजे आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
हर्षवर्धन पाटलांचा भाजपात प्रवेश; इंदापूरमध्ये राष्ट्रवादीशी थेट लढत होणार
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त केलीच होती. ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. अखेर आज काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ते इंदापूर मतदार संघातूनच भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? हा प्रश्न कायम आहे. मात्र आज त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
श्रीवर्धन: अवधूत तटकरेंविरुद्ध ६०९६१ मतं घेणाऱ्या सेनेच्या रवी मुंढेंचं राजकीय अस्तित्व धोक्यात?
आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्ष आणि सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी एनसीपी-काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. आता एनसीपीला आणखी एक धक्का बसणार आहे. एनसीपीचे आमदार अवधूत तटकरे हे सोमवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे खासदार मजीद मेमन देखील भाजपात प्रवेश करणार
मागील काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि खासदार माजिद मेमन हे मेट्रो भूमिपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाला माजिद मेमन उपस्थित राहिल्याने ते देखील भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
लबाड, फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचं नाही: हर्षवर्धन पाटील
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. इंदापूरचे माजी आमदार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी सोडून नुकतेच भाजपवासी झालेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज हर्षवर्धन यांची भेट घेऊन बंद खोलीत त्यांच्याशी खलबतं केल्यानं या चर्चेला बळकटी मिळाली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतर आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटील बावड्याकडे रवाना झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शिखर बँक घोटाळा: सुप्रीम कोर्टाने सहा विशेष याचिका फेटाळल्या
महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश योग्यच असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालकांसह राज्यातील बड्या नेत्यांसाठी हा झटका मानला जात आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीतही यामुळे वाढ होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
घरकुल घोटाळा: शिवसेना नेते सुरेश जैन आणि एनसीपी नेते देवकरांसह ४८ आरोपी दोषी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने माजी मंत्री, शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सर्वच आरोपींना दोषी ठरवले आहे. हा निकाल देताना न्यायालयाने जैन, देवकर यांच्यासह सर्वच ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. दुपारनंतर जिल्हा न्यायालय सर्व दोषींची शिक्षा जाहीर करणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारताच पत्रकार परिषदेत भडकले शरद पवार
मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीतून अनेक नेते पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामागोमाग चित्रा वाघ, मधुकर पिचड, संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड अशा अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे तर सातारचे खासदार उदयनराजे भोसले, पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच एनसीपीला अनेक धक्के सहन करावे लागत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील गँगरेप प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास करा, राष्ट्रवादीची मागणी
मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्त्वात आज मुंबईतील चुनाभट्टी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलिसांना दिलेल्या निवेदनात आरोपींना तात्काळ अटक करुन या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा, अशी मागणी करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
खरा हिंदू मी, हनुमान चालिसा, वेद-पुराण सर्व येतं; हिंदू आदित्य ठाकरेंना सांगा बोलायला
राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या राज्यभर शिवस्वराज्य यात्रा जोरदारपणे सुरु आहे. आमदार-खासदारांच्या फुटीकडे दुर्लक्ष करत पक्षाने संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढला आहे. त्याचाच भाग म्हणजे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये सुरु होती, त्याला स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात विशेष गाजलं ते अमोल मिटकरी यांचं तडाखेबंद भाषण, ज्यामध्ये त्यांनी भाजप शिवसेनेची पिसं काढली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो