महत्वाच्या बातम्या
-
भाषिक-प्रांतीय राजकारणात रस नाही, पण मुंबई पुण्यातील गर्दी रोखणं गरजेचं - गडकरी
कोरोनाचे संकट सरल्यानंतर मुंबई आणि पुणे या शहरांतील लोकसंख्या कमी decongest करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी ‘झी २४ तास’च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे #e_conclave मध्ये बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात महाराष्ट्राला व्यापाऱ्याच्या क्षेत्रात कोणत्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, याचा सविस्तर उहापोह केला.
5 वर्षांपूर्वी -
सध्याच्या परिस्थितीत मुंबईत येण्याचे धाडस नाही - नितीन गडकरी
मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात २७८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यामध्ये मुंबईतील ५८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गडकरी महामार्गांच्या दर्जावर बोलतात; पण इथे अपघातग्रस्तच खड्डे बुजवत आहेत
केंद्रीय दळणवळ मंत्री नितीन गडकरी अनेक ठिकाणी लाख करोड रुपयांच्या पायाभूत सुविधांवर बोलताना पाहिलं असेल. मात्र भारत सरकार रस्ते विकासावर करत असलेल्या करोडो रुपयातून नेमकी कोणती गुणवत्ता साध्य होते ते माहित नसलं तरी त्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे सामान्य लोकं मात्र स्वतःचे कुटुंबीय आणि जिवलग अपघातात गमावत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली निवडणूक: २ रुपये किलो पीठ आणि मुलींसाठी मोफत स्कूटी; भाजपचा जाहीरनामा
भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले. राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना २ रुपये किलो दराने गव्हाचे पीठ देण्यात येईल, असे भारतीय जनता पक्षाने यात वचन दिले आहे. त्याचबरोबर ईटीडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना ‘बेटी बचाव योजनें’तर्गत सायकल आणि ई-स्कूटी वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हे तर दिल्लीत सरकार स्थापल्यानंतर १० नवीन महाविद्यालये सुरू करण्याचे आश्वासनही भारतीय जनता पक्षाने आपल्या संकल्प पत्रात दिले आहे. भारतीय जनता पक्षाने १० नवी आश्वासने या संकल्प पत्रात दिली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना, असा सल्ला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महिला उद्योजिका मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना दिला. यावेळी जेष्ठ सिने कलाकार नाना पाटेकर उपस्थित होते. “महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे मेळावे उपयुक्त आहेत. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना. सूक्ष्म उद्योग खात्याचा मी मंत्री आहे माझ्याकडे मोठं बजेट आहे. तुम्ही उद्योगासाठी पुढे या आम्ही तुम्हाला मदत करू”, असा सल्ला सुद्धा गडकरी यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
सरकारकडे पैशांची कमतरता नसून निर्णय घेण्याचीच हिंमत नाही: नितीन गडकरी
‘देशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्ये निर्णय घेण्याचीच हिंमत नाही’, असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. विविध योजनांवर काम न होण्याची कारणे सरकारची मानसिकता आणि नकारात्मक दृष्टीकोन ही असल्याचेही गडकरी म्हणाले. ते नागपुरात विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे मोदी सरकारच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकार'कडे पैसा नाही, मी पीपीपी आणि बीओटी तत्वावर कामे केली: गडकरी
सरकार कोणत्याही पक्षाचे असू द्या, सगळ्या गोष्टीचे सोंग करता येते, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. सरकारजवळ पैसेच नाहीत, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत दिली. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ)तर्फे ९ ते १२ जानेवारी दरम्यान ऍडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पो घेण्यात आला. याचा रविवारी समारोप झाला. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
'जनता बकवास थापेबाजीला कंटाळली', शिवसेनेचा फडणवीस आणि गडकरींना टोला
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर शिवसेनेनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ‘सगळय़ात धक्कादायक आणि सनसनाटी निकाल लागला आहे तो नागपूर जिल्हा परिषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी आणि बावनकुळेंना धक्का
राज्यातील एकूण सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झालीय. या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गडकरींचा संबंध सिमेंट, इथेनॉल, डांबर वगैरे वस्तूंशी, क्रिकेटशी नाही: शिवसेना
‘सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आमचेच सरकार येणार’ असं कोणत्या तोंडानं सांगत आहेत’, असा खडा सवाल करतानाच, ‘श्रीरामासही राज्य सोडावे लागले होते. त्यामुळं इतकं मनास लावून घेऊ नका,’ असा खोचक सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो, राजकारणात नाही; भाजपला चेंडू दिसलाच नाही: बाळासाहेब थोरात
‘क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो. राजकारणात तसं होतंच असं नाही. भाजपचंही तेच झालं. त्यांना चेंडू दिसलाच नाही,’ असा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्युत्तर दिलं.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री आमचाच! अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटपाचं काहीही ठरलं नव्हतं: नितीन गडकरी
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भारतीय जनता पक्ष हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
युती किंवा आघाडीत ज्यांचे जास्त आमदार, त्यांचाच मुख्यमंत्री असतो: नितीन गडकरी
शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. शिवसेनेकडून काही स्तरावर चर्चा आहे. पण चॅनलच्या माध्यमातून पाहिलं तर वाटतं चर्चा बंद आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. शिवसेनेसोबतच सरकार स्थापन व्हावं ही भाजपाची इच्छा आहे. अल्पमतातील सरकार कदापि बसवणार नाही. दिल्लीहून तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनंच भाजपानं आत्तापर्यंत वाट पाहिली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचे प्रश्न अन अजब पाठपुरावा; एक भेटले केंद्रीय गृहमंत्र्यांना तर दुसरे दळणवळन मंत्र्यांना
सध्या राज्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले असून, आधीच दुष्काळात होरपळला शेतकरी राजा आता ओल्या दुष्काळाने हैराण झाला आहे. एका बाजूला शेतकरी मदतीच्या आशेने हंबरडा फोडत असताना राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांच्या भेटीगाठी म्हणजे कशाचा कशाला पत्ता नाही असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीत सोनिया गांधींचे विश्वासू काँग्रेस नेते अहमद पटेल गडकरींना भेटले
तला सरकारस्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. शिवसेना, भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांना मिळून बहुमत असूनही सरकारस्थापनेचा दावा भारतीय जनता पक्षाने केलेल नाही. मुख्यमंत्रीपदावरून दोहोंमध्ये एकमत होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर तिकडे दिल्लीत आणखी वेगळ्या घडामोडी घडत आहेत. आज सकाळी अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य मानले जातात. त्यामुळेच या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
6 वर्षांपूर्वी -
खड्डे'युक्त' रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांसाठी मुंबई महापालिका आहेच: नितीन गडकरी
पावसात भिजलं की चांगलं भविष्य आहे असं म्हणत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोपरखळी मारली आहे. पार्ले कट्टा कार्यक्रमात नितीन गडकरी आले होते. या कार्यक्रमात पाऊस पडू लागला तेव्हा निवेदिकेने त्यांना सांगितलं की नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो आहे पावसाचं काही खरं नाही. त्यावर तातडीने गडकरी उत्तरले की, “पावसात भिजलं की चांगलं भविष्य आहे असं पत्रकार म्हणतात” त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. स्वतः नितीन गडकरींनाही हसू आवरलं नाही.
6 वर्षांपूर्वी -
यशस्वी लोकशाहीसाठी विरोध पक्ष अत्यंत महत्त्वाचा आणि राज ठाकरे एक सक्षम नेते आहेत: गडकरी
भारतीय जनता पक्षातील दिलखुलास आणि राजकारणापलीकडे जाऊन मत व्यक्त करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ख्याती आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना खुद्द नितीन गडकरी यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे एक सक्षम नेते; जनतेने त्यांचा विचार करायला हवा: नितीन गडकरी
भारतीय जनता पक्षातील दिलखुलास आणि राजकारणापलीकडे जाऊन मत व्यक्त करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ख्याती आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना खुद्द नितीन गडकरी यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
ओदिशात ट्रकचालकास ८६, ५०० रुपये दंड; तर बिहारला केंद्रीय मंत्री दंड न भरताच निघून गेल्या
सरकारे नवीन वाहतूक नियम आणि त्यासोबत वारेमाप दंड जरी आणले असले तरी ते केवळ सामान्य लोकांसाठीच असल्याचं देशभर निदर्शनास येते आहे. कारण सत्ताधारी पक्षांचे मंत्री, आमदार आणि खासदार आणि त्यांचे कुटुंबीय नवे वाहतूक नियम पायदळी तुडवून उलट पोलिसांवरच कारवाई करत असल्याचं समोर आलं आहे. कारण ओडिशा आणि बिहारमधील हे दोन प्रसंग याचं वास्तव स्पष्ट करत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
वाहूतक नियमभंग : दोन राज्यातून ४ दिवसांत तब्बल १.४१ कोटींची दंडवसुली
भारतात १ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. नवीन कायद्यातंर्गत वाहतुकीचे नियम मोडल्यास जवळपास ३० पटीने अधिक दंड वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कार, बाईक चालविताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना दंड भरावा लागतो. या नवीन तरतुदीनंतर आता तब्बल १ कोटी ४१ लाख २२ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA