महत्वाच्या बातम्या
-
तर...पंतप्रधानपदासाठी शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल
लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण कठीण होणार आहे. अशा राजकीय पेच निर्माण करणाऱ्या परिस्थितीत जर पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं यांचं नाव पुढे आल्यास शिवसेना त्यांना जाहीर पाठिंबा देईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
राजकारण्यांनी कोणत्याही सांस्कृतिक संस्थामध्ये हस्तक्षेप करू नये : गडकरी
आधीच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नंतर रद्द केल्यामुळे वादात अडकलेल्या यवतमाळ येथील ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी सायंकाळी समारोप झाला. दरम्यान, उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समारोपाच्या भाषणात राज्य सरकारचे चांगलेच खडे बोल सुनावले आणि राजकारण्यांना दोन मोलाचे सल्ले दिले.
6 वर्षांपूर्वी -
२०१९ मध्ये कोण पंतप्रधान असेल ते सांगता येत नाही : रामदेव बाबा
योगगुरु रामदेव बाबा यांनी प्रसार माध्यमांसमोर केलेल्या एका वक्तव्याने आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच खळबळ माजली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नक्की पुढील पंतप्रधान कोण होतील असा प्रश्न बाबा रामदेव यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर सर्वच आश्चर्य चकीत झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मला नेहरुंचं ‘ते’ भाषण खूप आवडतं : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितिन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचा दाखला देत, त्यातून मांडण्यात आलेल्या विचाराचे प्रामाणिकपणे कौतुक केले आहे. एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
एकवेळ हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होत नाहीत: गडकरींचं विधान
सध्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार अशी चर्चा रंगली असताना गडकरी मात्र रोज नवनवीन विधानं करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू मांडली आणि अडचणी मांडल्या होत्या. परंतु प्रसार माध्यमांनी टीका करताच पुन्हा घुमजाव केले होते. त्यात आता पुन्हा त्यांनी सांगली येथील कार्यक्रमात धक्कादायक वक्तव्य केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्या सिनेमाचं उदाहरण देत म्हणाले, आमच्या उत्साही वाचाळवीरांच्या तोंडात कापडाचा गोळा भरण्याची गरज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही वाचाळवीर नेत्यांना डोस दिला आहे. प्रसार माध्यमांकडे पुढे पुढे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मुळात कमी बोलण्याची नितांत गरज आहे, असं विधान गडकरींनी केलं आहे. नितीन गडकरी एका मीडियाच्या कार्यक्रमात संबोधीत करत होते. दरम्यान, याचवेळी त्यांनी राफेल लढाऊ विमानांच्या डील प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आलेल्या तब्बल ७० पत्रकार परिषदेवर नितीन गडकरी यांनी प्रथमच भाष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
गडकरींकडून विजय मल्ल्याची पाठराखण, म्हणाले 'तो घोटाळेबाज कसा'?
विजय मल्ल्याचे लंडनमधून भारतात प्रत्यार्पण होण्याआधीच त्याला सज्जन असल्याचा दाखल देण्यास भाजपकडून सुरुवात. कारण खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि देशातून पलायन कडून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मल्ल्याची पाठराखण केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ, राज्यपालांनी सावरले
राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरींना भोवळ आल्याचे समजते. परंतु, बाजूला उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले. दरम्यान, गडकरी यांना ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री....पण बुद्धिवादी लोकं?
झोपडपट्यांमध्ये राहणारी लोकं सोबत असतात, त्यामुळे जिंकण्याची निश्चित खात्री असते. पण बुद्धिवादी लोकं सोबत असली तर मात्र जिंकण्याची खात्री नसते असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दी आयडिया ऑफ न्यू इंडिया’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमाला उद्योजक श्रीराम दांडेकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. भारतकुमार राऊत, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह सुरेश देवळे, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे कार्याध्यक्ष भूषण मर्दे, उपाध्यक्ष वीरभद्र दुलानी, कार्यवाह रमेश देवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
यांच्या फेकलेल्या हजारो-लाखो कोटींच्या आकड्यांनी लक्ष्मी सुद्धा थक्क: व्यंगचित्र प्रसिद्ध
भारतीय जनता पक्षाला मनसे अध्यक्षांनी व्यंगचित्रांची मालिका प्रसिद्ध करून हैराण करून सोडले आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा चार साडेचार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘फेकलेले’ हजारो, लाखो कोटींचे आकडे आकडे पाहून लक्ष्मी सुद्धा थक्क झाल्याचे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ; आम्ही आमच्या 'त्या' आश्वासनांवर हसतो आणि पुढे जातो: गडकरी
आम्ही सत्तेत येणार नाही याची भाजपला खात्री होती. त्यामुळेच आम्ही काही आश्वासन देत सुटलो. परंतु, आम्ही स्वतः त्या सामान्यांना दिलेल्या आश्वासनांवर हसतो आणि पुढे जातो’ असं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वाहिनीच्या मुलाखतीत केलं होतं. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या गडकरींच्या त्या विधानाची दखल घेतली आणि त्यामुळे स्वतः गडकरी आणि भाजप वादातसापडण्याची चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ मध्ये सत्तेत येण्याची खात्री नव्हती, म्हणून आश्वासनं देत सुटलो: नितीन गडकरी
आम्हाला २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्याची खात्री नसल्याने काही जणांनी मतदाराला आश्वासने द्यायला सांगितली. त्यानंतर आम्ही इतकी आश्वासने दिली लोकांना की ती आता आठवत सुद्धा नाहीत अशी कबुली खुद्द केंद्रीय दळणवळन मंत्री नितीन गडकरी यांनी मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमा दरम्यान दिली. परंतु, त्यांच्या या विधानाने भाजपच्या अडचणी वाढणार असून गडकरींच्या या कबुलीने भाजपची एक प्रकारे पोलखोल झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारत मोठ्या आर्थिक संकटात: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
जागतिक बाजारपेठेत तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक संकटात असल्याचं वक्तव्यं खुद्द केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरत असून देशात महागाई प्रचंड वाढत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी या मुलाखतीदरम्यान दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जल प्रकल्पांसाठी निधी द्यायला तयार, पण गिरीष महाजन कामच करीत नाहीत: नितीन गडकरी
महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री रामेश्वर (म्हणजे महाजनांचे पीए) आहेत, तर त्याच खात्याचे राज्यमंत्री म्हणून जाधव मॅडम (म्हणजे महाजनांच्या ओएसडी) काम पाहतात. तर जलसंपदा खाते स्वत: मुख्यमंत्री सांभाळतात असं घणाघाती टीका आणि शेलक्या भाषेत केंद्रीय रस्ते विकास व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भाजपच्या नेते मंडळींसमोर फिरकी घेतली.
6 वर्षांपूर्वी -
नागपुरात राजकीय परतीचा पाऊस? गडकरींच्या गावात भाजपचा ग्रामपंचायत निवडणुकीत धुव्वा
भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगलाच धोबीपछाड दिला आहे. नितीन गडकरी यांचे मूळ गाव धापेवाडा तसेच त्यांनी दत्तक घेतलेले ‘पाचगाव’ या दोन्ही ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेद्वारांनी बाजी मारली आहे. दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला काँग्रेसने धूळ चारली आहे. विशेष म्हणजे धापेवाडा येथे एकूण १७ पैकी भाजपच्या हाताला एकही जागा लागली नसून सर्वच उमेद्वारांना काँग्रेसने धूळ चारली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन व चारित्र्य अटलजींसारखं आहे का? गडकरींचा कार्यकर्त्यांना रोखठोक सवाल
सध्या भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन आणि चारित्र्य अटलजींसारखं आहे का? असा रोखठोक सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप कार्यकर्त्यांना केला. पक्षाच्या कार्यक्रमात मला फक्त चहाच दिला-बिस्किट दिले नाही अशा मुद्द्यांवर पक्षात खडाजंगी होते, असा सणसणीत टोला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना लगावत सत्य परिस्थितीवर बोट ठेवलं.
6 वर्षांपूर्वी -
आता ट्रॅफिक पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही
केंद्रीय परिवाहन मंत्रालयाच्या अध्यादेशानुसार डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर तुमच्या वाहनांची मूळ कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमची ट्रॅफिक पोलिसांच्या नियमातून सुटका होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
गडकरीजी! देशातील सरकारी नोकऱ्यांबद्दल उत्कृष्ट प्रश्न विचारलात: राहुल गांधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी नोकऱ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. कारण त्या वक्तव्यानंतर त्यांनी विरोधकांना आयतीच संधी दिलेली आहे. त्याच विधानाचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी ट्विट करत नितीन गडकरींनी आरक्षण आणि सरकारी नोकरीची स्थिती याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल त्यांना खोचक टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
...नाहीतर बुलडोझरखाली चिरडेन! गडकरींचा कंत्राटदारांना दम
गरिबांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये असं त्यांच नेहमी प्रामाणिक मत असतं, आणि देशातील पैसा हा कंत्रादारांचा नसून तो सामान्य गोरगरिबांचा आहे हे विधान करायला ते विसरले नाहीत.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना आव्हान दिलं, पण आपसातच 'विकासाचे आकडे' चुकले : सविस्तर
गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘लाखो-करोडो’च्या आकड्यांची खिल्ली उडवली होती. त्यालाच नितीन गडकरी यांनी भाजपच्या वर्धापनदिनी उत्तर देत थेट शिवाजीपार्कला सर्वांसमोर खुल्या चर्चेचं आव्हाहन दिलं होत.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा