महत्वाच्या बातम्या
-
कायद्याचा धाक लोकांमध्ये असायलाच हवा: नितीन गडकरी
वाहन चालकास शिस्त लागावी आणि वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी १ सप्टेंबर पासून देशभरात वाहतूकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचं पालन न केल्यास सक्तीने दंड वसुलीही प्रशासनाने सुरु केली आहे. तसेच नियम उल्लंघनाचे दंड देखील १० पटीने वाढवण्यात आले आहेत. मात्र याचा फटका मोटार वाहन चालकांना बसत आहे. कारण इतके दिवस बेशिस्तीने वाहन चालवण्याची सवय असल्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे वाहन चालकांना जड जात आहे. त्यामुळे या कठोर कारवाई बाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! आजपासून गाडी चालवताना चूक केल्यास दंड भरताना सगळा पगारच जाईल
वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
गडकरी म्हणाले, अधिकाऱ्यांनो कामं करा अन्यथा लोकांकडून धुलाई; मग विरोधकांवर खटले का?
एमएसएमई सेक्टर मध्ये लघु उद्याेग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे. आठ दिवसांमध्ये कामं पूर्ण केली नाहीत तर लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन अशी तंबी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या विधानामुळे नितिन गडकरी पून्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसेच आपण लालफितीच्या कारभराच्या विराेधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! मोटर वाहन कायद्यात सुधारणा, दंडाची नवी रक्कम तुमचा पगारच घेऊन जाईल
केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मोटर वाहन सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर ते सभागृहात आवाजी मतदानाने मंजूरही झाले आहे. या दुरुस्ती विधेयकात महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत. सर्व राज्यांना हे स्वीकरण बंधनकारक नसलं तरी जे राज्य सरकार ते स्वीकारेल त्यांना देखील या दंडाच्या रकमेमुळे रोष पत्करावा लागू शकतो.
5 वर्षांपूर्वी -
गडकरी हे केंद्रातील सर्वात चांगलं काम करणारे मंत्री: खासदार इम्तियाझ जलील
औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी पुन्हा त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचं उदाहरण समोर ठेवलं आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील खासदार म्हणून मुद्देसूदपणे संसदेत शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी बोलून दाखवल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कामाची स्तुती केली होती, तसेच त्यांच्यातील अभ्यासू पत्रकार देखील त्यावेळी सभागृहाने अनुभवाला होता.
5 वर्षांपूर्वी -
गडकरी म्हणतात आयुष्याभर टोल भरा; राज्यातले नेते म्हणतात दादांचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ
भारतीय जनता पक्षाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो असं धक्कादायक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला होतं. सांगली येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केले होते.
6 वर्षांपूर्वी -
मोटार वाहन सुधारणा विधेयक २०१९; वाहन धारकांना रोज १०-१५ हजार खिशात ठेवावे लागतील
वाहन धारकांना धडकी भरवणारे दंड अमलात आणण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत मोटार वाहन सुधारणा विधेयक-२०१९ सादर केले. दरम्यान रस्ते अपघात थांबविण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचावा म्हणून मोटार वाहन सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील नितीन गडकरी यांनी उपस्थित प्रतिनिधींना केले आहे. मागील पाच वर्षात देशातील एकूण अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आम्ही कमी पडलो हे देखील त्यांनी प्रथम मान्य केलं.
6 वर्षांपूर्वी -
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची अट रद्द, गडकरींचा निर्णय
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची काम करण्याची प[पद्धत वेगळीच समजली जाते. देशातील महामार्ग रस्त्यांचा होत असलेला विकास पाहून गडकरींना रोडकरी असेही संबोधले जाते. महाराष्ट्रातील एक दूरदृष्टी जपणारा केंद्रातील मराठी नेता म्हणून त्यांची देशभर ओळख आहे. गडकरी यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात देखील दळणवळणमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर, अशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पहिलाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने त्याची समाज माध्यमांवर देखील जोरदार चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत पाकिस्तानचं पाणी अडवण्याच्या धमक्या देऊन बारामतीचं पाणी बंद?
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा दुर्लक्षित करून भाजपचे सर्वच नेते मंडळी भाषणात केवळ पाकिस्तानवर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर भाषणात थेट पाकिस्तानचं पाणी रोखण्याची भाषा केली होती. भारतातुन वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणारे आज बहुमताने केंद्रात सत्तेत येताच पाकिस्तनाला विसरले असून, देशातील सामान्य लोकांच्या तोंडाचे पाणी पळवण्याचे काम करत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
कोकण: हायवेच्या कामांची पोलखोल, गडकरी कंत्राटदारांना बुलडोझर खाली चिरडनार का?
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चौपदरीकरण कामांची चांगलीच पोलखोल केली आहे. महामार्गालगत ठिकठिकाणी मातीचा भराव वाहून गेला आहे. तरअनेक ठिकाणी पर्यायी रस्ता खचला आहे. महामार्गालगतच्या घरांमध्येही पाणी गेले आहे. आज कणकवली शहर आणि वागदे परिसरात असलेल्या या रस्त्यामध्ये अनेक वाहने अडकली होती. बस स्थानक परिसरात रस्ता खचल्याने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती.
6 वर्षांपूर्वी -
नागपूर लोकसभा: नितीन गडकरी विजयी; काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दारुण पराभव
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना अगदी सहज झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी घेणारे नितीन गडकरी आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानपदात मला रस नाही, मोदीच पुन्हा यापदी विराजमान होतील : गडकरी
पंतप्रधानपदात मला अजिबात रस नाही, त्यामुळे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच या पदाचे उमेदवार आहेत आणि यंदाही तेच पंतप्रधान होतील, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. काल भोपाळ येथे एका प्रचार कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
भाजपानं २२०-२३० जागा जिंकल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत: सुब्रमण्यम स्वामी
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं भाकीत केलं आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत २२०-२३० जागा जिंकल्यास नरेंद्र मोदी कदाचित पुढचे पंतप्रधान होणार नाहीत, असं सूचक विधान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सध्याचं भाजपच्या नैत्रुत्वतही बदल केले जातील, असा थेट दावाही स्वामींनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी पराभूत होणार: प्रकाश आंबेडकर
नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणारे नितीन गडकरी यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा कमीत कमी ३ लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी दोनशे कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असा थेट दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पर्रिकर यांना मुखअग्नी मिळण्यापूर्वीच भाजपच्या रात्रभर नितीन गडकरींच्या उपस्थितीत बैठका
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारसमोर पुन्हा एकदा राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्याचं राजकीय संकट उभं राहिलं आहे. पर्रिकरांच्या जागेवर नवीन नेता निवडण्याचं आव्हान भाजसमोर निर्माण झालं आहे. कारण काँग्रेस पक्षानं राज्यपालांना पत्राद्वारे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात जोरदार राजकीय हालचाली
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकीकडे काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा करण्याची तयारी सुरु केली असतानाच भाजपानेही मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गडकरी कटकारस्थानी स्वभावाचे नाहीत, काही असतं तर सर्वात आधी मला सांगतील
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानांवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर एखादी इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,’ असं भागवत म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधीनी गडकरींना नम्रपणे विचारलं, 'नितीनजी तो बेरोजगारीचा उल्लेख राहून गेला'
काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एकटेच धाडसी नेते आहेत’, असे म्हणून त्यांची उपरोधिकपणे कौतुक केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी आणि राहुल गांधी यांच्यादरम्यान सोमवारी टिष्ट्वटरवरून कलगीतुरा रंगला.
6 वर्षांपूर्वी -
भाजपने घोषणेतून 'मोदी सरकार' शब्द हटवले? नवी घोषणा ‘अबकी बार ४०० के पार’?
भाजप’ने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी २०१४ मधील घोषणेत बदल केल्याचे वृत्त आहे. २०१४ मधील ‘अबकी बार मोदी सरकार’ मधील ‘मोदी सरकार‘शब्द वगळून “अबकी बार ४०० के पार” अशी नवी घोषणा देण्याची योजना असल्याचे समजते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. तत्पूर्वी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत एनडीएने तब्बल ३३६ जागांवर विजय प्राप्त केला होता. त्यावेळी एकट्या भाजपाने २८२ जागांवर विजय प्राप्त केला होता.
6 वर्षांपूर्वी -
लोकांना केवळ स्वप्नं दाखवणारा नेता चांगला वाटतो!....गडकरींचा हा टोला कोणाला?
मागे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या रोखठोक वक्तव्यातून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये हेतु पुरस्कर जाहीर खोटी आश्वासने सामान्यांना दिल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले होते. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष देशात सत्तेवर येणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री होती. त्यामुळेच विचाराअंती आम्हाला जाहीर खोटी आणि मोठमोठी आश्वासने देण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु, आता जेव्हा कधी आम्ही देशात सत्तेत आलो आहोत, तर सामान्य जनता आम्हाला दिलेल्या खोट्या आश्वासनांची बरोबर आठवण करून देत आहेत. परंतु, आम्ही केवळ त्यांना एक स्मित हास्य देतो आणि पुढे चालत राहतो, असे त्यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांच्यवर पुन्हा स्वतःच्या वक्तव्यावर खुलासा करण्याची वेळ आली होती.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा