महत्वाच्या बातम्या
-
आज देवळं बंद झालीत, पण खरं देवत्व सिद्ध करणाऱ्या पोलिसांना सलाम...कोणी म्हटलं?
कोरोनाबाधित रुग्णांची राज्यात आज मोठी वाढ झाली नसली तरीही पुणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आथा ४१ एवढी झाली आहे. त्यात २७ पुरूष आणि १४ महिला असे ४० करोना पॉझिटिव्ह रूग्ण असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यासंदर्भात अधिकृत ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल खंडणी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात
पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविणार असल्याचे सांगितले जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिर निर्माणासाठी महाविकास आघाडीचा पाठींबा – मंत्री हसन मुश्रीफ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
5 वर्षांपूर्वी -
आमदार विद्या चव्हाण यांना सुनेकडून प्रत्युत्तर, विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान विद्या चव्हाण यांनी सुनेचे विवाहबाह्य संबध असल्याचा आरोप केला आहे. यावर विद्या चव्हाण यांची सून पुढे आली असून त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपले विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा मी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा विद्या चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी माझ्याविरोधात पुरावे गोळा करुन बदनामी करण्याची धमकी दिली होती. आता त्यांनी नेमकं तेच केलं आणि माझ्याविरोधात कट रचला, असा आरोप विद्या चव्हाण यांच्या सुनेनं केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विद्या चव्हाण यांचा सूनेवरच विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप
नातू हवा म्हणून सुनेचा छळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, आमदार विद्या चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. ‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेनं आरोप केले आहेत. कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती असं वागत असून न्यायालयात खरंखोटं सिद्ध होईल,’ असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्व मोदी भक्तांनी सुद्धा सोशल मीडिया सोडावा म्हणजे देश शांत होईल - नवाब मलिक
भाजपच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचे आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम आणि यू-ट्युब सोडण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करेन असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
टीकेची पातळी घसरली; मिटकरींकडून पोंक्षेवर थेट आजारपणावरून बोचरी टीका
दोन दिवसांपूर्वी ‘मी सावरकर’ या कार्यक्रमासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये मोठी गर्दी उसळली होती. अभिनेते शरद पोंक्षे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांनी पोंक्षे यांचा निषेध केला होता. ‘देश गोडसेवादी की गांधीवादी’, ‘गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध’, असे फलक घेऊन विद्यार्थी आपला निषेध नोंदवत होते. त्यावेळी स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्या सर्वांना नंतर ताब्यात घेतले होते.
5 वर्षांपूर्वी -
पोंक्षे! म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय; पण तुमची हलकट..? काय म्हणाले मोटकरी?
दोन दिवसांपूर्वी ‘मी सावरकर’ या कार्यक्रमासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये मोठी गर्दी उसळली होती. अभिनेते शरद पोंक्षे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांनी पोंक्षे यांचा निषेध केला होता. ‘देश गोडसेवादी की गांधीवादी’, ‘गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध’, असे फलक घेऊन विद्यार्थी आपला निषेध नोंदवत होते. त्यावेळी स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्या सर्वांना नंतर ताब्यात घेतले होते.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवार, फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी; कोणाचा पत्ता कट?
राज्यसभेवर रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आधीच निश्चित आहे. आता त्यांच्यासोबत असलेले माजीद मेमन यांना डच्चू देण्यात येणार आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री फौजिया खान यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
भीमा कोरेगाव प्रकरणातील ३४८, मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे मागे
कोरेगाव-भीमा प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले असून मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे घेण्यात आल्याचं सांगतानाच शेतकरी आंदोलनातील गुन्हेही लवकरच मागे घेण्यात येतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच आपल्याविरोधीतील बाजू असणाऱ्यांना तत्कालीन फडणवीस सरकारने शहरी नक्षलवादी संबोधल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसेच या प्रकरणातील इतरही अनेक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना अटक
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी अशा एकूण ५०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत विक्रोळी पश्चिमेकडील कैलास कॉम्प्लेक्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. अकोला पाठोपाठ राज्यातील महत्वाच्या अशा मुंबई आणि उपनगरांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक बंड केल्यानं ‘वंचित’ला हा मोठा हादरा बसल्याचं मानलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
भिवंडी: राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात दोन पदाधिकारी आव्हाड यांच्या समोरच भिडले
एनसीपी’चे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नागरी सत्कार कार्यक्रम भिवंडी तालुक्यातील महापोली येथे आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एनसीपी’चा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांच्या या नाट्यमय वादावर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त करत मला अंधारात ठेऊन काही करू नका, असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला. या कार्यक्रमात एनसीपी’चे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ व एनसीपी’चे ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यात कार्यक्रमाच्या स्टेजवरच बाचाबाची सुरु झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
त्यावेळी बाजूला गर्दी असल्याने मला हात उचलता आला नाही: मंत्री नवाब मलिक
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर २ वर्षापूर्वी गेलो होतो, त्यावेळचा हा व्हिडिओ आहे, मात्र भाजपच्या ग्रुपमधून हा व्हिडिओ व्हायरल करुन माझी बदनामी करण्यात येत आहे असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली होती.
5 वर्षांपूर्वी -
आमचे असंख्य मुस्लिम बांधव महाराजांचा जय जयकार करतात; पण मलिकांचं? व्हिडिओतून प्रश्न उपस्थित
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मनसेच्या महामोर्चावरून टीका करताना मनसेला गांधीवादाचा डोस पाजले होते. तसेच मनसेच्या भूमिकेवर देखील टीका करताना कायदा सुव्यवस्था आणि धार्मिक मुद्यावरून राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र आता तेच मंत्री नवाब मलिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार भीमा-कोरेगावचा समांतर तपास करणार, लवकरच SIT
महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरलेलं भीमा-कोरेगाव हिंसाचार व एल्गार परिषदेच्या तपासाचं प्रकरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडं देण्यास मान्यता दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनंही समांतर पातळीवर करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंमत असेल तर भाजपने आता लोकसभा निवडणूक घेऊन दाखवावी: नवाब मलिक
भारतीय जनता पक्षाच्या राज्यव्यापी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. त्याला आता राष्ट्रवादीने उत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि फडणवीसांवर सडकून टीका केलीय. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे,दिवसभर सत्तेत कसा येऊ याचा विचार करतात, रात्री स्वप्न पडतात अशी टीका त्यांनी केलीय. हिंमत असेल तर भारतीय जनता पक्षाने लोकसभेची निवडणूक घेऊन दाखवावी असं आव्हानही त्यांनी दिलं.
5 वर्षांपूर्वी -
..तर भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी करून काँग्रेसला वेगळं करतील? सविस्तर वृत्त
आजच्या महाविकास आघाडीच्या खेळात शिवसेनेला राष्ट्रवादी त्यातुलनेत पूरक असली तरी भविष्यात थेट काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना-राष्ट्रवादी इतर छोटे पक्ष ज्यामध्ये समाजवादी पक्ष तसेच आंबेडकरी विचारांचे गट एकत्र येतील अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषक आजही व्यक्त करतात. शिवसेनेला विधानसभेत मिळालेली एकूण मतं ही १ कोटी २५ लाखाच्या घरात आहेत तर राष्ट्रवादीला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९२,१६,९११ असून मतांची टक्केवारी १६.७१ इतकी आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९०,४९,७८९ असून मतांची टक्केवारी १६.४१ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; स्थानिक सेनेत प्रचंड नाराजी
काही महिन्यांवर आलेली औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र लढविणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः शिवसेनेचे विधानपरिषदचे आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्याच अनुषंगाने बैठेका देखील सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
फुकट सेवा? सरकारला खरंच 'डेटा यूटिलिझेशन आणि डेटा सेक्युरीटी' हे विषय कळतात का? सविस्तर वृत्त
पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या मुलाच्या कंपनीने मुंबई पोलिसांसाठी अत्याधुनिक पेपरलेस अशी ‘डिजिटाईज्ड नोटशीट प्लस’ प्रणाली मोफत उपलब्ध करून दिली आहे. काही तांत्रिक कारणामुळे ही प्रणाली अद्याप कार्यान्वित झालेली नाही. मात्र विद्यमान पोलीस आयुक्तांच्या मुलाच्या कंपनीला हे काम मंजूर करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी यात नियमबाह्य़ काहीच नाही, अशी प्रतिक्रिया संजय बर्वे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय