महत्वाच्या बातम्या
-
ठाण्यात अनेक सामाजिक संघटनांचा शिवसेनेवर आरोप करत राष्ट्रवादीला पाठिंबा
देशात २०१४ साली बहुमताने भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. त्यांच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु, मागील ५ वर्षांत भाजप सरकार फेल ठरले. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कधी बोलले गेले नाही. त्यातही युतीचे उमेदवार राजन विचारे यांचा आताचा वचननामा पाहून तर भ्रमनिरास झाला. सलग पंचवीस वर्षे सत्तेवर असतानाही शिवसेनेने ठाण्याची वाट लावली, त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय ठाण्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबईत संजय पाटील यांना मिळणारा पाठिंबा भाजपसाठी धोक्याची घंटा?
ईशान्य मुंबईतील शिवसेना आणि किरीट सोमैयांच्या वादानंतर अखेर किरीट सोमैया यांचा पत्ता कट होऊन मुलुंड मधील स्थानिक नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्याची वेळ भाजपवर आली. प्रचार शिगेला पोहोचला असताना अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना ठिकाणी स्थानिक मतदारांनी चांगलेच फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
काय उखडायची ती उखडा! शरद पवारांचे अमित शहांना आक्रमक उत्तर
बारामती येथील सभेत शरद पवार म्हणाले, मला पद्मविभूषण देणारे, माझं बोट धरून राजकारणात आलोय असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांनी काय केले म्हणून विचारतात हे हस्यास्पद आहे. हे सरकार सैन्याच्या शौर्याचे श्रेय स्वत: घेत आहेत. अभिनंदनची सुटका माझ्यामुळे झाली असं सांगत पंतप्रधान मोदी ५६ इंचाची छाती दाखवतात पण मग आपला कुलभूषण जाधव कित्येक वर्ष पाकिस्तानात का आहे. त्याला सोडवताना मात्र याच पंतप्रधानांची छाती एकदम १२ इंचाची कशी काय होते?
6 वर्षांपूर्वी -
शिवाजी कर्डिलेंचे कार्यकर्ते जावईबुवा जगतापांच्या पाठिशी
नगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. काँगे्रसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील हे भाजपामधून उभे आहेत. मात्र त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत.
6 वर्षांपूर्वी -
दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
देशभरात आज आगामी लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील १३ राज्यांतील ९७ जांगावर १८ एप्रिलला मतदान होत आहे. महाराष्ट्रात बीड, सोलापूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला अमरावती, बुलडाणा या मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा: शरद पवार
लोकसभा निवडणुकीत जातीसाठी नाही तर आपल्या मातीसाठी मतदान करा, असं म्हणत एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना साथ देण्याचं जाहीर आवाहन मतदाराला केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या या विधानातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना देखील अप्रत्यक्षरित्या टोला हणाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्या चुकीसाठी पार्थला फासावर लटकवणार का? अजित पवार
माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल. इतर तालुक्यांप्रमाणेच सांगोला तालुक्यातूनही संजय शिंदेंना आघाडी मिळाली पाहिजे, अन्यथा तुमच्या डोक्यावर उरलेले केसदेखील राहणार नाहीत असा सज्जड दम, एनसीपीचे नेते अजित पवार यांनी एनसीपीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांना भर सभेत दिला.
6 वर्षांपूर्वी -
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ? अर्थात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना?
ईशान्य मुंबईतील उमेदवारी कुणाला द्यायची यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यावरून मोठं वादंग निर्माण झालं. खासदार किरिट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात शिवसेनेला यश देखील आले आहे. पण शिवसेनेने केलेल्या रडीच्या खेळामुळे ईशान्य मुंबईमध्ये युतीने स्वतःचेच हसू करून घेतले आहे. मात्र त्याचा फायदा एनसीपीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना होऊ शकतो, असे चित्र सध्या या मतदारसंघात निर्माण झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे भाजपला इतके का घाबरू लागलेत, जयंत पाटलांचा सवाल
उद्धव ठाकरे भाजपला इतके का घाबरू लागलेत, जयंत पाटलांचा सवाल
6 वर्षांपूर्वी -
उस्मानाबाद शक्तिप्रदर्शन: एनसीपीचे राणा जगजीतसिंह पाटील यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल
आज दसऱ्या टप्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्थानिकांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
पालघर नगरपरिषदेवर युतीला सर्वाधिक जागा, पण नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे
पालघर नगरपरिषद निवडणूकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. परंतु, नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला केदार काळे या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे नगरपरिषदेमध्ये युतीने झेंडा फडकावला असला तरी नगराध्यक्षपदी एनसीपीच्या उमेदवार विराजमान होणार. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यात येतो. यामध्ये मतदारांनी नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे यांना निवडणूक दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पहिला टप्पा; उमेदवारी अर्ज भरण्याची घाई आणि शक्तीप्रदर्शन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आजच्या पहिल्या टप्प्यात राज्यात नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची घाई दिसून येत आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह स्वतः मुख्यमंत्रीही अर्ज भरताना उपस्थित असणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
चेहऱ्यावर तलवारीनं वार करुन एनसीपीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या
एनसीपीच्या माजी नगरसेवकाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. परळी येथील उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड यांची पत्नी राष्ट्रवादीची नगरसेविका आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला राष्ट्रवादीकडून धक्का, आझम पानसरेंच्या पुत्राचा राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या आणि सर्वच पक्षांमध्ये दल बदल सुरु झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सपाटा सुरू असताना पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. भाजपाचे जेष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी एनसीपी’मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ठाण्यात मनसे-राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची एकमेकांवर रंगांची उधळण
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि धुलीवंदनाच्या निमित्ताने मनसे आणि राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेतेमंडळी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. सध्या शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटींनी राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असताना, दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या देखील या ना त्या निमित्ताने वाढताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
स्वतःच्या घरातला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं? राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयत्यावेळी पक्ष प्रवेश सुरु झाले आहेत. भाजपाकडे आजही निवडून येण्यासाठी इतर पक्षांतील उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांना गळाला लावण्याचा सपाटा भारतीय जनता पक्षाने लावला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं ठरलं, या दिवशी होणार लोकसभेचा निर्णय जाहीर
मुंबई : भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्या बरोबर सर्वच पक्षांची लगबग सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर आपल्या उमेदवारांच्या २ याद्या जाहीर देखील केल्या. परंतु १३ व्या वर्धापनदिनी राज ठाकरे मनसेचा लोकसभेबाबतचा निर्णय जाहीर करतील याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यात राज ठाकरे आघाडी सोबत जाणार कि स्वबळावर लढणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु मनसेला अपेक्षित असलेल्या ईशान्य मुंबई आणि कल्याणच्या जागेवर राष्ट्रवादीने आपले उमेदवार घोषित केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
युतीचे उद्योग म्हणजे लहानपणी पाहिलेला सर्कशीचा खेळ - रोहित पवार
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजप – सेना युतीवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या मते आजचे युतीचे उद्योग म्हणजे मी लहानपणी पाहिलेलं सर्कसच. “कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई म्हणून करायचे आणि भाजप शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकेच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता”, अशा शब्दात रोहित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
6 वर्षांपूर्वी -
सुजयला निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः स्विकारायला तयार होतो - अजित पवार
काल पुण्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी सुजय विखे पाटलांवर सनसनाटी आरोप केला. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः स्विकारायला तयार होतो, परंतु सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. सुजयला आता माझ्या समोर आणा, हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर - पार्थ पवार, अमोल कोल्हे, समीर भुजबळ यांना उमेदवारी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली आहे. सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघातून अपेक्षे प्रमाणे अखेर पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO