मोदींनी उद्घाटन केलेल्या नव्या संसद भवनाची इमारत करताना गुजरातमधील कॉपी कॅट आर्किटेक्टने सोमालियाच्या जुन्या संसदेची नक्कल केली
New Parliament Building | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हावे, या मागणीसाठी अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. नव्या संसद भवनाच्या डिझाइनबाबतही राजदने वादग्रस्त ट्विट केले होते. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी संसदेच्या नव्या इमारतीबद्दल सांगितले की, त्याचे डिझाइन आफ्रिकन देश सोमालियाच्या जुन्या संसदेपासून कॉपी करण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी