महत्वाच्या बातम्या
-
निलेश राणे रामदास कदमांना म्हणाले, आज तुम्हाला शिवी घालणार नाही!
“रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले,” अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम नाराज असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना निलेश यांनी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गरीब संजय राऊतांना अगोदर कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या: निलेश राणे
राज्यात सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेतील वाद आता चिघळला आहे . लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेळेवेळी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आता राऊतांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटवरुन जोरदार टीका केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
YouTube आणि Tik-Tok चा मुख्यमंत्री करून टाका त्याला: निलेश राणे
राज्यात सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेतील वाद आता चिघळला आहे . लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेळेवेळी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आता राऊतांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटवरुन जोरदार टीका केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कणकवलीतून नितेश राणे विजयी; सेनेचे सतीश सावंत यांचा पराभव
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. युतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं असलं तरी महाआघाडीने देखील चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
चार हाडांचा BMC चोर आज कोकणात आला होता आणि परत गेला: निलेश राणे
माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका करत चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता असा टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांची बुधवारी कणकवलीत प्रचारसभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मित्राच्या घरी चोर शिरल्याने भाजपाला सावध करायला आलो आहे अशा शब्दांत राणे यांच्या कुटुंबावर हल्ला केला होता. आमची लढाई भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाही, तर या परिसरातील खुनशी प्रवृत्तीविरुद्ध आहे असंही यावेळी त्यांनी म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला; नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही: निलेश राणे
प्रसार माध्यमांनी माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला, नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. पण ज्या दिवशी शिवसेना राणेसाहेबांची बदनामी थांबवेल, तेव्हा माझा आणि शिवसेनेचा विषय संपेल, अशी भूमिका माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी बंधू नितेश राणे यांनी दाखवली असतानाच निलेश राणे यांनी ट्विटरवरुन असहमती दर्शवली होती.
5 वर्षांपूर्वी -
सेनेला दुर्लक्षित करत भाजप नारायण राणेंचा २ ऑक्टोबरला पक्ष प्रवेश करून घेणार
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांच्या प्रहार या दैनिकाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युती होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई येथे घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात युती होणारच यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शिवसेनेचा नारायण राणे यांच्या प्रवेशाला होणारा विरोध देखील निवळल्याचे दिसते. १ ऑक्टोबरपर्यंत युती आणि जागावाटपाची घोषणा होणार आहे. त्यानंतर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करतील.
5 वर्षांपूर्वी -
आ. नितेश राणे भाजपाकडून विधानसभेच्या आखाड्यात; भाजपने सेनेला विचारलंच नाही
शिवसेना-भाजपमध्ये काहीही ठरो, पण माझा भाजपमध्ये प्रवेश नक्की आहे, असं सांगत मुंबईतच भाजपमध्ये प्रवेश व्हावा, अशी इच्छा, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली. त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे हे भाजपमधूनच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: नारायण राणे कुडाळ-मालवणमधून लढणार: आमदार नितेश राणे
राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदारपणे कामाला लागले आहेत. त्यात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्याबाबत स्वतः आमदार नितेश राणे यांनीच भाष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आ. नीतेश राणे यांच्या आंदोलनाचा दणका; रस्त्याच्या कामाला जोरात सुरुवात
रस्त्यांवर खड्डे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याच्या अंगावर बादली भरून चिखल ओतल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान २-३ दिवसातील नाट्यमय घडामोडीनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला देखील आक्रमक आंदोलनावरून अप्रत्यक्ष टोला लगावला होता.
6 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांकडे ऊ.ठा'सारखे मावळे असते तर ते कधीच यशस्वी झाले नसते
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांनी आरक्षण वैध ठरल्याच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. दरम्यान त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मराठा-मराठेतर वाद विसरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून एकत्र या असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केले. मात्र उद्धव ठाकरेंचा हा प्रयोग म्हणजे विधानसभा निवडणुकीत फायदा उचलण्यासाठी केलेला खटाटोप अशी जोरदार चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. ज्यावर आता नीलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून बोचरी टीका टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्या असल्याने उद्धव ठाकरेंनी असे वक्तव्य केले. जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे उद्धव ठाकरेंसारखे मावळे असते तर तर महाराज कधीच यशस्वी झाले नसते. महाराजांनी उद्धव ठाकरेंना टकमक टोकावरून खाली फेकले असते अशी खोचक टीका नीलेश राणे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे म्हणून आ. नितेश राणे यांच्याकडून कॅव्हेट दाखल
मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे भाष्य केले होते. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी देखील मराठा आरक्षणावरून पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. स्वतः नारायण राणे यांनी आघाडी सरकार सत्तेत असताना त्याचा मसुदा तयार केला होता. दरम्यान मराठा आरक्षणाच्या निर्णयाच्या विरोधात एकतर्फी स्थगिती मिळू नये यासाठी आमदार नितेश राणे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे यासाठी आमदार नितेश राणे सज्ज झाले असून शनिवारी त्यांनी कॅव्हेट दाखल केले.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार: निलेश राणे
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतात शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसविण्याचे भाष्य केले होते. त्याला अनुसरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
खंबाटातील ४०० कोटींच्या भ्रष्टाचारात विनायक राऊतांचा हात
बहुचर्चित तब्बल ४०० कोटींचा भ्रष्टाचार करून एका रात्रीत सर्वाधिक म्हणजे एकूण २७६३ कामगार तसेच त्यांच्या तब्बल दहा ते अकरा हजार कुटूंबियांना रस्त्यावर आणणा-या खंबाटा एव्हिएशन कंपनीतील घोटाळय़ाचा खरा सूत्रधार, या कंपनीचा निरव मोदी हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत असून बहुतांश कोकणातील कामगार असलेल्या या खंबाटातील भ्रष्टाचारातुन विनायक राऊत यांनी कोकणी माणसाचीच फसवणूक केली आहे असा धक्कादायक आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे प्रचारात, तर मुंबई पूल दुर्घटनेतील जखमींची आमदार नितेश राणेंकडून विचारपूस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडणारा पूल कोसळून ६ जण ठार तर ३४ हून अधिकजण जखमी झाल्याची दुर्घटना गुरुवारी घडली होती. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी आमदार नितेश राणे यांनी स्वतः जखमींची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
6 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा; माजी खासदार निलेश राणे राष्ट्रवादीकडून लढणार?
सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा काँग्रेसने एनसीपीला द्यावी आणि एनसीपीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी, असा नवीन प्रस्ताव समोर आला आहे. सदर जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडली तर जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावी, असा देखील प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
काही लुख्खे सांगत होते की निलेश राणेला रायगडात येऊ देणार नाही, मी तर आलो
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तसेच माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘सगळेच शिवसैनिक वाईट नाहीत, पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेशच दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील सुद्धा: निलेश राणे
भारतातील निवडणूक रणनीतीकार आणि जेडीयू’चे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट काल मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकण: पावसमधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश
माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे पावस जिल्हा परिषद गट टाकलेवाडी तसेच रत्नागिरी शहरातील वॉर्ड क्रमांक २८ मधील राजीवडा मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.
6 वर्षांपूर्वी -
आता डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी मुंबई नाइट लाइफची मागणी देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार पुन्हा चालू झाले, अशी बोचरी टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल