महत्वाच्या बातम्या
-
कोर्ट नोटिसची धमकी देऊन दबाव आणताय का | असल्या धमक्यांना मी घाबरत नाही - नितेश राणे
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषद घेत नितेश राणेंवर पलटवार केला होता. तसेच नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असेही वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
IPL सट्टेबाजार, खंडणी आणि सचिन वाझे | नितेश राणेंचे वरुण सरदेसाईंवर गंभीर आरोप
नितेश राणे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
5 वर्ष नितेश राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळलो म्हणून शिवसेनेत प्रवेश | 7 नगसेवकांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे सोमवारपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्गात ७० पैकी ५५ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या |आमदार नितेश राणेंची माहिती
कणकवलीत निकाल जाहीर होताच राणेंना धक्का असल्याच्या बातम्या चालू लागल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केलाय. नितेश राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि येणार पण नाही, ७० पैकी ५५ ग्रामपंचायती आम्ही म्हणजेच भाजपने जिंकल्या आहेत, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा राणेंना धक्का | कणकवलीतील ३ पैकी दोन ग्रामपंचायतींवर भगवा
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही ऐकलंय की तो मंत्रालयातील फाइल्सवर ज्याप्रमाणे नियंत्रण ठेवतोय | त्यासाठी त्याला...
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा मुंबई पोलिसांनी अहवाल दिल्यानंतरसुद्धा ही त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांसोबतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते...कारण | शिवसेनेचा गौप्यस्फोट
भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातलेला आहे. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भारतीय जनता पक्षाला शरण गेले,” असा धक्कादायक गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. “या गुन्ह्यात माजी मुख्यमंत्री फडणवीस नितेश राणेंना तुरुंगातही टाकणार होते,” असा दावाही त्यांनी राऊत यांनी केला आहे. राज्याच्या राजकारणात विनायक राऊत यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चा सूरू होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED Vs Shivsena | वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत असल्याने मोर्चा
प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिशा कायद्याचे नाव बदलून शक्ती करण्यात आले | आता निवडक गुन्ह्यांसदर्भातच कारवाई नको
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक तयार करण्यास आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची तसेच महिलांना आणि मुलींना समाज माध्यमांवरून त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
ठीक आहे आम्ही कमी पडलो | पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा - आ. नितेश राणे
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक पार पडली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला हार पत्करावी लागली आहे. यावरुन राजकीय वर्तृळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. एकीकडे राषअट्रवादी आणि कॉंग्रेस जल्लोष करत आङेत तर दुसरीकडे भाजप हार झाल्याने पुढे काय या प्रश्नात आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने जरी स्वत:ची हार स्वीकारली असली तरी शिवसेनेला आणि ठाकरे सरकारला टोला लगावणे बंद केले नाही आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचं भुयारी गटार कलानगरकडे जातं - आ. नितेश राणे
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं छापेमारी सुरु केली आहे. सरनाईक यांच्या दोन्ही पुत्रांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईवरुन शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिवसेनेच्या आरोपांना भाजपकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यानंतर आमदार नितेश राणे यांनीही सरनाईकांवर झालेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेंग्विन आणि कंगनाच्या खटल्यासाठी मुंबईकर कर भरतात | आता काय शिल्लक आहे
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातलाय का | आ. नितेश राणेंचा हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. “तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का?,” असा सवाल ठाकरे यांना केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागतात - आ. नितेश राणे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे (Agra Mughal Museum) नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असं ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर भाजपचे आमदार नितेश राणे आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास ट्विट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई असो कि महाराष्ट्र | ब्रँड एकच | छत्रपती शिवाजी महाराज - आ. नितेश राणे
अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावरून आता मूक मोर्चे नाही | संघर्ष अटळ | आ. नितेश राणे आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक पार पडली. दोघांमध्ये सुमारे पाऊण तास झाली बैठक झाली. मराठा आरक्षणासंदर्भात आलेल्या निर्णयावर चर्चा झाली.
4 वर्षांपूर्वी -
कायदा सर्वांना समान | पालिकेची टीम शाहरुखच्या मन्नतवर जाईल का - आ. नितेश राणे
आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
4 वर्षांपूर्वी -
मोहिमेला माझे कुटुंब, माझी जबाबदारी नाव योग्य | ते फक्त त्यांच्या कुटुंबाचीच जवाबदारी घेतात
महाराष्ट्रातील जनतेच्या जनजागृतीसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना दोन टप्प्यात राबवली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. ही योजना दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी या योजने अंतर्गत केली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
माहितीप्रमाणे CBI'कडे ८ जूनचे मोबाइल टॉवर लोकेशन समोर आले आहेत | अब तो गयो
सीबीआयकडून मंगळवारी रियाची चौकशी होणार नसल्याचं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आज म्हणजेच मंगळवरी रिया सीबीआय चौकशीसाठी जाणार नाही. तर, याऐवजी रियाची आई, वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलवलं आहे. ज्यामुळे रियाचे आई-वडील DRDO गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी हजर झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही | पण त्यांच्या इन्स्टापोस्टवर ती लाईक करते
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजूपत याच्या आत्महत्येनंतर देशभर वादळ निर्माण झालं. सुशांतच्या कुटुंबासह भाजपने या प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. महाराष्ट्र सरकारमधील एका युवा मंत्र्यांच्या दबावामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणात योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची भेट झाली का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता याप्रकरणी रिया चक्रवर्तीने खुलासा केला होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल