महत्वाच्या बातम्या
-
Nitin Gadkari | केंद्र सरकार वेळेवर निर्णय घेत नाही हाच प्रॉब्लेम, गडकरींनी मोदी सरकारचं वास्तव मांडल्याने खळबळ
देशातील पहिली डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस गुरुवारी मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नितीन गडकरी आणखी एका कारणामुळे चर्चेत आहेत. भाजपने त्यांना संसदीय मंडळातून हटवलं आहे, ही पक्षाची सर्वशक्तिमान संस्था आहे. त्याबद्दल प्रत्येकाचे आपापले तर्क-वितर्क आहेत. विरोधकांसह सर्वच पक्षांचे नेते गडकरींचा आदर करतात.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | गडकरींना राजकारणापासून दूर जावं असं का वाटतंय? | त्यांना ते भीषण संकेत मिळाले आहेत जे पत्रकार वशिष्ठ यांनी मांडले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी रविवारी नागपुरात झालेल्या कार्यक्रमात राजकारणापासून दूर जाण्याबद्दल एक विधान केलं. शनिवारी त्यांनी स्वत:च सांगितले. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती आणि वातावरणाबाबतही चिंता व्यक्त केली. आजच्या राजकारण्यांनी शिक्षण, कला अशा गोष्टींच्या विकासासाठी काम करायला हवे, असे ते म्हणाले. त्यांचे पोस्टर्स लावलेले मला आवडत नाहीत, असे गडकरी म्हणाले.
2 वर्षांपूर्वी -
Auto Revolution | भारतात भविष्यात या नव्या तंत्रज्ञानावर गाड्या चालतील, हा मोठा बदल घडणार आहे
२०३० पर्यंत देशात विक्री होणाऱ्या नव्या वाहनांपैकी ३० टक्के वाहने ही इलेक्ट्रिक प्रवासी वाहने असतील. क्लेमेंट अँड एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधनात याचा अंदाज आला आहे. २०५० पर्यंत एकूण विकल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिकचा वाटा ७५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असे ‘एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर कौन्सिल’च्या (सीईईईडब्ल्यू) अहवालात म्हटले आहे. २०३० पर्यंत एकूण नव्या दुचाकींपैकी निम्मी दुचाकी इलेक्ट्रिक टू-व्हीलर असतील, असे या अभ्यासात म्हटले आहे. त्याचप्रमाणे तीनचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिकचा वाटा २५ टक्के असेल.
2 वर्षांपूर्वी -
नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल | 15 मिनिटांत 19 किमीचं अंतर कापता येईल - नितीन गडकरी
नागपूर-बुटीबोरी मार्गावर ६ पदरी उड्डाणपूल होणार आहे. हा उड्डाणपूल १९ किमी अंतर १५ मिनिटांत पार करेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. हा उड्डाणपूल १९.६८३ किमी लांबीचा असेल. नागपूर-बुटीबोरी हा अत्यंत महत्त्वाचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग आहे. सहापदरी रस्त्याच्या जागी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल असेल. हा पूल बांधल्यानंतर चिंचभुवन ते बुटीबोरी हे अंतर १५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. चिंचभुवन ते बुटीबोरी या नवीन उड्डाणपुलाची लांबी १९.६८३ किमी प्रस्तावित आहे. या प्रस्तावित पुलासाठी १,६३२ कोटी रुपये खर्च येतो. उड्डाणपूल बांधल्याने भूसंपादनाची गरज भासणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Toll Be Paid | टोल कधी भरायचा? | तुम्ही रस्त्यावर चालण्यासाठी किती खर्च करता ते समजून घ्या
भारतात गेल्या 8 वर्षात जर कोणत्याही मंत्रालयाचे सर्वाधिक कौतुक झाले असेल तर ते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे आहे. 2014 पासून नितीन गडकरी हे मंत्रालय सांभाळत आहेत. देशातील रस्त्यांचा विकास मोठ्या वेगाने होत (Toll Be Paid) असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Indian Musical Instruments for Horns | देशातील गाड्यांचे हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलणार | कायदाच होणार
भारतातील गाड्यांचे हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलू शकतो. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नाशिकमध्ये ही माहिती दिली. ते म्हणाले की, असा कायदा आणण्याची त्यांची (Indian Musical Instruments for Horns) योजना आहे, ज्या अंतर्गत वाहनांच्या हॉर्नमध्ये फक्त भारतीय वाद्यांचा आवाज वापरता येईल. याशिवाय रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सायरनचाही विचार केला जात आहे. ऑल इंडिया रेडिओवर वाजवल्या जाणाऱ्या ट्यूनमध्ये त्यांचे रूपांतर करण्याचा विचार करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Scooter Bikes on Ethanol | आता स्कूटर-बाइक फक्त इथेनॉलवर धावणार | लवकरच कायदा आणण्याची गडकरींची माहिती
केंद्र सरकार लवकरच एक कायदा तयार करणार आहे, त्यानुसार बाइक आणि स्कूटरसहित इतर दुचाकी वाहने फक्त इथेनॉलवर चालतील. त्यामुळे महाग इंधनाच्या समस्येपासून सुटका होईल. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की,‘मी लवकरच कायदा बनवणार आहे. त्यानंतर स्कूटर, बाइक, ऑटोरिक्षा आदी पेट्रोलवर चालणार नाहीत. ही वाहने ११० रुपयांच्या पेट्रोलच्या ऐवजी ६५ रुपये लिटरच्या १०० टक्के इथेनॉलवर चालतील. त्यामुळे पैसेही वाचतील आणि प्रदूषणही कमी होईल.’
3 वर्षांपूर्वी -
जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते - नितीन गडकरी
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते” असल्याचे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी म्हटले आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सन्मानाने वागले पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदारांकडे नियमबाह्य मागण्या | गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामं बंद पडतील, असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार खासदारांकडून विरोध होत असल्याचं गडकरी यांनी पत्रात म्हटलंय.
3 वर्षांपूर्वी -
५० हजार कोटीं खर्चून समुद्रमार्गे मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार - नितीन गडकरी
नगरकरांबरोबरच औरंगाबादकरांचाही पुणे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. अहमदनगरमधून थेट पुण्यापर्यंत १०० किमीचा ३ मजली उड्डाणपूल तयार होणार असून त्याच्या आराखड्याला मंजुरीही मिळाली आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच तीनमजली पूल असणार आहे. त्यासाठी प्राथमिक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खासगी संस्थेला देण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
गडकरींच्या राज्यात चाललंय काय? | धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पूल खचला, २ वर्षांतच महामार्गाची दुर्दशा
बहुचर्चित राष्ट्रीय महामार्गाचे अवघ्या काही महिन्यांतच पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच अल्पशा पावसाने पूल खचणे, रस्त्यावर पाणी साचून अपघातास निमंत्रण देणे, कठडे वाहून जाणे, खचून जाणे, रस्त्यालगत असलेले संरक्षक बेल्ट मुळासह वाहून जाणे आदी प्रकार बघावयास मिळाल्याने वाहनचालकांना या महामार्गावरून सांभाळून वाहने चालवावी लागत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात गडकरींच्या कारखाण्याचीही तक्रार | भाजपमध्ये अंतर्गत कलह?
राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आमदारांसह नेतेमंडळी सभागृहात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी नितीन गडकरी यांच्या कारखान्यावरील कारवाईच्या मागणीवरुन भारतीय जनता पक्षाला टोला लागवला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं ते म्हणाले. तसेच भारतीय जनता पक्षामधील एका गटाकडून गडकरींना लक्ष्य केलं जातंय, असा आरोपही त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी
उत्तर प्रदेशात एका ऑक्सीजन प्लांटच्या व्हर्चुअल कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जीभ घसरली. नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले – ‘सर्वात पहिले मला आनंद आहे की, कोविडच्या या काळात आपल्या देशात अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागला.’ सदर संवादात त्यांनी हे वाक्य ००:५८ व्या सेकंदाला म्हटल्याचे तुम्ही पाहू शकता.
4 वर्षांपूर्वी -
एका ऐवजी १० कंपन्याना कोरोना लस बनविण्याचं लायसन्स द्या - गडकरींचा सल्ला
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण हाच एक मार्ग सध्या सगळ्या जगासमोर आहे. मात्र भारतातील अनेक राज्यांमध्ये लसींचा सातत्याने तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. यावर मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्राला सल्ला दिला आहे. देशांतर्गत कंपन्यांना साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस तयार करण्याचा परवाना देण्यात यावा असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
संकटकाळात आधी स्वत:चं कुटुंब, आर्थिक व्यवस्था आणि मग लोकांना मदत करा - गडकरी
राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षातील सहकार्त्यांना एक महत्वाचा आणि आपुलकीचा सल्ला दिला आहे. देशभरातील अनेक पक्षातील मंत्री, आमदार, खासदार तसेच नगरसेवकांनी कोरोना आपत्तीत स्वतःचा जीव गमावला आहे. लोकांना मदत करणं यात काही वावगं नसलं तरी त्यालाच अनुसरून गडकरांनी काही अग्रक्रम ठरवून दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणापलीकडचे नितीन गडकरी | तुम्ही ‘प्रस्ताव पाठवा बाकी मी बघतो' म्हणाले होते आणि मनसेची मोठी मागणी मार्गी
डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न सन २००९ पासून प्रलंबित आहे. या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने ९३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर या रस्त्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला असून अद्यापही गती मिळालेली नाही.सध्या कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे रस्ते वाहतुकीचे महत्त्व सर्वांना कळू लागले.
4 वर्षांपूर्वी -
देशात अजून कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता, सज्ज राहा - नितीन गडकरी
देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. संक्रमणामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा 1.5 कोटींच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 78 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांचा आकडा पाहिला तर विक्रमी 2.70 लाख लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी मंगळवारी 2.62 लोक रिकव्हर झाले होते. ओव्हरऑल रिकव्हरी रेटमध्येही 1.8% ची वाढ झाली आहे. हा आता 82.08% झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही शेतकऱ्यांच्या सूचना आणि सल्ल्यांवर विचार करण्यास तयार आहोत - गडकरी
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 20वा दिवस आहे. परंतु, अद्याप देखील कृषी कायद्याबाबत तोडगा निघू शकला नाही. विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येतोय. काँग्रेस खासदार राहुल गांधी अधिक आक्रमक होत आहेत. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या सूचनांवर विचार करण्यास तयार आहोत, असं म्हटलंय. त्याच बरोबर ज्येष्ठ समाजसेवर आण्णा हजारे हे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नसल्याचंही गडकरी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
गाडीवर FASTag नाही | दुप्पट टोल भरायचाही नाही | काय आहे दुसरा पर्याय?
केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. देशभरातील टोल नाक्यांवर (Toll Plaza FASTag ) डिजिटल आणि आयटी पेमेंट सिस्टमला चालना (Digital IT Payment system) देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) ने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 1 जानेवारीपासून जुन्या गाड्यांना देखील फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक (FASTag notification released) काढलं आहे. फास्टॅग नसणाऱ्यांकडून दुप्पट पैसे (Without FASTag Double Toll Charge) वसूल करण्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. मात्र आता यामध्ये एक अपडेट आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार बैलासारखं | सतत टोचल्याशिवाय पुढेच जात नाही - गडकरी
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. तसं केल्याशिवाय ते पुढेच सरकत नाही, असं टीकास्त्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोडलं आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात नितीन गडकरी संबोधित करत होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम