महत्वाच्या बातम्या
-
सांगलीत राष्ट्रवादीचा भाजपला धक्का, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीत
सांगलीमध्ये राष्ट्रवादीने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमदार गाडगीळ आणि आमदार खाडे यांना धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे. कारण भाजपाचे जेष्ठ नगरसेवक धनपाल तात्या खोत आणि पत्नी सौ.सुलोचना खोत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवारांना निमंत्रित करून उपराष्ट्रपतींचे स्वागत पुणेरी पगडीने?
सध्या महाराष्ट्रात पगडी राजकारणाने जोर पकडल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यांचे स्वागत पुणेरी पगडी घालून करण्याचा निर्णय पुण्यातील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेतल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
महात्मा फुले यांच्या पगडीला शिवसेनेचा विरोध आहे का? राष्ट्रवादी
शिवसेनेने नुकतीच शरद पवारांच्या पगडी राजकारणावर सडकून टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणूनच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्नं केला आहे. शिवसेनेला प्रश्न करताना नवाब मलिक म्हणाले की, महात्मा फुलेंची पगडी म्हणजे समाजातील सामाजिक, शैक्षणिक विषमता दूर करणारा विचार आणि समतावादी विचारधारेच प्रतीक असल्याने त्याला शिवसेनेने विरोध करण्याचं कारण काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सब 'जाणकर' भी? जानकर म्हणतात बारामती मीच जिंकणार
आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष भाजपकडे लोकसभेच्या ६ आणि विधानसभेच्या ५० जागा मागणार असून, आमचं ध्येय राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सत्तेपासून रोखाने हेच ध्येय असल्याचे महादेव जानकर म्हणाले. यंदा बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि बारामतीची निवडणूक सुद्धा मीच जिंकणार असं सुद्धा महादेव जानकर म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
मोदींच्या हत्येचा कट रचल्याच्या बातम्या म्हणजे नवे सहानुभूती कार्ड : शरद पवार
मी जेव्हा एका सीआयडीच्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याशी बोललो तेव्हा त्यांनी माहिती दिली की, जेव्हा अशा प्रकारची धमकीची पत्रे येतात तेव्हा त्याची वाच्यता प्रसार माध्यमांमध्ये केली जात नाही. तर थेट सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती देऊन सतर्क केलं जातं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आलेली धमकीची पत्रं ही निव्वळ स्टंटबाजी आहे अशी थेट टीका त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत केली.
7 वर्षांपूर्वी -
ओबीसींच्या आरक्षणासाठी मी शिवसेना सोडली, शिवसेना अडचणीत?
पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना छगन भुजबळ यांनी भाषणा दरम्यान एक धक्का दायक खुलासा केला. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठीच मी शिवसेना सोडली. परंतु भुजबळांचा हा दावा शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणू शकतो अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. कारण त्याचा दुसरा अर्थ शिवसेनेचा ओबीसी आरक्षणाला विरोध होता का अशी कुजबुज उपस्थितांमध्ये सुरु होती.
7 वर्षांपूर्वी -
बाहेर तर आलो आता खायचं काय? बघतो तर खात्यात १५ लाख जमा: भुजबळ
काल पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला. त्याला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच हल्लाबोल यात्रेत कार्यकर्त्यांना संबोधीत केलं. मोदी सरकारच्या फसव्या घोषनांची भुजबळांनी चांगलीच खिल्ली उडविली.
7 वर्षांपूर्वी -
आज राष्ट्रवादीच्याच व्यासपीठावर भुजबळांची तोफ धडाडणार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ जवळजवळ दोन वर्षानंतर जामिनावर बाहेर आल्यावर ते नक्की काय भूमिका घेणार किंव्हा राष्ट्रवादीतच राहणार की दुसरा विचार करणार असे एक ना अनेक राजकीय तर्क राजकीय विश्लेषक लढवत होते. त्या तर्कवितर्कांना अखेर स्वतः छगन भुजबळ यांनीच उत्तर दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळेंच पाशा पटेल व प्रकाश आंबेडकरांना चोख प्रतिउत्तर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धी मिळत नाही अशा तिखट शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर आणि पाशा पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वतः शरद पवार निरंजन डावखरेंविरोधात आक्रमक
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार स्वतः निरंजन डावखरेंविरोधात मैदानात उतरले आहेत. निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र आहे. विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत निरंजन डावखरेंना धडा शिकवायचाच असा निर्धार राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सर्व विरोधकांना एकत्र आणण्यास आवडेल: शरद पवार
देशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला १० जागांपैकी तब्बल ९ जागांवर पराभव झाल्याने २०१९ मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्यास मला आवडेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
हे मंत्री दुपारचे झोपा काढतात, अजित पवारांची बापटांवर टीका
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मंत्र्यांवर सडकून टीका केली. हे असले मंत्री या वयात काय बोलावे ते कळत नाही अशा आमदाराला येथून निवडून दिले आहे. हे मंत्री दुपारचे झोपा काढतात, अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर कसबा विधानसभा मतदारसंघातीळ राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळेंचे तावडेंना आव्हान, मी काय खोटे बोलले ते सांगा?
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागे आरोप केला होता की, राज्यातील शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात आहेत. त्यालाच अनुसरून खासदार सुप्रिया सुळेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आव्हान दिल की,’शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे’.
7 वर्षांपूर्वी -
मी अजून एक तटकरेंच्या घराण्यातील उमेदवार शोधतोय: भास्कर जाधव
सध्या विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक लागत आहे. त्यामुळे मी अजून एक तटकरेंच्या घराण्यातील उमेदवार शोधतोय अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंवर केली आहे. तसेच ही कोकणातील राष्ट्रवादीमधील धुसपूस लवकरच चव्हाट्यावर येण्याची चिन्हं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भंडारा-गोंदियात फेरनिवडणूक घ्या, इव्हीएमसोबत छेडछाड: प्रफुल्ल पटेल
इव्हीएमवर आम्हाला भरवसा नाही, कारण या इव्हीएम मशिन्स सुरतवरून आणल्याने त्या व्यवस्थित आहेत की नाही याबाबतच आम्हाला शंका आहे. जगभरातील अनेक देशांनी विशेष करून युरोपिअन देशांमध्ये संबंधित निवडणूक आयोगाने इव्हीएमचा वापर सुरु केला होता. परंतु कालांतराने इव्हीएममधील त्रुटी समोर आल्या आणि त्यांनी पुन्हा मतपत्रिकांचा वापर सुरु केला होता असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
सायकलस्वारी, सुप्रिया सुळे व नेदरलंडच्या उपपंतप्रधान स्काऊटेन
बारामतीमधील सायकल वाटप करण्यात आलं त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली आणि ही सायकलस्वारी सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये भुजबळांची मदत एनसीपीला की सेनेला ?
आज विधानपरिषदेचे निकाल जाहीर झाले असून, त्यात नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावली असताना आणि भाजपने राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिला असताना सुद्धा शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे तब्बल २०० मतांनी विजयी ठरले आहेत. परंतु आता स्वतः नरेंद्र दराडे यांनी विजयामागे एनसीपीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मदत लाभली असा दावा केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
एनसीपीचे आमदार नरेंद्र पाटील सुद्धा भाजपच्या गळाला ?
आज निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. परंतु लवकरच राष्ट्रवादीचे अजून एक विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. आज निरंजन डावखरे यांना भाजप कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क एनसीपीचे आमदार तसेच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आले होते.
7 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद निकाल: भाजप २, शिवसेना २, एनसीपी १
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या ६ पैकी ५ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात भाजप २, शिवसेना २, एनसीपी १ असा निकाल लागला असून अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कराडांबाबत पवारांनी सांगितलेलं कारण खरं निघालं
रमेश कराड यांनी पंकजा मुंडेंना दुर्लक्षित करत राष्ट्रवादीत विधानपरिषदेच्या तोंडावर प्रवेश केला खरा, पण त्यांनी ५ दिवसात राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी उमेदवारी मिळून सुद्धा का पक्ष का सोडला याचे अनेक तर्क वितर्क जोडले गेले. काहींनी त्याचा दोष धनंजय मुडेंना सुद्धा दिला. परंतु काही दिवसांपूर्वी स्वतः शरद पवारांनी त्यामागे उमेदवाराची आर्थिक कुवत हे कारण दिल होत.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO