महत्वाच्या बातम्या
-
सत्ता असो वा नसो टीव्ही चॅनेलच्या हेडलाइन्समध्ये फक्त राष्ट्रवादी आणि मनसे: सुप्रिया सुळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअ अध्यक्ष राज ठाकरे यांची मागील महिन्यांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जवळीक वाढल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात न उतरता राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजप विरोधात आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला पोषक वातावरण त्यांच्या सभांमधून निर्माण केलं. मात्र त्याचा स्वतःला फायदा करून घेण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची टीम कमी पडली होती.
5 वर्षांपूर्वी -
उस्मानाबाद: पवार कुटुंबीय देखील शिवसेनेच्या वाटेवर?
एनसीपीला एकामागून एक धक्के बसत असून या पक्षातील बडे नेते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जाण्याचे सत्र सुरुच आहे. एनसीपीच्या संस्थापकांपैकी एक असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आ. राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीची राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यात आली असता यात्रेत सहभागी झाले नाहीत. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
5 वर्षांपूर्वी -
जयदत्त क्षीरसागर यांनी ५० कोटी रूपयात मंत्रिपद घेतले
जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रीपद घेण्यासाठी ५० कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप करत येवढे पैसे मतदार संघात खर्च केले असते तर विकास झाला असता असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी केले. सामाजिक व्यासपीठावर भाषणे केली तर कपडे फाडू असा इशाराही त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना दिला.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे अजून काही आमदार शिवसेनेच्या वाटेवर
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपले इनकमिंग सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून विजयी होऊ शकणाऱ्यांना शिवबंधन बांधण्याचे काम वेगात आले असून येत्या आठवड्यात बार्शीचे राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल आणि बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आ. विलास तरे यांना शिवबंधन बांधण्याचे निश्चित झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं: रुपाली चाकणकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरस्थितीपेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी आहे, मागील पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज यात्रा काढण्याची गरज पडली नसती. सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अलमट्टी धरण: २००५ मध्ये आबां'नी जे धाडस दाखवलं ते फडवीसांना जमलंच नाही, अन्यथा?
मुसळधार पाऊस आणि धरणांतील विसर्गामुळे प्रमुख नद्यांनी धोक्याची लक्ष्मणरेषा ओलांडल्याने कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती गंभीर बनली असून अजूनही हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. चार दिवसांनंतरही मदत न पोहोचल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तब्बल ७०८ गावांना गेल्या काही दिवसांतील पुराचा फटका बसला असून तब्बल २ लाख ४७ हजार जणांना विविध यंत्रणांद्वारे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुरग्रस्तभागाला १०० टक्के कर्जमाफी द्या; एनसीपीच्या प्रतिनिधींकडून ५० लाखांची मदत: शरद पवार
सांगलीत आलेल्या महापूरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘शिवस्वराज्य’ यात्रा स्थगित केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुराबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
काल शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आणि सरकारने या यात्रेचा धसका घेतला
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबंधणीला सुरवात केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू केली आहे. या यात्रेत खा. कोल्हे आपल्या पक्षाला बळ देणार असून राज्यातील जनतेला विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या भूमिका समजावून सांगत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या बहुउद्देशीय या ‘शिवस्वराज्य यात्रेत’ गटबाजी असल्याचं समोर आलं होतं. तर पक्षातील काही नेत्यांना विश्वासात व विचारात न घेता या यात्रेचे आयोजन केले असल्याची कुजबुज पक्षात सुरु असल्याचं बोललं जात होत.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम'विरोधात एल्गार! २१ ऑगस्टला विरोधकांचा मोर्चा
निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
भाजपनीती! एनसीपी'चे बहुतांश आमदार सेनेविरुद्ध निवडून आल्याचा इतिहास; युती अचानक तोडणार? सविस्तर
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
6 वर्षांपूर्वी -
उद्योगपतींवर आत्महत्येची वेळ; हे 'मेड इन इंडिया' की 'डेड इन इंडिया'? - धनंजय मुंडे
मागील २ दिवस बेपत्ता असलेले ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ यांनी मंगळुरु येथील नेत्रावती नदीत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे. आज नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. यावरून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सिद्धार्थ यांनी एक पत्र देखील लिहिले होते.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या 'महाजनादेश आणि जण आशीर्वाद' यात्रेला 'शिवस्वराज्य यात्रेने' उत्तर
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. एकीकडे इतर पक्षांमधील नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात येत असतानाच थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाजनादेश यात्रेची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या या महाजनादेश यात्रेला एनसीपी’च्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार असून, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 6 ऑगस्टपासून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवेंद्रराजेंच ठरलं तर! विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला राजीनामा
विधानसभा निवडणुकीआधी एनसीपीला अजून एक धक्का बसला असून सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा असा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी मांडला होता. भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचाराचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत एकप्रकारे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले.
6 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत राष्ट्रवादीचं राजकारण संपुष्टात येणार, गणेश नाईक भाजपच्या वाटेवर?
नवी मुंबई आणि ठाणे या भागातील राष्ट्रवादीचा चेहरा असलेले माजी मंत्री गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करण्यास असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. नाईक हे राष्ट्रवादीच्या ५७ नगरसेवकांसह येत्या काही दिवसांत प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या निवासस्थानी एनसीपीच्या ५७ नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत नाईक यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्ष टिकवायचा असल्याने आरोप: गिरीश महाजन
मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोकांचे भारतीय जनता पक्षातील आणि शिवसेनेतील प्रवेश हा सत्तेचा गैरवापर करत, प्राप्तिकर विभाग आणि ईडीच्या मार्फत दबाव टाकून करून घेतले जात आहेत असे आरोप धक्कादायक आरोप विरोधकांनी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच कागलच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभागाने अचानक धाडी घातल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
आ. राणाजगजीत सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाची ती अफवा; नेमका विषय आला समोर: सविस्तर
देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसलं तरी अनेक पिढ्या राजकारणात असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी या घरण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. मोठ-मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत होती. त्यामुळे पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भरडं पीठ बाजूला गेलेलं कधीही चांगलच; रोहित पवारांची खोचक टीका
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना आणि भाजप मध्ये जाण्याचं सत्र सुरू आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत खोचक टीका केली आहे. भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
6 वर्षांपूर्वी -
रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
शुक्रवारी एनसीपी’च्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच बोललं जात आहे. त्याला अनुसरून चित्र वाघ यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि त्यासंबंधित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताच त्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचं उघड झालं होतं.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार संपवण्याची योजना? आतापर्यंत २० नेते बाहेर, तर १० तयारीत
देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसलं तरी अनेक पिढ्या राजकारणात असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी या घरण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. मोठ-मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत होती. त्यामुळे पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अखेर चित्रा वाघ यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीला रामराम
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा सत्र थांबायचं नाव घेत नाही आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन अहिर यांच्याप्रमाणेच चित्रा वाघ यादेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चांना शुक्रवारी उधाण आलं होतं. शेवटी चित्रा वाघ यांनी राजीनामा देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून पक्षाच्या प्राथमिक सभासदत्वाचा देखील राजीनामा देत आहे. महाराष्ट्रातल्या महिलांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचा आवाज बनण्यासाठी मला दिलेल्या सर्व संधींसाठी मी तुमची (शरद पवार) आभारी आहे’, असं चित्रा वाघ यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL