महत्वाच्या बातम्या
-
निसर्ग वादळची नुकसान भरपाई अजून पूर्ण मिळाली नाही | आता महाड इमारतीच्या मदतीची घोषणा
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पीएमओकडून ट्विट करुन दुर्घटनेत जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना केली आहे. महाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी अतिशय दु:ख आहे. स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाकडून या दुर्घटनेठिकाणी बचावकार्य सुरु आहे. यासाठी सर्व शक्य ती मदत केली जाणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळात अनेक युवा नेते | पण सेनेचे मंत्रीच आदित्य ठाकरेंचं नाव घेत आहेत - आ. नितेश राणे
पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. भाजपाच्या नेत्यांनीही युवा मंत्री असं म्हटलं आहे. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असं वाटत असल्याचं आश्चर्य आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काही दिवस सामना अग्रलेखचे विषय | मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म, मराठी माणूस
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वपूर्ण निकाल दिला. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
5 वर्षांपूर्वी -
स्वप्नालीची शिक्षणाची तळमळ | आ. नितेश राणे तिच्या हॉस्टेलच्या मदतीसाठी पुढाकार घेणार
मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर अडथळे फारच शुल्लक ठरतात. संकटावर मात करत आपल ध्येय गाठण्याची महत्त्वकांक्षा इतिहास घडवून जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम गावातील एका तरुणीने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. गावात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे सध्या ही तरुणी जंगलात, डोंगरावर भर पावसात झोपडीत दिवसभर अभ्यास करते. ध्येय गाठण्याची तिची जिद्द नक्कीच विचार करण्यासारखी आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाईट लाईफ गॅंगला मोठं योगदान देणाऱ्या डिनो मोरियाला पद्म पुरस्कार मिळणार नाही अशी...
वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत 5 कॅबिनेट मंत्री, 2 राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा 9 जणांचा यात समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोकणी लोकांसाठी राणेंचा पुढाकार | फडणवीसांच्या हस्ते अत्याधुनिक कोविड-१९ लॅबचे लोकार्पण
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पडवे कसाल येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कोविड 19 लॅबचे काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि खा. नारायण राणे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील संबोधित केलं.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांच्या नावातच गुलाब आहे, त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये - आ. नितेश राणे
नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणताही कामधंदा उरलेला नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली होती. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. नाणार प्रकल्पाला ८० टक्के स्थानिकांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून केला जातो. मात्र, यामागे शिवसेनेचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू आहे, असे राणे यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांमध्ये स्वतःहून हर्ड इम्युनिटी तयार झाली..श्रेय घेतोय बेबी पेंग्विन आणि बीएमसी
मागील काही दिवसांपासून मुंबईत करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याची दिलासादायक माहिती समोर आहे. पुढील काही दिवसांमध्ये ती आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर अशीच संख्या कमी होत राहिली तर नक्कीच करोनावर आपण नियंत्रण मिळवल्याचं म्हणता येईल. मुंबईची सद्यस्थिती पाहता हर्ड इम्युनिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही हे राजेश क्षीरसागर सारख्यांना माहित आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला होता. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
पहिल्यांदा बघितले आहे की मुख्यमंत्रीच सांगत आहेत..आमच सरकार पाडा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हानच दिले आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडून दाखवा.
5 वर्षांपूर्वी -
RSS तसेच अन्य संस्थांच्या परिश्रमांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण - आ. नितेश राणे
जागतिक आरोग्य यंत्रणेचे WHO प्रमुख टेड्रोस घेब्रेयसिस यांनी शुक्रवारी मुंबईच्या धारावी परिसरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. कोरोनाचा प्रादुर्भावकितीही तीव्र असला तरी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, हे धारावीने सिद्ध करून दाखवल्याचे त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
भावाचे ७ नगरसेवक फोडणाऱ्याला या ५ जणांना परत घेताना लाज वाटेल का?
तीन दिवसांपूर्वी चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीत भूकंप झाला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले होतं. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता.
5 वर्षांपूर्वी -
हे खरच सरकार नाही सर्कस आहे - आ. नितेश राणे
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा टेंडर घोटाळा; भाजप आमदाराचा आरोप
याबाबत नितेश राणेंनी म्हटलं आहे की, कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही, हेल्पलाईनवर कॉल केल्यावर बेड्सची स्थिती सांगितली जात नाही आणि दुसऱ्या बाजूला नेस्को, बीकेसी याठिकाणी हजारो बेड्स उपलब्ध केल्याचं सांगण्यात येते, मग हे बेड्स खरचं कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी आहेत का? कोणत्याही प्रकारचे टेंडर न देता ही कोविड सेंटर उभारली जात आहे, त्याठिकाणी फक्त बेड्स आहेत, बाकीच्या उपकरणांचे काय, डॉक्टर, नर्स या सुविधांचे काय? हे कोणाच्या सांगण्यावरुन होत आहे, मित्रपरिवाराला खुश करण्यासाठी कोविड सेंटर उभारली जात आहे, या लोकांची नावे विधानसभेत उघड करणार आहे. रात्री ८ नंतर ज्या लोकांसोबत बसता त्यांना खुश करण्यासाठी हे सुरु आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण ग्रामीण भागतल्या जुन्या शिवसेनेच्या नेत्यांना विचारत नाही
सामना संपादकीयमधून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आज टीका करण्यात आली आहे. पूर्वी थोरातांची कमळा चित्रपट गाजला होता. आता विखे पाटलांची कमळा अशा एक चित्रपट आला आणि पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची टूक अॅण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली आहे. मात्र त्यांची टुरटूर सुरु आहे अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सामना संपादकीयमधून यांना टोला लगावण्यात आला आहे. यावेळी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इशारा देत टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसैनिक म्हणजे तुम्ही किंवा मुलगा पंतप्रधान बनणार आणि जॅकेट शिवायला टाकली खासदारांनी
शिवसेनेचा काल ५४वा वर्धापन दिन पार पडला. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन काल कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
पहिले जे शिवसैनिक करायचे..तेच सोनू आता करतो आहे - आ. नितेश राणे
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या ‘मातोश्री’भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्याला जोरदार टोला लगावला. ‘अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला…मातोश्रीवर पोहोचले’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंटेनर थिएटर; तर आ. नितेश राणेंची संकल्पना ठरू शकते मराठी चित्रपट श्रुष्टीसाठी संजीवनी
मागील अनेक वर्षे हिंदी चित्रपट वेळीच मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची वेळ येते, त्यावेळी मराठी चित्रपटांवर कसा अन्याय होतो हे सांगणारे लोक, निर्माते, काही राजकीय पक्ष पुढे येत सिनेमागृह तोडण्याची भाषा करतात. पण दुस-यांची सिनेमागृह फोडण्यापेक्षा स्वत:चे सिनेमागृह उभे करून वेगळा आदर्श समाजासमोर ठेवण्याची किमया आ.नितेश राणे करताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोकणातील पहिले बिझनेस इंक्युबेशन सेंटर; स्टार्टअप संकल्पनाना मिळणार अर्थपुरवठा
महाराष्ट्रात पाहिलं बिझनेस इंक्युबेशन सेंटर झालं, मात्र आता दुसरं कोकणात होणार आहे. स्वतः आमदार नितेश राणे यांनी संकल्पना आणली असून ती जून महिन्यात कार्यान्वित होणार आहे. कोकणातील तरुण-तरुणींच्या स्टार्टअप संकल्पनांना सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा येथून दिल्या जाणार असून त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टार्टअप संकल्पनेला भविष्य असल्यास त्याला थेट अर्थसहाय्य देखील मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६'ला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव द्या - आ. नितेश राणे
काल ठाकरे सरकारने बजेटमध्ये अनेक घोषणा केल्या असल्या तरी विरोधकांनी त्यावर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम जोरदारपणे सुरु आहे. त्यानिमित्ताने आमदार नितेश राणे यांनी ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६ या महामार्गाला देण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK