महत्वाच्या बातम्या
-
५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल औरंगाबाद आणि नाशिकच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. दरम्यान शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेकडून पीकविमा निवारण केंद्राची उभारणी करण्यात आली. यावेळी आयोजित छोटेखानी सभेत शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालये बंद करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला होता.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेसाठी आता शरद पवारचं मैदानात, मुंबईत महत्वाची बैठक
लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्याने एनसीपीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे, लोकसभेतील पराभव झटकून टाकत नव्या दमाने कामाला सुरुवात करण्यासाठी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण; राष्ट्रवादीचं फडणवीसांना प्रतिउत्तर
बालभारती पुस्तकातील संख्यावाचनाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि एनसीपी’माहे चांगलाच कलगीतुरा रंगल्याच पाहायला मिळत आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला उत्तर देताना एनसीपी’च्या नेत्यांना लक्ष केलं होतं. त्यानंतर पुन्हा एनसीपीने भारतीय जनता पक्षाला जोरदार प्रतिऊत्तर देत ‘राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण, नितीन टोल भर, विनोद जोक मार, असं म्हणत एनसीपीने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्ताधाऱ्यांकडून रामराजें विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली?
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी चालवली आहे, तर फडणवीस सरकारला अधिवेशनातच कोंडीत पकडण्यासाठी एनसीपीने जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आज दिवसभरात विधिमंडळात जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळतील.
6 वर्षांपूर्वी -
उशीरच झाला! जमिनीवरील नेते शरद पवार आता डिजिटल तंत्राचा वापर करणार
मागील काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही समाज माध्यमांचं महत्त्व वाढलं आहे. याद्वारे नेते थेट आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोडले जातात. याच विषयाला नुसरून एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार ९ जून रोजी सकाळी अकरा वाजता शरद पवारां त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर LIVE असणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आज राष्ट्रवादी-कॉंग्रेसची मुंबईत आढावा बैठक; तत्पूर्वी राजू शेट्टीं व राज ठाकरे यांची भेट
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मंगळवारी मंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीनेते धनंजय मुंडे यांच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींसह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकांनी संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं: शिवाजी आढळराव-पाटील
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्र्वादीने दुग्गज नेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांना धूळ चारली आणि अमोल कोल्हे खासदार होऊन थेट संसदेत गेले. शिरूर जागा ही शिवसेनेसाठी शंभर टक्के विजयाची खात्री देणारी होती. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघात घड्याळाचं अजिबात कर्तृत्व दिसलं नाही तर या मतदार संघात लोकांनी प्रचारात जातीचं राजकारण केलं आणि भावनिक होत संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं, असं माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पराभवाचं विश्लेषण करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर कठोर शब्दात निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशात मोदी विरोधी लाट होती; ईव्हीएम'ने सत्ता मिळवण्यापेक्षा निवडणुकाच घ्यायचा नव्हत्या
काल देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ठरले जाईंट किलर! सेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव
शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मोठ्या प्रतिष्ठेचा केला होता. त्यात राष्ट्र्वादीने आयत्यावेळी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांच्या विजयाचा निर्धार केला होता. विद्यमान खासदार आढळराव पाटील हे शिवसेनेतील दिग्गज नेते म्हणून परिचित असल्याने शिवसेनेने येथे प्रतिष्ठा पणाला लावल्याचे पाहायला मिळालं. या मतदारसंघात आढळराव पाटलांची स्वतःची अशी मोठी यंत्रणा असून त्यांना पराभूत करणे म्हणजे मोठं आव्हान असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
मावळ: पार्थ पवारांचा पदार्पणातच पराभव; शिवसेनेच्या श्रीरंग बाराणेंकडून धोबीपछाड!
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार थेट लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने या मतदार संघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना तगडी स्पर्धा होती. त्यात विरोधी उमेदवार थेट पवार घराण्यातील असल्याने मावळ लोकसभा मतदासंघ प्रसार माध्यमांसाठी मोठा चर्चेचा विषय झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
कल्याण: शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी; तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील पराभूत
कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे १ टर्म शिवसेनेकडून खासदारकी उपभोगणारे श्रीकांत शिंदे आता पुढील ५ वर्ष पुन्हा कल्याणचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
ठाणे लोकसभा: शिवसेनेचे राजन विचारे यांचा विजय; राष्ट्रवादीचे आनंद परांजपे पराभूत
ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे २ टर्म शिवसेनेकडून खासदारकी उपभोगणारे राजन विचारे आता पुढील ५ वर्ष पुन्हा ठाण्याचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
रायगड: कोकणी मतदाराने शिवसेनेच्या अनंत गितेंना नाकारलं; राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी
शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना यंदाची लोकसभा काहीशी अवघड असल्याचं आधीच म्हटलं जात होतं. त्यात राष्ट्रवादीने माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्याने शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. अनंत गीतेनी या मतदारसंघाकडे काहीस दुलक्ष केल्याचा आरोप स्थानिक लोकांना अनेकवेळा केला होता आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध रोष पाहायला मिळत होता.
6 वर्षांपूर्वी -
बारामतीत भाजप मातीत; सुप्रिया सुळे विजयी तर कांचल कुल यांचा पराभव
बारामती लोकसभा मतदारसंघावर विजय प्राप्त करण्याचं भाजप नेत्यांचं स्वप्न भंगलं असून या मतदारसंघात केवळ पवार कुटुंबीयच राज्य करतात हे पुन्हा सिद्ध झालं आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी मोठं मोठ्या रणनीती आखात होते आणि त्यावर लक्ष देखील ठेऊन होते.
6 वर्षांपूर्वी -
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार पराभवाच्या छायेत
प्राथमिक फेरीनंतरच मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे मोठ्या फरकाने पुढे आहेत. त्यानुसार पार्थ पवार जवळपास ४० हजार मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत. त्यामुळे हा अजित पवार आणि पवार कुटुंबियांना मोठा धक्का लागू शकतो असं चित्र सध्या तरी दिसत आहे. दरम्यान मतांमधील फरक वाढतच असून त्यातून राष्ट्रवादीमध्ये चिंतेच वातावरण आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिरूर लोकसभा: राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे सुरुवातीपासून आघाडीवर
लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रथामिक कलांमध्ये एनसीपीएचे अमोल कोल्हेंनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. अमोल कोल्हेंविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी पुण्यामध्ये एनसीपीने शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमबाहेर अमोल कोल्हेंचा भावी खासदार असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश
मागील ३ वर्षे पक्षाच्या सर्वच जाहीर कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवणारे एनसीपीएचे मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयदत्त क्षीरसागर भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधतील. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सुट्यानिमित्त परदेश दौऱ्यावर असल्याने हा प्रवेश लांबला होता.
6 वर्षांपूर्वी -
एक्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष संपला असेल तर दुष्काळाकडे वळा आता : धनंजय मुंडे
काल शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि सर्वच टीव्ही वृत्त वाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले असून त्यात पुन्हा भाजपचं सत्तेत येईल असं म्हटलं आहे. त्यांनतर भाजप आणि भाजप समर्थक निवडणूक जिंकल्यासारखा जल्लोष करण्यात मग्न आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते मंडळी देखील संतापली आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले, मुंबईत आमदारांची बैठक बोलावली
लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर आता एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं वृत्त आहे. शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईमध्ये पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच वरून राजाचं आगमन होणार असून, त्या काळात पक्ष विस्ताराची कामं हाती घेणं कठीण काम असतं. त्यात पावसाचा ३-४ महिन्याचा कालावधी संपताच लगेचच विधानसभा निवडणूक लागणार असल्याने सर्वच पक्ष आतापासूनच तयारीला लागतील असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचं दीर्घ आजाराने निधन
माळशिरस विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. मागील ३-४ दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतील सैफी इस्पितळात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्रीपासून त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO