महत्वाच्या बातम्या
-
या निकालावरून भाजपच्या उद्याच्या, परवाच्या, अनेक वर्षांच्या राजकारणाच्या दाही दिशा स्पष्ट | दरेकरांना टोला
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार कुटुंबानं स्वप्नातलं सत्यात उतरवलं | म्हणून तर १०५ आमदार असून घरी बसावं लागलं
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का? अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “‘स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबानं उतरवलं आहे. तसं नसतं तर १०५ आमदार घेऊन चंद्रकांतदादांना घरी बसावं लागलं नसतं,’ असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (२८ नोव्हेंबर) पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जातील. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी धर्म | चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनीच हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं | त्यांनीच लेखिकेची नेमणूक केली - राष्ट्रवादी
मागील वर्षी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनं राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का बसला होता. केवळ ३ दिवस टिकलेल्या या सरकारच्या स्थापनेमागील इनसाईड स्टोरी लेखिका प्रियम गांधी यांच्या पुस्तकातून समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना कधीही टरबुज्या म्हटलेले नाही | पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा असा होतो
“देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचारार्थ आज पुण्यात यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५’वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
4 वर्षांपूर्वी -
पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण
राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. तर ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर केले जातील. निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आज (१२ नोव्हेंबर) आहे. उद्या (१३ नोव्हेंबर) आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे.
4 वर्षांपूर्वी -
देवाच्या काठीला आवाज नसतो | पण दणका जबरदस्त बसतो - रुपाली चाकणकर
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगरमधील भाजपचे अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत | राष्ट्रवादीचा पक्षविस्तार
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. मुक्ताईनगमध्ये अनेक भाजप पदाधिकारी राष्ट्र्वादीत प्रवेश करत असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढू लागली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्र्वादीने पक्ष विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढविण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीत इनकमिंग | काँग्रेस नेते काका कुडाळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीने मित्रपक्ष काँग्रेसला धक्का दिलाय. कोकण काँग्रेसचे नेते तसंच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Kaka Kudalkar join NCP) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं. त्यानंतर आज काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा | आ. मिटकरींचा टोला
“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, असा बोचरा सवाल राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करत अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज (२० ऑक्टोबर) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान नेमके काय बोलणार ? कोणती मोठी महत्त्वाची घोषणा करणार ? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. दरम्यान, पंतप्रधानांच्या याच संबोधनानंतर अमोल मिटकरींनी भाजपवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमच्या राज्याबद्दल कोणीही काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का | प्रफुल पटेल यांचा संताप
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये संपूर्ण देशातून लोक येऊन वास्तव्य करत असतात. लोकांना तिथे आपलं घर निर्माण करुन वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीये का ? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत केली आहे. राज्यातील करोना स्थितीवर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे कंगनाच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं. आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का ? असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी विचारला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबातील ३ सदस्यांचा एका महिन्यात मृत्यू
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भिवंडीतही वाढला आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला असला तरी कोरोनाने भिवंडीतील वडूनवघर येथील चौघुले परिवारावर घाला घातला आहे. एका महिन्याच्या आत परिवारातील तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत | अजित पवार आणि जयंत पाटलांवर जवाबदारी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. राजकीय मैदानावर बॅटिंग करताना कोणता चेंडू कधी टाकायचा आणि फिरकी घ्यायची हे ते उत्तम जाणतात. ते जे बोलतात त्याविरुद्ध करतात. विधानसभा निवडणुकीवेळी ज्याप्रमाणे भाजपने ऑपरेशन कमळद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात घेतले आणि पाच-दहा नेते सोडता अख्खी राष्ट्रवादी खाली झाली. तेच सूत्र आता शरद पवार आखत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
4 वर्षांपूर्वी -
उलट भाजपमध्ये गेलेले आमदारच पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर - नवाब मलिक
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षात येण्यासाठी आतूर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधाक दोन्ही एकमेकांचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आलेले आहेत. त्यातच आता नवाब मलिक यांनी आणखी एक दावा केल्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा कोण कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नगरसेवकाचं निधन
पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आणखी एका नगरसेवकाचं आज निधन झालं आहे. जावेद शेख असं आज निधन झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. शेख हे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही परिचित होते.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास फोडाफोडी? शिवसेनेचे ५ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीकाल भेट घेतली होती. महाविकासआघाडीतल्या नाराजीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काल पार पडली. लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये नाराजी पसरल्याने आणि राज्य अधिकारीच चालवत असल्याच्या भावनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेवर नाराज असल्याने काल बैठका देखील पार पडल्या.
4 वर्षांपूर्वी -
वंचित पक्षातील माजी आमदार बळीराम शिरस्कर व हरिदास भदेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
महाराष्ट्र किनारपट्टीला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका असतानाच राजकीय वादळही पाहायला मिळाले. ‘वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश उपाध्यक्षाला ५० कोटीच्या खंडणी प्रकरणात अटक
पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना काही दिवस आधी समोर आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC