अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद, महिला सुरक्षेसोबत दगा, महिला सुरक्षा निर्भया फंडाच्या पैशांमधून शिंदे गटाच्या मंत्र्यांची सुरक्षा
Nirbhaya Fund | राज्यातील निर्भया पथकासाठी खरेदी करण्यात आलेली वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर येताच विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार आदित्य ठाकरेंनंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या मुद्यावरून शिंदे सरकारला लक्ष केलं आहे. हा अत्यंत नीच प्रकार असल्याचे ते म्हणाले. ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
2 वर्षांपूर्वी