महत्वाच्या बातम्या
-
जितकं काम तितकाच पगार असावा; असा एखादा निर्णय होणे गरजेचे: अमोल मिटकरी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर एकीकडे कर्मचारी आनंद व्यक्त करत असतानाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या निर्णयावर निशाणा साधला आहे. ‘पाच दिवसांचा आठवडा मग कर्मचाऱ्यांना ७ दिवसांचा पगार का द्यायचा?’ असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मलिकांचे मनसेला गांधीवादाचे डोस; भावाच्या हात-पाय तोडण्याच्या भाषेकडे दुर्लक्ष केलं होतं
पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला काल पार पडला. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी झाल्याच पाहायला मिळालं. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.
5 वर्षांपूर्वी -
सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापतीची धारदार शस्त्राने हत्या
सांगली जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या खुनाचं सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या एका हत्येचा उलगडा होत नाहीत तोच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची हत्या झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते. देशींग इथं अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. राजकीय वैमनस्यातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली: जे कार्ड राज्यात चाललं नाही ते दिल्लीत काय चालणार? राष्ट्रवादीकडून खिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात असून, राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीत ठाण मांडून आहे. तर याच मुद्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात चाललं नाही ‘ते’ दिल्लीत काय चालणार, असा खोचक टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मला पटतय, आपल्याला पटतय ना ? तिथीचा हट्ट सोडा - अमोल मिटकरी
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी ही जाहीर करावी आणि तिथीचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी सोडावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. मला पटतय, आपल्याला पटतय ना..?, असं अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ट्विटसोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यावर तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जीजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुपडा साप करायला वेळ लागणार नाही
माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बबनराव लोणीकर महिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. दरम्यान, लोणीकर यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकविण्यात भाजपचे जवळचे लोक: गृहमंत्री
कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकविण्यात भारतीय जनता पक्षाच्या जवळचे लोक होते, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. अशा लोकांचे पितळ उघडे पडेल या भीतीनेच एनआयएची चौकशी लावली असे देशमुख यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या हिंसाचार प्रकरणी राज्य व केंद्र सरकारमध्ये गेले काही दिवस तणातणी सुरू आहे. देशमुख म्हणाले, या हिंसाचारामागील वास्तव समोर यावे म्हणून खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. त्यावर काही कार्यवाही होण्याआधी केंद्राने एनआयए चौकशीचे आदेश दिले. राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी केली असती तर या भाजपच्या विचारांविरुद्ध बोलणाऱ्यांची नावे हिंसाचार प्रकरणात गोवल्याचे उघड झाले असते.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत भाजपाला खिंडार पडणार; १५ नगरसेवक राष्ट्रवादी-शिवसेनेत प्रवेश करणार
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नवी मुंबईत गणेश नाईक यांना पक्षात आणून संपूर्ण शहरात शिवसेनेला एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे सध्या नवी मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये शिवसेना सत्तेच्या जोरावर पक्ष विस्तार करण्याची योजना आखात आहे आणि त्यात नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने त्याला प्राधान्य दिल आहे.
5 वर्षांपूर्वी -
चोरांच्या टोळीत बसलाय की काय...म्हणून बुट हातात घेऊन भाषण? - रुपाली चाकणकर
पक्षांतर्गत निर्माण झालेली खदखद आणि ‘माधव’ सूत्राच्या भोवती फिरणारी राजकीय अपरिहार्यता यातून सोमवारी औरंगाबाद येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलनास जलसमस्यांचे आवरण देण्यात भाजपच्या नेत्यांना यश आल्याचे दिसून आले. हे उपोषण गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने घेण्याचे पूर्वी पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्यावतीने हे उपोषण असल्याचे सांगितले आणि सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पक्षाचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला.
5 वर्षांपूर्वी -
मरणारा मासा तडफडतो, हे पुन्हा एकदा दिसलं; रुपाली चाकणकरांची मोदी सरकारवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली असून सुरक्षा हटवण्याआधी केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असं सांगण्यात येत आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात होते.
5 वर्षांपूर्वी -
'युवराजांचा' नाईट लाईफचा हट्ट पुरविण्यास राष्ट्रवादी सज्ज? स्वतःची पोस्टरबाजी आज अंगलट
मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाकडे संख्याबळाचं नसल्याने संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे बीड विधानपरिषदेवर राष्ट्रवादीच्या तिकीटावर संजय दौंड बिनविरोध निवडून आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
जाणत्या राजाचे सैनिक की मुंबईचे नवाब? कप्तानगिरीत कामगारांचे हातपाय तोडण्याची भाषा
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जवळपास एक महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या प्रभागात वर्क ऑर्डरशिवाय काम सुरु असल्याचं लक्षात आल्यानंतर कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली. तसेच कामगारांना हात पाय तोडण्याचीही धमकी दिली. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांवर आधी कारवाई करा: जयसिंह मोहिते पाटील
जिल्हा परिषदेतील मोहिते पाटील गटाच्या ६ सदस्यांवर कारवाई केल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला खरमरीत उत्तर दिलं आहे. ‘रात्रीच्या अंधारात भारतीय जनता पक्षासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावरही राष्ट्रवादीने कारवाई करावी,’ असं खुलं आव्हान मोहिते पाटलांनी दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
तर राज्य सरकार न्यायाशीध लोया मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करू शकते: गृहमंत्री
नागपूरमधील जस्टीस लोया मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. जर ठोस पुरावे असतील अन् कुणी तशी तक्रार केल्या, राज्य सरकार न्यायाशीध ब्रिजगोपाल हरीकिशन लोया मृत्यूप्रकरणाचं रि-इन्व्हेस्टीगेशन करू शकते, असे देशमुख यांनी सांगितले. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर ZP: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विजयी
अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या आठवड्याभराच्या आतच देशमुख कुटुंबात डबल धमाका झालेला आहे. अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सलील देशमुख नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
5 वर्षांपूर्वी -
नाराज आमदारांचे वेगवेगळे आकडे दाखवून प्रसार माध्यमंच संभ्रम पसरवत आहेत? सविस्तर वृत्त
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नाराजांनी मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढल्याच्या कपोकल्पित बातम्या पेरण्याचं पेव सध्या प्रसार माध्यमांमध्येच आल्याचं पाहायला मिळत आहे. वास्तविक मंत्रिमंडळ वाटपापूर्वी आणि नंतर लॉबिंग तसेच नाराजीनाट्य काही नवा विषय नाही. शपथविधीच्या दिवशी खासदार संजय राऊत यांचा नाराजीनाट्याच्या वृत्तानंतर त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली असताना देखील त्यांच्या ट्विटरवरील पोस्टवरून भलतेच चित्र रंगविण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळ विस्तार; राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार संधी
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांनी आता माजी मुख्यमंत्र्यांना धीर द्यायला हवा: रुपाली चाकणकर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यात सत्तापालट झाल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमृता फडणवीस यांनी वारंवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना, ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’ अशी घणाघाती टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोहिते-पाटलांचा भाजपाला धक्का; पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, बुधवारी पुण्यात होणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. राज्यातील सत्तास्थापनेनंतर दोन्ही नेते पुण्यातील व्यासपीठावर पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याने सर्वांचंच लक्ष लागून होतं. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे पहिल्यांदाच मांजरी येथील ‘व्हीएसआय’ला येत असल्याने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत ते कोणती भूमिका घेणार, यावर चर्चा रंगली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम