महत्वाच्या बातम्या
-
युवा स्वाभिमान पार्टीकडून नवनीत कौर राणांचा जोरात प्रचार
लोकसभा निवडणुकांच्या तारखा आणि आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अनेक पक्ष जोरदारपणे कामाला लागले आहेत. त्याअनुषंगाने अमरावतीच्या लोकसभा आखाड्यात सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणांचा लोकसभेच्या निमित्ताने जोरदार प्रचार सुरु असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
एका आठवड्यात तब्बल १८० जीआर; ह्याचा अर्थ गेल्या ५ वर्षात भाजपने झोपा काढल्या: जयंत पाटील
मागील केवळ एका आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १८० जीआर काढले. याचा अर्थ या सरकारने गेल्या ५ वर्षात झोपा काढल्या, अशा शब्दांत एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकावर बोचरी टीका केली आहे. ट्विट करुन जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, पण मोदींबद्दल काय विचार आहेत?
फडणवीसांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, पण मोदींबद्दल काय विचार आहेत?
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल - शरद पवार
२४ फेब्रुवारी रोजी “महाहिट २४ मराठी” या नवीन वृत्तवाहिनीच्या उदघाटन समारंभाला राज ठाकरे उपस्थित होते. कोल्हापूर येथे झालेल्या या वाहिनीच्या उदघाटन समारंभात राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना सध्याचं सरकार काय गैरप्रकार करत आहे याची उजळणी करून दिली. आणि या बातमीचा दाखला देत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले “राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल” आणि आता तसंच काहीसं घडलं आहे म्हणून त्यांनी केलेलं भाकित गंभीरतेने घ्यायला हवं.
6 वर्षांपूर्वी -
पवारांच्या गाडीच्या मागे धावणारे आज पवारांच्या ताफ्यात सामील, शिवबंधन तोडले
“स्वराज्य रक्षक संभाजी महाराज” फेम आणि जुने “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून माहित असलेले अमोल कोल्हे राष्ट्रवादीत दाखल. आज त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते, आणि आता शिवसेनेच्या दुटप्पी धोरणांना कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
6 वर्षांपूर्वी -
शिवेंद्रराजे व नरेंद्र पाटील यांच्यात मिसळ पे चर्चा! उदयनराजेंविरुद्ध रणनीती?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने वेगवेगळ्या रणनीती अवलंबण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात एनसीपीने विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर विरोधकांमध्ये जोरदार राजकीय वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. या विषयाच्या अनुषंगाने, शिवेंद्रसिंहराजे आणि भाजपाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील आज एकत्र मिसळ खाताना दिसल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.
6 वर्षांपूर्वी -
भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात, त्यामुळे बोलताना विचार करा: फडणवीस
काही दिवसांपासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभांमधून नरेंद्र मोदी यांना चांगलेच लक्ष करत, तिखट प्रहार केले आहेत. त्यामुळे त्यांची टीका भाजपच्या देखील जिव्हारी लागत आहे असं म्हणावं लागेल. विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून त्यांना सभेत नकलाकार आणावे लागतात आणि ती लोक पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची स्टाइल मारत फिरतात. पण मी या नकलाकारांना इतकंच सांगतो की तुम्ही सूर्याकडे पाहून थुंकले की थुंकी आपल्याच चेहऱ्यावर पडते, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे. छगन भुजबळ हे स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगात गेला. अजून तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, किती बोलावं आणि काय बोलावं याचा जरा विचार करा, असेही त्यांनी भुजबळांना सुनावले आहे.
6 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळ यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण
छगन भुजबळ यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण
6 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडे यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण!
धनंजय मुंडे यांचे संयुक्त प्रचार सभेतील संपूर्ण भाषण!
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या बैठकी नंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
राष्ट्रवादीच्या बैठकी नंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
6 वर्षांपूर्वी -
पुणे: नगरसेवकांची लायकी काढणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या थोबाडीत दिली
पुणे महानगर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांच्या देखतच चोप देण्यात आला आहे. नगरसेवकांच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून महापौर दालनात सदर घटना घडल्याचे वृत्त आहे. प्रभागातील जलपर्णी हटवण्याच्या गैरव्यवहाराबाबत विचारणा करत असताना संबंधित घटना घडल्याचे समजते. दरम्यान यावेळी स्वतः पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक देखील हजर होत्या. पुणे महापालिके’मध्ये भर दुपारच्या वेळी ही घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात देखील मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात यते आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्ता आल्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी करणार: जयंत पाटील
देशात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांनी कर्जत येथील जाहीर सभेत केली. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित मृत्यूनंतर उलटसुलट चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगली होती आणि त्यांची ईव्हीएममुळे हत्या झाली, असे हॅकरने म्हटल्यानंतर खळबळ उडाली होती.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात संजय दीना पाटीलांचे किरीट सोमैयांना मोठे आवाहन?
आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे यंदा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दीना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे किरीट सोमैय्या खासदार असून त्यांच्यापुढे संजय दीना पाटील हे तगडं आवाहन उभं करतील अशी शक्यता आहे. किरीट सोमैयांची मुख्य मतपेटी ही मुलुंडमधील गुजराती वस्ती असलेला भाग आहे, तर संजय दीना पाटील यांची मुख्य मदार ही भांडुप आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल.
6 वर्षांपूर्वी -
प्रतिष्ठित वकील उज्ज्वल निकम राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या आखाड्यात ? 'पॉवरफुल्ल युक्ति'(वाद)
महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि वजनदार वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे पॉवरफुल्ल युक्ति'(वाद) सुरू असल्याचं वृत्त आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये कायदेतज्ज्ञाना मोठं महत्व प्राप्त झालं आहे. मजीद मेमन यांच्यानंतर आणि त्याहूनही मोठं नाव म्हणजे उज्वल निकम. देशातील तसेच राज्यातील अनेक महत्वाचे खटले त्यांनी लढवले आहेत आणि हिंमतीने जवाबदारी पार पाडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील सरकारचा जन्मच मुळात अनैतिक संबंधांतून झाला आहे: उद्धव ठाकरे
भाजप-एनसीपीचे अनैतिक राजकीय संबंध खूप जुनेच असून राज्यातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात अशा अनैतिक संबंधांतून झाला आहे. केवळ अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त मोठ्या प्रमाणावर उफाळून आले इतकेच,’ अशी उपहासात्मक टीका टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उस्मानाबाद: शंभू महादेव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुंभारंभ, स्थानिकांसाठी वरदान
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने कळंब तालुक्यातील शंभू महादेव साखर कारखान्याच्या हंगामाचा शुंभारंभ करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सर्व साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालवले तर ग्रामीण भागाचे अर्थकारण कधीच कोलमडणार नाही आणि परिणामी कुठल्याने शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाहीत आणि शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केलं.
6 वर्षांपूर्वी -
ठाण्याच्या कचऱ्यावरच सत्ताधारी शिवसेना पोसली जात आहे: आनंद परांजपे
एनसीपीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ठाणे शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनात प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून ठाण्याच्या कचऱ्यावरच सत्ताधारी शिवसेना पोसली जात असल्याचा गंभीर आरोप ठाणे महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि एनसीपीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस आणि एनसीपी'ची लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवास्थानी आज सकाळी ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु, जवळपास अर्ध्या जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये जवळपास सहमती झाली असली तरी सुद्धा काही महत्वाच्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, उद्धवला सांभाळा! त्याचा अर्थ काल समजला: रोहित पवार
राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याची अजून एक नवी समोर येत आहे. होय! एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार आता सामनातील टीकेला उत्तर देण्यासाठी आणि काकाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार हे राजकारणातील टाकाऊ माल आहेत, अशी हलक्या भाषेतील टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंना रोखठोक प्रतिउत्तर दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळांना जीवे मारण्याचं धमकी पत्र
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त आहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर आम्ही तुमचा सुद्धा दाभोलकर, पानसरे करु असे धमकी पत्र भुजबळांना आल्याची बातमी आहे. भुजबळांच्या नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, एनसीपीच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवणार असल्याची माहिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO