महत्वाच्या बातम्या
-
मराठा विद्यार्थ्यांचे खच्चीकरण थांबवा: आमदार नितेश राणे
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. या निर्णयानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने वैद्यकीय प्रवेशात मराठा विद्यार्थ्यांचे खच्चीकरण थांबवा, अन्यथा मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा मराठा महासंघाने पत्रकाद्वारे दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्तेत असून सेनेने भाजपाला साथ दिली नाही, मग जनतेला कशी देतील? आ. नितेश राणे
युतीच्या सत्तेत असताना भारतीय जनता पक्षासोबत राहू शकली नाही ती शिवसेना जनतेच्या हितासाठी कशी राहील? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी नेरूर येथील जाहीर सभेत उपस्थित करून शिवसेनेच्या थापांना मतदारांनो आता तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
6 वर्षांपूर्वी -
आमदार नितेश राणेंचा अमोल कोल्हेंवर मोठा गौप्य स्फोट, का सोडली शिवसेना ?
आमदार नितेश राणेंचा अमोल कोल्हेंवर मोठा गौप्य स्फोट, का सोडली शिवसेना ?
6 वर्षांपूर्वी -
नाणारवासियांच्या व विरोधकांच्या लढ्याला यश, रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द
विरोधी पक्ष आणि स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून जोरदार विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठी माणसाच्या हक्कांसाठी जन्मलेली शिवसेना आज मराठी माणसाच्या विरोधात
राज्यात बाळासाहेबांच्या नैत्रुत्वात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेली शिवसेना आज केवळ मराठी माणसाच्याच विरोधात काम करत आहे. त्यात व्यवसाय करण्यासाठी पुढे येणा-या मराठी तरूणांच्या आड येण्याचे कारनामे सुद्धा सध्या शिवसेनेवाले करत आहेत. मग अशावेळी मराठी माणसांनी मूग गिळून गप्प बसायचे का? अशावेळी मराठी तरूण-तरुणींनी रोजगार कोणाकडे मागायचा? यापुढे आम्ही असे अजिबात होऊ देणार नाही असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
पहिली कोकणातील मंदिरं मग सरकार, रिफायनरी कक्षेतील ३२ प्रार्थना स्थळं पाडू देणार नाही: नितेश राणे
‘पहिली कोकणातील मंदिरं मग सरकार’ असा नारा देत आज नाणार रिफायनरीच्या कक्षेत येणा-या तब्बल ३२ प्रार्थना स्थळांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रदूषणकारी रिफायनरीमुळे कोकणच्या देवळातील मूर्ती तसेच मंदिरे आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असा नारा आमदार नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. तसेच कोकणासाठी विनाशकारी असणाऱ्या नाणार रिफायनरीला कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही, अशी घोषणाच त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना केली.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप: 'बाबा किती खायचे ओ?' नितेश राणेंची व्यंगचित्रातून शिवसेनेवर टीका
आमदार नितेश राणे यांनी चक्क व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंवर बेस्ट संपाच्या विषयाला अनुसरून जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सलग ७व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे. त्यावरुन, नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकणात सेनेला गळती, असंख्य शिवसैनिकांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश
लोकसभा निवडणुकीआधी कोकणात शिवसेनेला सोडचिट्ठी देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सत्तेत विराजमान असलेल्या शिवसेनेबद्दल कोकणात विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्प आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाला आहे. त्याचा फटका शिवसेनेला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसायची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
'बायको शिवसेनेसारखी पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही' : नितेश राणे
आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. सामनातील आजच्या संपादकीय मध्ये आलेल्या अग्रलेखाचा संदर्भ घेऊन निलेश राणेंनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा त्यांच्याच भाषेत चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग झेडपी: विषय समिती सभापती निवडणुकीत नितेश राणेंचा काँग्रेस, सेना-भाजपला दणका
काँग्रेसने जारी केलेला व्हीप तसेच सेना आणि भाजप युतीची योजना आमदार नितेश राणे यांनी चाणाक्षपणे हाताळून या तिन्ही पक्षांना धक्का दिला आहे. नितेश राणे यांच्या राजकीय कौशल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एकहाती वर्चस्व मिळवले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवराय लक्षात ठेवतील, कधी न येणा-या कावळ्यांना : नितेश राणे
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामनामाचा जप करण्यास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केल्याने त्यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला जाण्यापूर्वी माती कलश घेऊन जाण्यासाठी शिवनेरीवर दाखल झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सावंतवाडी'स्थीत हॉटेल मधील बलात्कार प्रकरणामुळे केसरकर व वैभव नाईक यांच्या विरुद्ध संताप
कोकणातील वातावरण सध्या सावंतवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर मळगाव येथील हॉटेलमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी तापताना दिसत आहे. विशेष म्हणजे स्वतः शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, ज्या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला ते हॉटेल शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मालकीचे असल्याचे उघड झाले आहे. त्यात भर म्हणजे ते विवादित हॉटेल मुंबईतील शिवसेना नगरसेविकेचा दीर चालवत होता असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकण; अतिउत्साही शिवसेना नेत्यांकडून 'बाप्पाला' बॉक्समधून लगेज'ने चिपी विमानतळावर आणून प्राणप्रतिष्ठा
आज कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळावर विमान उतरविण्यासाठी लागणा-या ६२ परवान्यांपैकी केवळ २५ टक्केच परवाने मिळाले असताना घाईघाईने एचडीएल कंपनीचे खासगी विमान उतरविण्याचा अतिउत्साहीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे गणेश चतुर्थीच्या तोंडावर गणरायाचं प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं, परंतु त्याच गणरायाला लगेज’मध्ये बॉक्समधून भरून आणण्यात आलं. सार्वजानिक असो वा घरगुती ‘बाप्पाची’ प्रतिष्ठापना करतांना त्याला ‘सीलबंद’ करून आणण्यात येत नाही.
7 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्गचे पालकमंत्री मराठाद्वेषी आहेत: आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात घडत असलेल्या विषयाला अनुसरून एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेव्हा त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर थेट आरोप केले आहेत. पालकमंत्री जिल्ह्यात मराठाद्वेषी राजकारण करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सत्ताधारी शिवसेना राजदंड कसा पळवू शकते? शिवसेनेची नाटकं कोकणी जनता ओळखून: नितेश राणे
आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच नाणार रिफायनरी विषयाला अनुसरून शिवसेनेचे काही सदस्य हातात बॅनर घेऊन आणि घोषणा देत अध्यक्षांच्या आसनासमोर आले. परंतु आमदार नितेश राणे थेट सभापतींच्या समोर गेले आणि सभापतींसमोर ठेवलेल्या राजदंडाजवळ पोहचले. परंतु आक्रमक झालेले आमदार नितेश राणे थेट सभापतींच्या राजदंडापर्यंत पोहोचल्याचे दिसताच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, वैभव नाईक, राजेश क्षीरसागर व राजेंद्र साळवी सुद्धा सभापतींच्या आसनाजवळ पोहोचले.
7 वर्षांपूर्वी -
नागपूर- नाणार प्रकल्पावरून आमदार नितेश राणे सभागृहात आक्रमक
नागपूर- नाणार प्रकल्पावरून आमदार नितेश राणे सभागृहात आक्रमक
7 वर्षांपूर्वी -
सेना अशी जिंकते तर, मिलिंद नार्वेकरांच्या पत्नीचे मतदार यादीत ६ वेळा नाव: नितेश राणे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या पत्नीच नाव मतदार यादीत तब्बल सहा वेळा असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी पुरावा दाखल यादी सुद्धा ट्विट केली आहे. पुढे त्यांनी असं सुद्धा ट्विट करत म्हटलं आहे की, ‘म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना अशी जिंकते तर!’.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा नाणार प्रकल्पाविरोधात विराट मोर्चा
नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वात विराट मोर्चा काढला. यात नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध असलेले सर्व स्थानिक लोक सहभागी झाले होते.
7 वर्षांपूर्वी -
फिर से, खोदा पहाड आैर निकला उद्धव: नितेश राणें
पालघर लोकसभा निवडणुकीतील शिवसनेच्या पराभवानंतर मातोश्रीवर तातडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच सर्वत्र ब्रेकिंग न्यूज येऊ लागल्या की शिवसेना पक्ष प्रमुख आता मोठा निर्णय घेणार आणि सत्तेतून बाहेर पडणार व मोठा राजकीय भूकंप होणार.
7 वर्षांपूर्वी -
कणकवलीत राणेंच निर्विवाद वर्चस्व, भाजप-सेना आघाडीला धोबीपछाड
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-सेना आघाडीला धोबीपछाड देत नगराध्यक्षपदासह एकूण १७ पैकी ११ जागांवर विजय मिळत कणकवली नगरपंचायतीवर निर्विवाद बहुमत मिळवले आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल